या कारणांमुळे होतो Smartphone Blast! अशा प्रकारे घ्या तुमच्या फोनची योग्य काळजी
आपण दिवसभर आपल्या स्मार्टफोनचा वापर करत असतो. स्मार्टफोनशिवाय आपली अनेक कामं अडकली जाऊ शकतात. कारण आपल्या सध्याच्या आयुष्यात स्मार्टफोनशिवाय एकही दिवस जाणं फार कठीण आहे. स्मार्टफोन म्हणजे आपला जीव की प्राण ठरत आहे. अगदी एखाद्या व्यक्तिला कॉल करण्यापासून ते मॅसेज करण्यापर्यंत आणि फोटो काढण्यापासून ते सिनेमा पाहण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी आपण आपल्या स्मार्टफोनचा वापर करतो. थोडक्यात सांगायचं तर आपण दिवसभर आपल्या स्मार्टफोनचा वापर करतो.
Tech tips: हा सीक्रेट नंबर शेअर करणं पडेल महागात, क्षणार्धात रिकामं होईल तुमचं बँक अकाऊंट
स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा एक अत्यावश्यक भाग बनला आहे कारण स्मार्टफोनशिवाय आपलं एकही कामं होऊ शकत नाही. परंतु काहीवेळा निष्काळजीपणामुळे आपण आपल्या स्मार्टफोनच्या बाबतीत अशा काही चुका करतो ज्या धोकादायक ठरू शकतात. गेल्या काही वर्षांत स्मार्टफोन फुटण्याच्या आणि ब्लास्ट होण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बहुतांश घटनांमध्ये हा अपघात आपल्या चुकांमुळे होतो. चला जाणून घेऊया कोणत्या कारणांमुळे स्मार्टफोनचा स्फोट होतो आणि ते टाळण्यासाठी काय उपाय करणं गरजेचं आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
स्मार्टफोनच्या बॅटरीमध्ये लिथियम-आयनचा वापर केला जातो, जो जास्त उष्णता सहन करू शकत नाही. फोन बराच काळ चार्जिंगला लावून ठेवल्यास किंवा जड गेम आणि ॲप्स वापरल्यास, बॅटरी जास्त गरम होऊ शकते. हे स्मार्टफोनच्या बॅटरी स्फोटाचे मुख्य कारण बनते.
बरेच लोक स्वस्त आणि बनावट चार्जर वापरतात, ज्यामुळे फोनचे सर्किट खराब होऊ शकते. बनावट बॅटरी देखील योग्य व्होल्टेज पुरवत नाहीत, ज्यामुळे फोनचा स्फोट होण्याचा धोका वाढतो.
फोन पडल्यास किंवा बॅटरी खराब झाल्यास तो वापरणे धोकादायक ठरू शकते. बॅटरीच्या अंतर्गत नुकसानीमुळे, त्यात रासायनिक प्रतिक्रिया होऊ शकते, ज्यामुळे स्फोट होतो.
तुम्ही फोन वारंवार चार्ज केल्यास किंवा त्याची बॅटरी पूर्णपणे संपुष्टात आल्यास, बॅटरीवर ताण येतो. यामुळे बॅटरीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो आणि स्फोट होण्याचा धोका वाढतो.
अतिउष्ण किंवा थंड वातावरणात फोन ठेवल्याने बॅटरीवर वाईट परिणाम होतो. जास्त उष्णतेमुळे बॅटरीच्या आत दाब वाढतो, ज्यामुळे फोनचा स्फोट होऊ शकतो.