Vivo घेऊन येतोय Mixed Reality Headset! Apple Vision Pro ला देणार जबरदस्त टक्कर
सध्या मिक्स्ड रिॲलिटी हेडसेटची लोकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. मिक्स्ड रिॲलिटी हेडसेटमुळे लोकांचे प्रचंड मनोरंजन होते. अनेक टेक कंपन्यांनी त्यांचे मिक्स्ड रिॲलिटी हेडसेट लाँच केले आहेत. आता सर्वांची लोकप्रिय टेक कंपनी Vivo मिक्स्ड रिॲलिटी हेडसेट लाँच करणार आहे. पुढील वर्षी म्हणजेच 2026 मध्ये हे मिक्स्ड रिॲलिटी हेडसेट लाँच केलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच या मिक्स्ड रिॲलिटी हेडसेटचा पहिला नमुना 2025 च्या उत्तरार्धात लाँच केला जाणार आहे. याबाबत कंपनीने मंगळवारी एका कार्यक्रमादरम्यान घोषणा केली आहे.
MahaKumbh 2025: कुंभ मेळ्यात जाण्याचा प्लॅन करताय? Google Maps चे हे 5 फीचर्स करतील मदत
Vivo मिक्स्ड रिॲलिटी हेडसेटबद्दल सर्वांनाच प्रचंड उत्सुकता आहे. हे मिक्स्ड रिॲलिटी हेडसेट Apple Vision Pro ला टक्कर देणार आहे. असे मानले जाते की हे Vivo वेअरेबल हे ऍपल व्हिजन प्रो आणि सॅमसंगच्या आगामी प्रोजेक्ट Moohan सारख्या वेअरेबल मार्केटमधील इतर MR हेडसेटशी स्पर्धा करणार आहे. या दोन्ही प्रोडक्ट्सची या महिन्याच्या सुरुवातीला घोषणा करण्यात आली आहे. Vivo मिक्स्ड रिॲलिटी हेडसेटमध्ये कोणते फीचर्स दिले जातील, त्यांची किंमत काय असेल याबाबत माहिती देण्यात आली नाही. मात्र 2025 च्या उत्तारार्धात Vivo मिक्स्ड रिॲलिटी हेडसेटचा पहिला नमुना लाँच केला जाणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
चायनीज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर अलीकडेच एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टनुसार, Vivo मिक्स्ड रिॲलिटी हेडसेट Apple Vision Pro ला टक्कर देणार आहे. या दोन्हीमधील अनेक फीचर्स सारखे असण्याची शक्यता आहे. Apple ने अलीकडेच त्यांच्या Apple Vision Pro चे प्रोडक्शन बंद केलं आहे. प्रचंड किंमतीमुळे या प्रोडक्टचं प्रोडक्शन बंद करण्यात आलं आहे. यानंतर आता कंपनी Apple Vision Pro चे स्वस्त वर्जन लाँच करणार असल्याचं सांगितलं जात आहे. ॲपल व्हिजन असं या नवीन गॅझेटचं नाव असणार आहे. Apple Vision Pro च्या स्वस्त वर्जनसोबतच सॅमसंग आणि विवो देखील मिक्स्ड रिॲलिटी हेडसेट लाँच करण्याच्या तयारीत आहे.
विवो मिक्स्ड रिॲलिटी हेडसेटचा पहिले प्रोडक्शन सप्टेंबरमध्ये लाँच होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र हे हेडसेट कोणत्या दिवशी लाँच केलं जाईल, याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, यात ॲपल व्हिजन प्रोपेक्षा अधिक फिचर्स असतील अशी अपेक्षा आहे.
नुकतेच गुगलने एक्सटेंडेड रिॲलिटी (XR) डिव्हाइसेससाठी नवीन ऑपरेटिंग सिस्टम आणण्याची चर्चा केली होती. XR मध्ये ऑगमेंटेड रिॲलिटी, व्हर्च्युअल रिॲलिटी आणि मिक्स्ड रिॲलिटी यांचा समावेश होतो. टेक तज्ज्ञांच्या मते, नवीन अँड्रॉइड एक्सआर ऑपरेटिंग सिस्टम आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ऑगमेंटेड रिॲलिटी आणि व्हर्च्युअल रिॲलिटीवर अवलंबून असलेल्या वैशिष्ट्यांना सपोर्ट करेल.