
Today's Google Doodle: आजचे डूडल बोलतंय गणिताची भाषा, क्रिएटिव्ह पद्धतीने सेलिब्रेट केलं Quadratic Equation
आज सकाळी जेव्हा तुम्ही गुगलचे होम पेज ओपन केलं तेव्हा तुम्हाला देखील काही वेगळं जाणवलं का? गुगलच्या होमपेज वरील आजची खास गोष्ट होती गुगल डूडल. आजचे डूडल अतिशय वेगळे आहे. कारण आजचे डूडल कोणत्याही सणाचे किंवा निवडणूकीचे नाही तर आजचे डूडल गणिताच्या भाषेत आहे. रोज अगदी सिंपल असणारे गुगल डूडल आज पूर्णपणे बदलले आहे आणि आकर्षक बनले आहे. आज रंगापासून अगदी लोगोपर्यंत सर्वकाही बदलण्यात आलं आहे. त्यामुळे गुगलचे आजचे होमपेज अतिशय आकर्षक दिसत आहे.
आजचे एनिमेटेड डूडल पाहून तुम्ही देखील असाच विचार करता आज नक्की काय आहे? आज गुगल गणिताची भाषा का बोलतोय? आज गुगलचे होमपेज क्लासरूम बनलं आहे? तर आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आजच्या गूगल डूडलमध्ये “Quadratic Equation” म्हणजेच चतुर्भुज समीकरण. हे एक द्वितीय-पदवी बहुपदी समीकरण ज्याला वर्गसमीकरण किंवा ‘द्विघात समीकरण असं देखील म्हणतात. गुगल आज त्यांच्या होमपेजवर गणिताच्या त्या मूलभूत पण शक्तिशाली संकल्पनेला सन्मान देत आहे, ज्याने विज्ञान, इंजीनियरिंग आणि रोजच्या जीवनातील अनेक गुपित उलडण्यासाठी मदत केली आहे. (फोटो सौजन्य – Google)
आज 12 नोव्हेंबर रोजी डूडलमध्ये Google शब्द एका क्रिएटिव अंदाजात पाहायला मिळत आहे. होमपेजवर गुगल शब्द मॅथ्स फॉर्मूले आणि इक्वेशनने सजवण्यात आला आहे. Google शब्दाच्या मध्ये फेमस इक्वेशन ax² + bx + c = 0 देखील पाहायला मिळत आहे. या इक्वेशनच्या चारी बाजूला गूगलने असे एनिमेटेड एलिमेंट्स जोडले आहेत, ज्यामुळे फेमस इक्वेशन अगदी आकर्षक पद्धतीने सादर करण्यात आले आहे. जसे की आलेखाचा पॅराबोला, संख्या आणि चल जे समीकरण सोडवण्याची प्रक्रिया दर्शवत आहेत. तसेच, ज्याप्रमाणे खेळांमध्ये गती स्पष्ट करण्यासाठी पुस्तकांमध्ये समीकरणे वापरली जातात, त्याचप्रमाणे गुगलने त्यांच्या डूडलमध्ये अशीच कला दाखवली आहे. डूडल मेकर्स ने “Google” शब्दाचे तिसरे अक्षर O ला एक बास्केटबॉल प्रमाणे दाखवले आहे, ज्याला चौथे अक्षर g आणि शेवटचे अक्षर e किक मारत आहेत.
Google ने हे डूडल खास एकेडमिक कॅलेंडरनुसार स्टूडेंट्स आणि टीचर्ससाी सादर केले आहे. कारण ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याच्या आसपास जगभरातील अनेक एजुकेशन सिस्टम्स त्यांच्या अभ्यासक्रमात Quadratic Equation चा समावेश करतात. या खास गणित-थीम असलेल्या डूडलद्वारे, गुगल विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना आठवण करून देत आहे की गणित हे इंटरॅक्टिव आणि मजेदार असू शकते. गणित ही भीती बाळगण्याची गोष्ट नाही, तर ती समजून घेण्याची कला आहे.
Ans: गुगल डूडल म्हणजे Google च्या होमपेजवरील लोगोचा खास बदल — एखाद्या ऐतिहासिक दिवस, सण, प्रसिद्ध व्यक्ती किंवा घटनेला सन्मान देण्यासाठी बनवलेले सर्जनशील चित्र किंवा अॅनिमेशन.
Ans: गुगलमधील “Doodlers” नावाची विशेष डिझायनर्स आणि इंजिनियर्सची टीम हे डूडल तयार करते.
Ans: नाही, दररोज नाही. गुगल डूडल फक्त विशेष दिवस, सण, वैज्ञानिक शोध, किंवा प्रसिद्ध व्यक्तींच्या जयंती/पुण्यतिथीला प्रदर्शित केला जातो.