Tech Tips: स्मार्टफोन हॅक होण्यापूर्वी देतो हे सिग्नल, अशा प्रकारे स्वत:ला ठेवा सुरक्षित
सध्या डिजीटल क्षेत्रात प्रचंड प्रगती होत आहे. एका क्लिकवर आपली अनेक काम होत आहेत. या सगळ्या कामांसाठी आपला स्मार्टफोन आपल्याला मदत करतो. शाळा, कॉलेज किंवा ऑफीसची काम असो किंवा ऑनलाइन शॉपिंग आपला स्मार्टफोन आपल्याला सर्व कामांसाठी मदत करतो. आपण आपल्या बँकेचे बरेच व्यवहार देखील स्मार्टफोनच्या मदतीने करतो. यामुळे आपली सर्व माहिती आपल्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह असते.
आपले फोटो, बँकेचे डिटेल्स आणि आपले महत्त्वाचे डॉक्युमेंट ही माहिती आपण आपल्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह केलेली असते. यामुळे आपला स्मार्टफोन हॅकर्सपासून सुरक्षित राहावा, असं आपल्याला नेहमी वाटतं असतं. अनेकदा आपल्या छोट्या चुका हॅकर्सना आमंत्रण देतात आणि आपला स्मार्टफोन हॅक झाला आहे, हे आपल्याला समजत देखील नाही. पण तुम्हाला माहित आहे का आपला स्मार्टफोन हॅक होण्यापूर्वी काही सिग्नल देतो. हे सिग्नल तुम्ही ओळखले तर तुम्ही तुमचा स्मार्टफोन हॅक होण्यापासून वाचवू शकता. (फोटो सौजन्य – pinterest)
तुमचा फोन अचानक जास्त गरम होऊ लागल्यास, बॅकग्राउंडमध्ये स्पाय ॲप चालू असण्याची शक्यता आहे. सामान्य ॲप फोनमध्ये वापरताना गरम होण्याची कोणतीही समस्या सहसा निर्माण होत नाही. पण जेव्हा फोनवर स्पाय ॲप्स परवानगीशिवाय चालू असतात, तेव्हा त्रास होतो. स्पाय ॲप्स तुमची हेरगिरी करण्याचे काम करते. या ॲप्समुळे तुमचा डेटा लिक होऊ शकतो.
जर तुमचा फोन मंद गतीने काम करत असेल किंवा बऱ्याचदा क्रॅश होत असेल तर तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. हॅकर्स तुमच्या फोनमधील डेटाचा गैरवापर करू शकतात, ज्यामुळे तुमच्या फोनची कार्यक्षमता कमी होऊ शकते आणि तुमचा फोन बंद होऊ शकते. जर तुम्हाला फोनमध्ये असे सिग्नल मिळत असतील तर तुम्हाला वेळीच सावध होण्याची गरज आहे.
जर अचानक तुम्ही फोनवर कोणता ॲप ओपन केला आणि अशावेळी तुम्हाला स्क्रीनवर पॉप-अप आणि अनावश्यक जाहिराती दिसू लागल्या, तर फोनच्या बँकग्राऊंडमध्ये काही चुकीची क्रिया घडण्याची शक्यता आहे. यामुळे तुमच्या स्मार्टफोनला ॲडवेअरचा धोका निर्माण होऊ शकतो. जर तुम्हाला अशा प्रकारचा कोणताही सिग्नल मिळत असेल तर तुम्ही ताबडतोब तुमचा फोन तपासावा. कारण तुम्ही केलेल्या दुर्लक्षामुळे तुम्हाला मोठं नुकसान होऊ शकतं.
जर तुमचा फोन काही संशयास्पद अॅक्टिव्हिटींशी संबंधित सिग्नल देत असेल तर महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
मजबूत पासवर्ड – अशा परिस्थितीत तुम्ही बँकिंगशी संबंधित ॲप्सचे पासवर्ड ताबडतोब बदलावे आणि सर्व ॲप्ससाठी एकच पासवर्ड ठेवणे टाळावे. सर्व अॅप्ससाठी मजबूत पासवर्ड सेट करा, ज्यामध्ये नंबर, कॅपिटल लेटर्स यांचा समावेश असेल.
अनावश्यक ॲप्स हटवा – फोनमध्ये अनावश्यक ॲप्स असतील तर ते लगेच डिलीट करा.
बॅकअप घ्या आणि रीसेट करा – तुम्हाला तुमच्या फोनमध्ये हॅकींग संबंधित काही क्रिया आढळल्या तर, तुम्ही डेटाचा बॅकअप घेऊ शकता आणि डिव्हाइस रीसेट करू शकता.
मालवेअर स्कॅन – संशयास्पद सॉफ्टवेअरसाठी तुमचा फोन स्कॅन करण्यासाठी सुरक्षा ॲप वापरा. बहुतेक अँटीव्हायरस प्रोग्राम विनामूल्य फोन स्कॅन देतात.