iPhone SE4 चा पहिला फोटो आला समोर, असा असेल स्वस्त आयफोनचा कॅमेरा! Apple करतोय लाँचची तयारीत
iPhone SE4 च्या लाँचिंगची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. याचं कारण म्हणजे अॅपलने घोषणा केली आहे की, iPhone SE4 हा अगदी कमी किंमतीत लाँच केला जाणार आहे. शिवाय मागील मॉडेलच्या तुलनेत यात अनेक मोठे अपग्रेड दिले जाणार आहेत. या अपग्रेडमध्ये Apple ची नवीनतम A18 सिरीज चिप, 48MP कॅमेरा आणि Touch ID सह फेस आयडी समाविष्ट आहे. हे सर्व अपग्रेड युजर्सना अतिशय कमी किंमतीत मिळणार आहेत.
नुकताच iPhone SE4 चा पहिला फोटो लीक झाला आहे. सोशल मीडिया एक्सवर Sonny Dickson या अकाऊंटवरून iPhone SE4 चा पहिला फोटो शेअर करण्यात आला आहे. या पोस्टवर शेकडो नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकजण हा नवीन आयफोन लाँच होण्याची वाट बघत आहेत. तर अनेकांनी iPhone SE4 च्या डिझाईनची iPhone 4s सोबत तुलना केली आहे. iPhone 4s युजर्समध्ये अजूनही लोकप्रिय आहे. आता कंपनी नवीन अपग्रेडेड स्वस्त iPhone SE4 लाँच करणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
First look at the iPhone SE 4 Dummy pic.twitter.com/qL0COgmPPA
— Sonny Dickson (@SonnyDickson) January 16, 2025
एक्सवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये iPhone SE 4 च्या डमी युनिटचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये iPhone SE 4 च्या बॅक पॅनल आणि साइड फ्रेमचे डिझाइन स्पष्टपणे दिसत आहे. iPhone SE 4 च्या बॅक पॅनलची रचना iPhone 4 सारखी दिसते. फोनचे दोन कलर व्हेरिअंट फोटोमध्ये दाखवण्यात आले आहेत. कंपनी हा स्मार्टफोन दोन रंगात लाँच करेल अशी अपेक्षा आहे.
परफॉर्मंस अपग्रेडच्या बाबतीत, iPhone SE4 ला आतापर्यंतचे सर्वात मोठे अपग्रेड मिळत असल्याचे सांगितलं जात आहे. डिव्हाइसमध्ये बहुधा A18 चिपसेट असेल, जे कार्यक्षमतेच्या बाबतीत आयफोन 16 सिरीजसोबत स्पर्धा करेल. त्यात Apple चे इन-हाउस 5G मॉडेम असण्याचीही अपेक्षा आहे. SE4 हा 8GB पर्यंत रॅम पर्याय आणि 128GB ते 512GB पर्यंतच्या स्टोरेज कॉन्फिगरेशनसह लाँच केला जाईल. iPhone SE4 मध्ये अॅपल इंटेलिजेंस फीचर्स देखील यामध्ये समाविष्ट केले जाऊ शकतात. आगामी आयफोनची किंंमत कमी असली तरी देखील फीचर्समध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
iPhone SE4 मध्ये कॅमेरा डिपार्टमेंटमध्ये अनेक अपग्रेड केले जातील. यात 48MP सेन्सरसह सिंगल रीअर लेन्स असू शकते, जो iPhone SE3 च्या 12MP सेन्सरवरून अपग्रेड आहे. यामध्ये सिनेमॅटिक मोड, स्मार्ट एचडीआर, एआय फोटोग्राफी आणि पोर्ट्रेट मोड सारखे फीचर्स दिले जाण्याची शक्यता आहे. मात्र, यामध्ये नाईट फोटोग्राफी मोड देण्यात येणार नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, iPhone SE4 मध्ये 3,279mAh बॅटरी दिली जाऊ शकते, जी मागील मॉडेलच्या 2,010mAh बॅटरीपेक्षा मोठी आहे. चार्जिंगचा वेग केबलद्वारे 20W आणि वायरलेस पद्धतीने 12W पर्यंत असू शकतो. EU नियमांमुळे, iPhone SE4 ला USB-C चार्जिंग पोर्ट प्रदान केले जाईल.
अहवालानुसार, iPhone SE4 भारतात सुमारे 50,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत आणि अमेरिकेत सुमारे 429 डॉलरच्या किंमतीत लाँच केला जाऊ शकतो. हा आगामी आयफोन मार्च-एप्रिलमध्ये लाँच केला जाण्याची शक्यता आहे. लक्षात ठेवा की ॲपलने याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.