बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेला 'देवा' आता ओटीटीवर धुमाकूळ घालणार, केव्हा आणि कुठे रिलीज होणार चित्रपट ?
बॉलीवूड स्टार शाहिद कपूरचा ॲक्शन थ्रिलर चित्रपट देवा 31 जानेवारी 2025 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध मल्याळम चित्रपट निर्माते रोशन एंड्रयूज यांनी केले आहे. या चित्रपटात शाहिद कपूरने देव आंब्रे नावाच्या पोलीस अधिकाऱ्याची भुमिका साकारली आहे. या चित्रपटात पूजा हेगडे पत्रकाराच्या भूमिकेत आहे. दमदार ॲक्शन आणि रोमांचक कथेमुळे देवा चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला होता. चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात प्रचंड गर्दी देखील पाहायला मिळत होती. मात्र आता हा चित्रपट ऑनलाईन लिक झाला आहे.
Netflix ने रिलीज केलं नवीन फीचर, या युजर्सना मिळणार फायदा! अशा प्रकारे एकत्र डाऊनलोड करा पूर्ण सीझन
नुकतीच रिलीज झालेला शाहीद कपूरचा देवा चित्रपट ऑनलाईन लिक झाला आहे. चित्रपट ऑनलाईन लिक झाल्यामुळे मेकर्सकडून चिंता व्यक्त केली जात आहे. रिलीज झाल्यानंतर काही तासांतच देवाची पायरेटेड कॉपी तमिळरॉकर्स, फिल्मझिला, टेलिग्राम आणि मूव्हीरूलेझ सारख्या अनेक बेकायदेशीर वेबसाइटवर लीक झाली. या पायरसीमुळे चित्रपट निर्मात्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे, तसेच कॉपीराइट उल्लंघन आणि सायबर सुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकतो. अनेकजण गूगलवर हा चित्रपट शोधत आहेत आणि त्यांच्या स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड करण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही देखील असं करत असाल तर थांबा. कारण ऑनलाईन लिक झालेला देवा चित्रपट आपल्या स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड करणं धोकादायक ठरू शकतं. (फोटो सौजन्य – Pinterest)
रिपोर्ट्सनुसार, देवाला अनेक पायरसी वेबसाइट्सवर 1080p, 720p, 480p आणि HD क्वालिटीमध्ये बेकायदेशीरपणे अपलोड करण्यात आले आहे. चित्रपट लीक झाल्याचं समोर येताच अनेकांनी इंटरनेटवर “देवा मूव्ही डाउनलोड,” “देवा फुल मूव्ही एचडी फ्री डाऊनलोड,” “देवा तमिलरॉकर्स” आणि “देवा फिल्मझिला” अशा प्रकारे सर्च करण्यास सुरुवात केली आहे. अनेकजण असे आहेत, की ज्यांनी चित्रपटगृहात जाऊन सिनेमा पाहण्यापेक्षा पायरेटेड आवृत्ती डाउनलोड करण्यात अधिक स्वारस्य दाखवलं आहे. तुम्ही देखील हा चित्रपट डाउनलोड करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे.
1. सायबर अटॅक आणि व्हायरसचा धोका: पायरेटेड चित्रपट डाउनलोड करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वेबसाइट्समध्ये अनेकदा व्हायरस, मालवेअर आणि स्पायवेअर यांचा धोका असतो. यामुळे तुमची वैयक्तिक माहिती, बँक तपशील आणि पासवर्ड चोरू हॅकर्सकडे पोहोचू शकतो.
2. कायदेशीर कारवाईची धमकी: भारतातील कॉपीराइट कायद्यानुसार पायरसी हा गुन्हा आहे. जर एखाद्या व्यक्तीने पायरेटेड सामग्री डाउनलोड केली किंवा शेअर केली तर त्याला 50,000 ते 2,00,000 रुपयांपर्यंत दंड आणि तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
3. डेटा चोरी आणि फसवणूक: पायरसी वेबसाइटना अनेकदा नोंदणी किंवा लॉगिन आवश्यक असते. यामुळे, तुमची वैयक्तिक माहिती सायबर गुन्हेगारांच्या हाती पडू शकते, ज्यामुळे तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं.
फोटो आणि व्हिडिओ क्लिक करताना GPS बंद करणं आहे गरजेचं, काय आहे यामागील कारण? जाणून घ्या
4. लो क्वालिटी आणि वाईट अनुभव: पायरेटेड चित्रपटांमध्ये अनेकदा खराब व्हिडिओ क्वालिटी, खराब ऑडिओ आणि अपूर्ण दृश्ये असतात, ज्यामुळे आपल्याला चित्रपट पाहण्याचा अनुभव घेता येत नाही.