MahaKumbh 2025: कुंभ मेळ्यात जाण्याचा प्लॅन करताय? Google Maps चे हे 5 फीचर्स करतील मदत
13 जानेवारी 2025 पासून महाकुंभ मेळा सुरू होणार आहे. 26 फेब्रुवारी 2025 रोजी या मेळ्याची सांगता होणार आहे. यंदा प्रयागराजमध्ये महाकुंभाचे आयोजन केले जाणार आहे. यात सुमारे 40 कोटी भाविक सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महाकुंभमेळ्याची वेळ जसजशी जवळ येत आहे, तसतसा भाविकांमध्ये कुंभस्नानाविषयीचा उत्साह वाढत आहे. 114 वर्षांनंतर तीर्थक्षेत्र प्रयागराजमध्ये पूर्ण कुंभाचा दुर्मिळ योग घडणार आहे.
आपण देखील या महाकुंभात सहभागी व्हावं असं प्रत्येकाची इच्छा आहे. पण महाकुंभ मेळ्यात आपल्याला रस्तांबाबत माहिती कोण देणार असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. तर तुमच्या सर्वांच्या या प्रश्नाचं उत्तर आहे गुगल मॅप. आजच्या काळात गुगल मॅप ही लोकांची गरज बनली आहे. आजच्या काळात प्रत्येकाला गुगल मॅपची माहिती आहे. अशी काही वैशिष्ट्ये गुगल मॅपमध्ये देखील उपलब्ध आहेत, जी प्रवासादरम्यान खूप उपयुक्त आहेत. जर तुम्ही यावेळी कुंभमेळ्याला जाण्याचा विचार करत असाल तर गुगल मॅपची ही 5 फीचर्स तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरतील. (फोटो सौजन्य – pinterest)
गुगल मॅपमध्ये स्ट्रीट व्ह्यू टाईम ट्रॅव्हल नावाचे एक फीचर आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही अनेक वर्षांपूर्वी एखादं ठिकाणं कसं दिसत होतं, याबाबत माहिती घेऊ शकता. तुम्ही काळाच्या मागे वळून पाहू शकता आणि जुन्या काळात एखादे ठिकाण कसे दिसत होते ते पाहू शकता. या फीचरच्या मदतीने तुम्ही महाकुंभ मेळा आयोजित केला जाणारं ठिकाणं पूर्वी कसं होतं, हे तुम्ही पाहू शकता.
गुगल मॅपचे ऑफलाईन नेव्हिगेशन फीचर आपल्याला आपल्या प्रत्येक प्रवासात फायद्याचं ठरणार आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही इंटरनेटशिवाय देखील गुगल मॅपचा वापर करू शकता. यासाठी तुम्हाला गुगल मॅपवर जाऊन आवश्यक असणारे नकाशे डाऊनलोड करावे लागणार आहेत. यानंतर तुम्ही इंटरनेट कनेक्शन नसताना देखील गुगल मॅपचा वापर करू शकणार आहात.
गुगल मॅपमधील नेविगेशन वॉइस कमांड फीचर AI संबंधित आहे. यामध्ये तुम्ही प्रवास करताना जेमिनी एआयच्या मदतीने तुमच्या लोकेशनवर नेव्हिगेट करू शकता. हे नेव्हिगेशन व्हॉईस कमांडच्या मदतीने करता येते.
BSNL ने युजर्सना दिलं New Year Gift! लाँच केले दोन ढासू रिचार्ज प्लॅन, मिळणार फास्ट स्पीड इंटरनेट
गुगल मॅपचे नवीन फीचर तुम्हाला इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्सची अचूक माहिती देईल. या फीचरच्या मदतीने इलेक्ट्रिक कारचे मालक जवळचे चार्जिंग स्टेशन शोधू शकतील. हे वैशिष्ट्य वापरकर्त्यांना त्यांच्या इलेक्ट्रिक कारच्या चार्जिंग प्लगनुसार सर्च रिझल्ट दाखवते.
तुम्ही गुगल मॅपच्या मदतीने कोणत्याही हॉटेलमध्ये स्वत:साठी जेवणाचे टेबल बुक करू शकता. यासाठी तुम्हाला गुगल मॅपवर जाऊन निअर बाय हॉटेल सर्च करावे लागेल. तुम्हाला रेस्टॉरंटची यादी मिळेल. इथे तुम्ही तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी हॉटेलमध्ये जेवणाचे टेबल बुक करू शकता.