Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

युजर्सचे दुर्दैव की कंपनीचे चातुर्य? लाखो रुपये खर्च करूनही S पेनमध्ये नाही मिळणार Galaxy 25 Ultra ब्लूटूथ

Galaxy 25 Ultra च्या S-Pen मधून ब्लूटूथ काढून टाकलं आहे. S-Pen ब्लूटूथसाठी कंपनी पैसे घेणार आहे. होय तुम्ही बरोबर वाचलं आहे. लाखो रुपयांचा स्मार्टफोन घेतला पण त्याच्या ब्लूटूथसाठी आता अधिक पैसे खर्च करावे लागणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 27, 2025 | 11:39 AM
युजर्सचे दुर्दैव की कंपनीचे चातुर्य? लाखो रुपये खर्च करूनही S पेनमध्ये नाही मिळणार Galaxy 25 Ultra ब्लूटूथ

युजर्सचे दुर्दैव की कंपनीचे चातुर्य? लाखो रुपये खर्च करूनही S पेनमध्ये नाही मिळणार Galaxy 25 Ultra ब्लूटूथ

Follow Us
Close
Follow Us:

अलीकडेच स्मार्टफोन कंपनी Samsung ने त्यांची नवीन स्मार्टफोन सिरीज लाँच केली आहे. या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या मोठ्या ईव्हेंटमध्ये Galaxy S25 सिरीज लाँच करण्यात आली आहे. या सिरीजमध्ये Galaxy S25 Ultra हा नवीनतम स्मार्टफोन 1,29,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये असे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे इतर कंपन्यांची झोप उडाली आहे. मात्र या स्मार्टफोनबाबत एक तक्रार केली जात आहे. ही तक्रार म्हणजे Galaxy 25 Ultra च्या S पेनमधून ब्लूटूथचं ऑप्शन काढून टाकण्यात आलं आहे.

खरं तर स्मार्टफोन लाँच होण्यापूर्वीच अशी चर्चा सुरु होती, ज्यामध्ये सांगितलं जात होत की, Galaxy 25 Ultra च्या S पेनमधून ब्लूटूथचं ऑप्शन काढून टाकलं जाणार आहे. मात्र कंपनीने याबद्दल कोणतंही वक्तव्य केलं नव्हतं. मात्र आता या स्मार्टफोनच्या S पेनमधून ब्लूटूथचं ऑप्शन काढून टाकण्यात आलं आहे. म्हणजेच अगदी लाखो रुपये खर्च करून देखील युजर्सना या स्मार्टफोनच्या S पेनमध्ये ब्लूटूथ ऑप्शन मिळालं नाही. पण आता अशी एक बातमी समोर आली आहे की, युजर्सना Galaxy 25 Ultra च्या S पेनमध्ये ब्लूटूथ ऑप्शनची आवश्यकता असेल तर त्यांना नवीन पेन खरेदी करावं लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, युजर्स 50 डॉलर्सना ब्लूटूथ असलेला S पेन खरेदी करू शकतात.  (फोटो सौजन्य – X)

सॅमसंग त्याच्या फ्लॅगशिप सीरिजच्या बिग बॉस गॅलेक्सी 25 अल्ट्रामध्ये काहीतरी करेल, अशी सर्वांनाच कल्पना होती. गेल्या वर्षी S24 Ultra मध्ये असेच काहीसे घडले होते. कंपनीने एआय फीचर्सची घोषणा केली पण नंतर कळले की ही सेवा मोफत नाही. त्याची किंमत मोजावी लागेल. आता देखील कंपनीने असंच काही केलं आहे. ज्यामुळे युजर्स नाराज झाले आहेत.

No Bluetooth on the @SamsungMobileUS Galaxy S25 Ultra SPen… Who cares?! #GalaxyUnpacked pic.twitter.com/BheIFoDTbu

— shane starnes (@DroidModderX) January 23, 2025

सॅमसंगची अल्ट्रा सीरिज जितकी अप्रतिम कॅमेरे, उत्कृष्ट यूजर इंटरफेस, उत्तम प्रोसेसर यासाठी ओळखली जाते तितकीच त्याची एस-पेनही प्रसिद्ध आहे. कोपऱ्यात असलेला हा पेन फक्त नोट्स घेण्यासाठी नाही, तर इतर अनेक कामांसाठी फायद्याचा आहे. त्याच्या मदतीने फोन दूर ठेवून फोटो आणि व्हिडिओ काढता येतात. समोरच्या शूटरवरून बॅक शूटरवर स्विच करू शकतो. हे एक प्रकारचे रिमोट समजा कारण ते ब्लूटूथ कनेक्ट केलेले डिव्हाइस आहे. पेनची क्रेझ फोनपेक्षा कमी नाही. पण आता असे होणार नाही. कारण कंपनीने Galaxy 25 Ultra मध्ये हे फक्त एक पेन बनवले आहे. कारण Galaxy 25 Ultra च्या पेनमध्ये ब्लूटूथ नाही.

Galaxy 25 Ultra मधील पेन नोट्स घेण्यासाठी किंवा स्क्रीनवर चित्र काढण्यासाठी उपयुक्त ठरेल. गेल्या आठवड्यात जेव्हा फोन लाँच झाला तेव्हा लोकांना वाटले की कदाचित काही सॉफ्टवेअर त्रुटी आहे. कंपनी अपडेट पाठवून त्याचे निराकरण करेल. पण आता कंपनी ब्लूटूथ सपोर्ट असलेले पेन वेगळे विकणार असल्याचे समोर आले आहे. म्हणजेच तुम्हाला Galaxy 25 Ultra साठी ब्लूटूथ सपोर्ट असलेले पेन पाहिजे असल्यास तुम्हाला अतिरिक्त पैसे खर्च करावे लागणार आहे. त्याची किंमत काय असेल, भारतात मिळेल की नाही? हे सध्या स्पष्ट नाही.

Web Title: Tech news the s pen on the galaxy s25 ultra does not have bluetooth capabilities

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2025 | 11:39 AM

Topics:  

  • Samsung Galaxy

संबंधित बातम्या

सॅमसंगच्या ‘या’ स्मार्टफोनला छप्परफाड मागणी! कंपनीचा साठाच संपला
1

सॅमसंगच्या ‘या’ स्मार्टफोनला छप्परफाड मागणी! कंपनीचा साठाच संपला

सॅमसंग युजर्ससाठी आनंदाची बातमी! भारतात सॅमसंग गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड७ सह इतर डिव्हाईसच्या विक्रीला सुरुवात
2

सॅमसंग युजर्ससाठी आनंदाची बातमी! भारतात सॅमसंग गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड७ सह इतर डिव्हाईसच्या विक्रीला सुरुवात

सॅमसंग गॅलॅक्सी S25 एज भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध; किंमत ₹1,09,999 पासून
3

सॅमसंग गॅलॅक्सी S25 एज भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध; किंमत ₹1,09,999 पासून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.