Jio, Airtel, Vi आणि BSNL युजर्सनी लक्ष द्या! 1 डिसेंबरपासून बदलणार OTP चे नियम, ट्रायने दिल्या सूचना
स्मार्टफोन आणि प्रगत टेक्नोलॉजीमुळे आपलं जीवन अतिशय सोपं झालं आहे. पण या सर्वांसोबतच फसवणुकीच्या घटनांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सायबर हल्लेखोर आणि फ्रॉडर्स लोकांकडून पैसे उकळण्यासाठी नवनवीन मार्ग शोधत असतात. आणि अनेक लोकं त्यांच्या या मार्गांना बळी पडतात. सायबर गुन्ह्याच्या शेकडो घटनांबद्दल तुम्ही ऐकलं असेल. याच सर्व घटना आणि स्मार्टफोन युजर्सची सुरक्षा लक्षात घेत भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने काही कठोर पाऊलं उचलली आहेत.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
सायबर गुन्ह्यांच्या घटना दररोज समोर येत असतात, ज्यामध्ये लोकांची वैयक्तिक माहिती आणि पैसा सर्वाधिक लुटला जातो. आता, स्पॅम एसएमएस संदेश आणि फिशिंग हल्ल्यांचा धोका टाळण्यासाठी, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया (Vi) आणि सरकारी मालकीच्या भारत संचार निगम लिमिटेड BSNL सह सर्व टेलिकॉम कंपन्यांना ट्रेसिबिलिटी नियम लागू करण्यास सांगितलं आहे. हा नियम 1 डिसेंबरपासून हे नियम लागू केला जाणार आहे. (फोटो सौजन्य – सोशल मिडीया)
या नियमांतर्गत स्मार्टफोन युजर्सना येणारे प्रमोशनल आणि टेलीमार्केटिंग मॅसेजसह वन टाईम पासवर्ड म्हणजेच ओटीपी देखील ट्रेस केला जाणार आहे. स्पॅम आणि फिशिंगसाठी मॅसेजिंग सेवेचा गैरवापर टाळण्यासाठी सेंडर्सकडील सर्व संदेशांबद्दल टेलिकॉम कंपन्यांना माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळे ट्रायने सर्व टेलिकॉम कंपन्यांना ट्रेसिबिलिटी नियम लागू करण्यास सांगितलं आहे.
या अंतर्गत सर्व मोबाईल युजर्सना येणारे प्रमोशनल आणि टेलीमार्केटिंग मॅसेज तसेच ओटीपी देखील ट्रेस केला जाईल. यामध्ये कोणतीही संशयास्पद लिंक आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. यापूर्वी ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना 1 ऑक्टोबर 2024 पर्यंत नियम लागू करण्यास सांगितले होते. नंतर ही मुदत 1 नोव्हेंबरपर्यंत वाढवून देण्यात आली होती. मात्र आता 1 डिसेंबरपासून नवीन नियम लागू केले जाणार आहेत.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
ट्रायच्या म्हणण्यानुसार, सायबर स्कॅमर्सद्वारे स्पॅम आणि फिशिंग हल्ले म्हणून वर्गीकृत केलेले अनावश्यक प्रमोशनल संदेश वाढत आहेत आणि यावर नियंत्रण मिळवणं गरेजचं आहे. ट्रायने चेतावणी दिली आहे की हे संदेश स्कॅमर्सद्वारे वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती जसे की OTP इत्यादी गोळा करण्यासाठी वापरले जातात, ज्याचा वापर त्यांच्या बँक खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि पैसे काढण्यासाठी केला जातो.
नवीन नियमानुसार, OTP संदेश येण्यास वेळ लागू शकतो. तुम्ही बँकेत जाण्याचा किंवा रिजर्वेशन वगैरे करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला यासाठी उशीरा OTP मिळू शकतो. आम्ही तुम्हाला सांगतो की ट्रायने हे पाऊल उचलले आहे कारण स्कॅमर बनावट OTP संदेशांद्वारे वापरकर्त्यांच्या फोनवर प्रवेश करतात आणि युजर्सची मोठ्या प्रमाणात फसवणूक करतात. पण आता नव्या नियमांमुळे सर्व मोबाईल युजर्सना दिलासा मिळणार आहे.