कपड्यांना नाही तर ही आहे माणसांना धुणारी वॉशिंग मशिन! जपानचे अनोखे तंत्रज्ञान, 15 मिनिटांत शरीर होणार चकाचक
जपानमध्ये नवनवीन प्रयोग केले जातात. ज्यातील काही प्रयोग तर आपल्याला चकित करणारे असतात. जपान नेहमीच त्यांचे अनोखे तंत्रज्ञान विकसित करतो. आता देखील जपानने एक अनोखी वॉशिंग मशीन तयार केली आहे. पण ही वॉशिंग मशीन कपड्यांसाठी नाही तर माणसांसाठी तयार करण्यात आली आहे. होय, तुम्ही बरोबर वाचलं. जपानने माणसांना धुणारी वॉशिंग मशीन तयार केली आहे. ज्या माणसांना अंघोळ करण्याचा कंटाळा येतो, अशा माणसांसाठी हे बेस्ट गॅझेट असणार आहे. केवळ 15 मिनिटांत तुमचं शरीर स्वच्छ होणार आहे. जपानच्या या अनोख्या तंत्रज्ञानाने सर्वांनाच चकित केलं आहे.
Tech Tips: स्मार्टफोन हॅक होण्यापूर्वी देतो हे सिग्नल, अशा प्रकारे स्वत:ला ठेवा सुरक्षित
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगातील सर्वात प्रगत देश मानल्या जाणाऱ्या जपानने एक नवीन कामगिरी केली आहे. जपानमध्ये एक वॉशिंग मशीन विकसित करण्यात आली आहे जी 15 ते 20 मिनिटांत माणसांचं शरीर स्वच्छ करते. ही वॉशिंग मशीन कपड्यांसाठी नाही तर माणसांसाठी तयार करण्यात आली आहे. चला तर मग जपनाने माणसांसाठी तयार कलेली ही वॉशिंग मशीन कशा प्रकारे कार्य करते याबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)
जपानी अभियंत्यांनी एक नवीन आणि अद्वितीय मानवी वॉशिंग मशीन तयार केली आहे. त्यांनी या मानवी वॉशिंग मशीनला निन्जेन सेंटाकुकी MIRAI, NINGEN, SENTAKUKI असे नाव दिले. हे मशीन प्रथम एआयच्या मदतीने लोकांच्या शरीराचे विश्लेषण करेल आणि गरजेनुसार शरीर स्वच्छ करेल.
ओसाकास्थित शॉवरहेड कंपनी सायन्सने या मशीनचा शोध लावला आहे. कंपनीचा दावा आहे की या वॉशिंग मशिनमध्ये केवळ 15 मिनिटांत एखाद्या व्यक्तिचे शरीर पूर्णपणे स्वच्छ करण्याची क्षमता आहे. लवकरच हे मशीन ओसाका कान्साई एक्स्पोमध्ये प्रदर्शित केले जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, एक्स्पोमध्ये हजारो लोक या मशीनचा वापर करतील. ज्या लोकांना अंघोळ करण्याचा कंटाळा येतो, अशा लोकांसाठी ही मशीन अतिशय फायदेशीर ठरणार आहे.
Year Ender 2024: 2024 मध्ये Wikipedia वर सर्वात जास्त काय वाचले गेले? जाणून घ्या
जपनानी तयार केलेली ही मानवी वॉशिंग मशीन कशा पद्धतीने काम करेल हे समजून घेणे देखील महत्त्वाचे आहे. वास्तविक, व्यक्तीला प्रथम मशीनमध्ये बनवलेल्या पॉडमध्ये बसावे लागेल, त्यानंतर पॉड अर्धा गरम पाण्याने भरला जाईल. यानंतर, पाण्याच्या जेट्समधून लहान हवेचे फुगे तयार होऊ लागतील. यानंतर, हे बुडबुडे त्वचेतील घाण साफ करतील. त्याच वेळी, मशीन शरीराची माहिती गोळा करत राहील. शरीरानुसार योग्य तापमानात वॉशिंग केले जाईल याची मशीन खात्री करेल. इंजिनीअर्सच्या म्हणण्यानुसार, या मशिनमुळे मानवी त्वचेतील घाण तर दूर होईलच पण लोकांचे मनही हलके होईल.