Motorola चा हा स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, 50MP सेल्फी कॅमेरा आणि 120W फास्ट चार्जिंगने सुसज्ज
ई कॉमर्स फ्लिपकार्टवर भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मोन्युमेंटल सेल 2025 चं आयोजन करण्यात आलं आहे. 13 जानेवारी 2025 पासून सेल सुरु झाला असून या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोनपासून होम अप्लायंसेसपर्यंत सर्व गोष्टी स्वस्त आणि कमी पैशांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. मोन्युमेंटल सेल 2025 दरम्यान, अनेक स्मार्टफोनवर फ्लिपकार्ट मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट ऑफर करत आहे. ज्यामुळे ग्राहकांना हे स्मार्टफोन्स कमी पैशांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
या कारणांमुळे होतो Smartphone Blast! अशा प्रकारे घ्या तुमच्या फोनची योग्य काळजी
मोन्युमेंटल सेल 2025 दरम्यान, Motorola’s Edge 50 Ultra देखील कमी पैशांत विक्रीसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर Motorola’s Edge 50 Ultra तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. ऑनलाइन शॉपिंग साइट Flipkart वर तुम्ही Motorola’s Edge 50 Ultra स्मार्टफोन ऑफर्स आणि डिस्काऊंटसह खरेदी करू शकता. (फोटो सौजन्य – X)
जर तुम्ही असा शक्तिशाली फोन शोधत असाल जो जास्त पैसे खर्च न करता तुमची रोजची कामं अगदी सहजपणे करू शकेल तर Motorola’s Edge 50 Ultra बेस्ट आहे. सर्व ऑफर्ससह, तुम्ही Motorola’s Edge 50 Ultra स्मार्टफोन 45,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता.
Flipkart वर Motorola Edge 50 Ultra ची किंमत सध्या 49,999 रुपये आहे. ही किंमत 12GB+512GB व्हेरिअंटसाठी आहे. ग्राहकांना HDFC बँक कार्ड वापरण्यावर 5,000 रुपयांची बँक सवलत मिळू शकते, ज्यामुळे या स्मार्टफोनची किंमत 44,999 रुपयांपेक्षा आणखी कमी होणार आहे. EMI पर्याय निवडल्यास, ग्राहक आणखी 1,000 रुपये वाचवू शकतात.
याशिवाय फ्लिपकार्ट 33,300 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज व्हॅल्यू देखील देत आहे. यासाठी तुमचा जुना डिव्हाईस चांगल्या स्थितीत असणं आवश्यक आहे. Axis Bank कार्डसह ग्राहक 9 महिने विनाखर्च EMI देखील मिळवू शकतात, ज्याची सुरुवात दरमहा 5,556 रुपये आहे.
डिस्प्ले – Motorola Edge 50 Ultra मध्ये 6.7-इंच 144Hz FHD+ 10-बिट OLED पॅनेल डिस्प्ले देण्यात आला आहे. हे HDR10+ सपोर्ट आणि 2,500 nits पर्यंत पीक ब्राइटनेस देते. सुरक्षिततेसाठी, डिस्प्लेला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टसचे संरक्षण देखील देण्यात आलं आहे.
प्रोसेसर – शक्तिशाली कामगिरीसाठी, या स्मार्टफोनमध्ये Qualcomm चे Snapdragon 8s Gen 3 आहे, जे 12GB पर्यंत LPDDR5X RAM आणि 512GB UFS 4.0 स्टोरेजसह जोडलेले आहे.
बॅटरी आणि चार्जिंग – Motorola Edge 50 Ultra मध्ये 120W जलद चार्जिंगला सपोर्ट करणारी 4,500mAH बॅटरी आहे. हा फोन Moto AI फीचर्स आणि इमेज प्रोसेसिंग फीचर्ससह येतो.
Tech tips: हा सीक्रेट नंबर शेअर करणं पडेल महागात, क्षणार्धात रिकामं होईल तुमचं बँक अकाऊंट
कॅमेरा सेटअप – कॅमेराबद्दल बोलायचे झाले तर, स्मार्टफोनमध्ये 50MP प्राथमिक शूटर, 50MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 64MP 3x टेलीफोटो कॅमेरा आहे. सेल्फीसाठी, यात 50 MP फ्रंट-फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे.