Realme 14x 5G: काही क्षणातचं लाँच होणार Realme चा नवीन स्मार्टफोन, बजेट किंमतीत मिळणार अनोखे फीचर्स
टेक कंपनी Realme आज 18 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता त्यांचा नवीन स्मार्टफोन Realme 14x 5G लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन बजेट किंमतीत लाँच होणार असल्याचं सांगितलं जात आहे. किंमत कमी असली तरी देखील स्मार्टफोन अनोख्या फीचर्सने सुसज्ज असणार आहे. Realme आज भारतीय बाजारपेठेत आपला नवीन मिड-रेंज स्मार्टफोन लाँच करणार आहे. या नवीन स्मार्टफोनमध्ये IP69 रेटिंगसह मोठी 6000mAh बॅटरी असल्याचे सांगितले जाते. असे बोलले जात आहे की हा स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये इतर स्मार्टफोनवर स्पर्धा करणार आहे. लाँचिंगपूर्वी स्मार्टफोनचे काही स्पेसिफिकेशेन्स समोर आले आहेत.
Blinkit Secret Santa: Blinkit सुद्धा खेळतोय Secret Santa, अशा प्रकारे घ्या सहभाग!
Realme 14x 5G फोन आज 18 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता भारतात लाँच होणार आहे. Realme 14x 5G सोशल मीडियावर टीझर जारी करण्यात आला आहे. जिथे या नवीन स्मार्टफोनचे फ्लॅट-फ्रेम डिझाइन आणि जबरदस्त डायमंड-कट ग्रेडियंट बॅक पॅनल समोर आले आहे. डिव्हाइसमध्ये आयताकृती कॅमेरा मॉड्यूल देखील असेल. हा आगामी स्मार्टफोन काळा, सोनेरी आणि लाल अशा तीन रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच केला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. (फोटो सौजन्य – X)
Realme 14x 5G स्मार्टफोन दोन रॅम व्हेरिअंटमध्ये लाँच केला जाण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह टॉप-टायर मॉडेलचा समावेश असेल. Realme 14x 5G स्मार्टफोन 6GB + 128GB, 8GB + 128GB व्हेरिअंटमध्ये देखील एंट्री करू शकतो.
Realme 14x 5G फोनमध्ये 6.67-इंचाचा HD+ IPS LCD डिस्प्ले दिला जाऊ शकतो, जो स्ट्रीमिंग आणि गेमिंगसाठी योग्य आहे. पाणी आणि धुळीपासून सुरक्षिततेसाठी याला IP69 रेटिंग मिळाले असेल. फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असण्याची शक्यत आहे. मात्र, हे सेन्सर किती मेगापिक्सल्सचे असतील याची माहिती सध्या देण्यात आलेली नाही. सेल्फी सेन्सरबद्दल कंपनीने काहीही सांगितले नाही. त्यामुळे युजर्सना या बजेट फोनच्या कॅमेऱ्याबद्दल उत्सुकता आहे.
Year Ender 2024: हे आहेत यावर्षीचे ‘Alexa’ ला विचारण्यात आलेले मजेदार प्रश्न, वाचून हसू आवरणार नाही
Realme 14x 5G फोनमध्ये 6000 mAh बॅटरी दिली जाऊ शकते, जी 45W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करेल. त्याच्या बाजूला पॉवर बटण आहे, जे फिंगरप्रिंट स्कॅनर म्हणून देखील काम करते. Realme चा दावा आहे की या फोनला शून्य ते 50 टक्के चार्ज होण्यासाठी 38 मिनिटे लागतील. यामुळे फोन 100 टक्के चार्ज होण्यासाठी 76 मिनिटे लागतील.
Realme 14x 5G स्मार्टफोन 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच होण्याची शक्यता आहे. Realme 14x 5G ने दावा केला आहे की हे डिव्हाइस जगातील सर्वात स्वस्त IP69-रेटेड स्मार्टफोन असू शकते. हे Realme च्या अधिकृत वेबसाइट आणि Flipkart द्वारे खरेदीसाठी उपलब्ध असेल.