आजकाल, सोशल मीडियावर क्लिक केल्यानंतर फोटो आणि व्हिडिओ अपलोड करणे ट्रेंड बनला आहे. लोकं फोटो आणि व्हिडिओ क्लिक केल्यानंतर, तात्काळ सोशल मीडियावर अपलोड करतात. पण फोटो आणि व्हिडिओ अपलोड करताना तुम्ही स्मार्टफोनचे GPS बंद करणं गरेजचं आहे. तसे न केल्यास तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता. यामुळे तुम्ही ऑनलाइन सेल्फी स्टॉलिंगचे शिकार देखील होऊ शकता. हे टाळण्यासाठी, तुम्ही तुमच्या फोनमध्ये काही सेटिंग्ज करणे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही ऑनलाइन सेल्फी स्टॉलिंगचे बळी होण्यापासून वाचू शकता. आणि स्वत:ला सुरक्षित ठेऊ शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
फोटो आणि व्हिडिओ क्लिक करताना GPS बंद करणं आहे गरजेचं, काय आहे यामागील कारण? जाणून घ्या
जर तुम्हाला फोटो आणि व्हिडिओ क्लिक करण्याची आवड असेल आणि तुम्ही क्लिक केलेले फोटो ऑनलाइन अपलोड करत असाल, तर तुम्ही फोटो आणि व्हिडिओ क्लिक करताना तुमच्या फोनचा GPS बंद करावा. यामागे तुमची सुरक्षितता हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे.
तुम्ही GPS बंद न केल्यास, स्कॅमरला तुमच्याबद्दल सर्व माहिती समजू शकेल. स्कॅमर आणि हॅकर्सना तुम्ही कुठे आहात आणि तुम्ही काय करत आहात याची माहिती मिळेल.
तुम्ही फोनवर फोटो आणि व्हिडिओ क्लिक करता आणि तुमचा GPS चालू असतो, तेव्हा तुम्ही फोटो क्लिक करत असलेल्या ठिकाणाचे अक्षांश आणि रेखांश देखील सोबत जाते.
हे तुमचे अचूक स्थान दर्शवते, जेणेकरून स्कॅमर तुमच्यापर्यंत सहज पोहोचू शकतील. याला सेल्फी-फोटो-व्हिडिओद्वारे ऑनलाइन स्टॉलिंग म्हणतात. हे टाळण्यासाठी, लक्षात ठेवा की फोटो आणि व्हिडिओ क्लिक करताना, फोनचा जीपीएस नेहमी बंद ठेवा.
तुमच्या प्रोफाइलवर कधीही पूर्ण माहिती शेअर करू नका. तुम्ही तेवढीच माहिती शेअर करावी, जेणेकरून सार्वजनिकरित्या शेअर केल्यास तुमचे नुकसान होणार नाही. ज्यांना तुम्ही ओळखता आणि विश्वास ठेवता अशा लोकांनाच तुमची पोस्ट पाहण्याची अनुमती द्या. अशा परिस्थितीत, प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची गोपनीयता सेटिंग्ज समजून घ्या आणि त्यांचे अनुसरण करा.
हे देखील लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही फोटो आणि व्हिडिओ अपलोड कराल तेव्हा त्यात लोकेशन टॅग लावू नका. याशिवाय, तुमच्या बॅकग्राऊंडमध्ये कोणतीही लिखित वस्तू दिसू देऊ नका, ज्यामुळे तुमचे अचूक स्थान कळू शकेल.