WhatsApp, Telegram आणि Instagram युजर्सवर स्कॅमर्सची नजर, सरकारने दिला अलर्ट! अशा प्रकारे स्वत:ला ठेवा सुरक्षित
लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि इंस्टाग्राम युजर्ससाठी सरकारने अलर्ट जारी केला आहे. या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्कॅमर्सची नजर आहे. स्कॅमर्स व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि इंस्टाग्राम युजर्सना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत आपण स्वत:ला सुरक्षित ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अन्यथा आपलं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं.
BSNL ने युजर्सना दिलं New Year Gift! लाँच केले दोन ढासू रिचार्ज प्लॅन, मिळणार फास्ट स्पीड इंटरनेट
व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि इंस्टाग्राम या ॲप्सच्या माध्यमातून स्कॅमर्स लोकांना सर्वाधिक टार्गेट करत असल्याचे गृह मंत्रालयाच्या अहवालातून समोर आले आहे. वास्तविक, या तिन्ही ॲप्सचे करोडो युजर्स आहेत. जगभरात या तिन्ही ॲप्सचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मित्रांसोबत चॅटिंग करण्यापासून ते अगदी काही प्रोफेशल कामांपर्यंत या ॲप्सचा वापर केला जातो. त्यामुळे, ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या स्कॅमर्सना लोकांची फसवणूक करणं अधिक सोपं होतं. (फोटो सौजन्य – pinterest)
2024 च्या पहिल्या तीन महिन्यांत सरकारला व्हॉट्सॲपद्वारे सायबर फसवणुकीच्या सर्वाधिक 43,797 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यानंतर टेलिग्रामच्या माध्यमातून फसवणुकीच्या 22,680 तक्रारी आणि इन्स्टाग्रामद्वारे फसवणुकीच्या 19,800 तक्रारी आल्या. रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, सायबर ठग गुगल सर्व्हिस प्लॅटफॉर्मचा वापर करून असे गुन्हे करतात. स्कॅमर्स अगदी साध्या सोप्या पद्धतीने लोकांना आपल्या जाळ्यात ओढतात, आणि त्यांची लाखो रुपयांची फसवूणक करतात.
देशातील सायबर फसवणुकीच्या वाढत्या प्रकरणांदरम्यान आलेल्या गृह मंत्रालयाच्या या वार्षिक अहवालात असे म्हटले आहे की अशा प्रकारची फसवणूक वेगवेगळ्या देशांमध्ये होत आहे आणि त्यात मोठ्या प्रमाणावर मनी लाँडरिंग आणि सायबर गुलामगिरीचाही समावेश आहे. सायबर फसवणुकीत बेरोजगार तरुण, गृहिणी, विद्यार्थी आणि इतर गरजू लोकांना सर्वाधिक टार्गेट केले जाते, ज्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसा गमावला जातो. कर्ज घेतलेल्या पैशांचाही या पैशात समावेश आहे.
Tech Tips: Youtube च्या Cooking चॅनेलवरील व्हिडीओ व्हायरल होत नाही? तुमच्या या चूका सुधारण्याची गरज
अहवालात असे म्हटले आहे की सायबर ठग स्पॉन्सर्ड फेसबुक जाहिरातींद्वारे देशात बेकायदेशीर कर्ज देणारी ॲप्स सुरू करत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी, सरकार अशा लिंक्स आधीच ओळखते. गरज भासल्यास या लिंक्स काढून टाकण्याच्या सूचनाही फेसबुकला देण्यात आल्या आहेत. ज्यामुळे लोकांची अशा जाहीरातींमुळे फसवणूक होणार नाही.