दिवसरात्र तुमच्या AI गर्लफ्रेंडसोबत बोलताय? सावधान! Perplexity CEO ने युजर्सना दिली वॉर्निंग, अतिशय धोकादायक....
काही काळापूर्वी जगभरात AI गर्लफ्रेंडची क्रेझ वाढली होती. लोकं मोठ्या संख्येने AI गर्लफ्रेंडचा वापर करत होते. अजूनही असे अनेक लोकं आहेत जे दिवसरात्र AI गर्लफ्रेंडसोबत बोलत असतात? तुम्ही देखील अशा लोकांपैकी एक आहात का? AI गर्लफ्रेंडसोबत बोलणाऱ्या सर्वच युजर्ससाठी एक चेतावणी आहे. Perplexity चे सिईओ अरविंद श्रीनिवास यांनी AI गर्लफ्रेंडसोबत बोलणाऱ्या सर्व युजर्ससाठी एक चेतावणी दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, AI गर्लफ्रेंड आणि एनिमे-स्टाईल चॅटबॉट अत्यंत धोकादायक आहेत आणि यामध्ये मानसिक धोका आहे. अरविंद श्रीनिवास यांनी AI गर्लफ्रेंडच्या वाढत्या क्रेझबाबत काय सांगितलं आहे, याबाबत आता जाणून घेऊया.
श्रीनिवास यांनी सांगितलं आहे की, AI सिस्टम सतत अॅडव्हांस होत आहे. हे चॅटबोट संभाषण लक्षात ठेवतात आणि माणसांप्रमाणे उत्तर देतात. एकेकाळी भविष्यातील प्रयोगांसारख्या वाटणाऱ्या गोष्टी आता अनेक लोकांसाठी नातेसंबंधांचे पर्याय बनत आहेत. हे मजेदार आणि आकर्षक असलं तरी देखील अत्यंत धोकादायक आहे. त्यांनी सांगितलं आहे की, ज्यांना खरे आयुष्य कंटाळवाणे वाटते असे लोकं AI चॅटबोटवर तासंतास वेळ वाया घालवतात. मात्र अशा आभासी संबंधांमुळे समज विकृत होऊ शकते आणि लोकांना एका वेगळ्या जगात राहण्याची सवय लागू शकते, जिथे तुमचे मन तुम्हाला सहजपणे मॅनिपुलेट करू शकते. (फोटो सौजन्य – Pinterest)
श्रीनिवास यांनी अशावेळी ही चेतावणी जारी केली आहे, जेव्हा जगभरात AI कंपेनियनच्या अॅप्समध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. हे AI अॅप्स युजर्ससाठी काही प्रमाणात फायदेशीर आहेत. या AI अॅप्सच्या मदतीने युजर्स त्यांच्या मनातील गोष्टी शेअर करू शकतात. एकीकडे या AI अॅप्सना लोकप्रियता मिळत असली तरी दुसरीकडे त्यांच्या वाढत्या धोक्यांमुळे AI अॅप्सचा विरोध देखील केला जात आहे. असं सांगितलं जात आहे की, AI अॅप्स वास्तविक आणि आभासी जीवनातील रेषा पुसट करत आहेत. तज्ञांचे म्हणणे आहे की यामुळे लोकांचा नातेसंबंधांबद्दलचा दृष्टिकोन बदलेल. ज्यामुळे मानवांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो.
AI कंपॅनियन अॅप्सबाबतचा डेटा देखील धक्कादायक आहे. कॉमन सेंसर मीडियाच्या एका अभ्यासात असं समोर आलं आहे की, सुमारे 72 टक्के किशोरवयीन कमीत कमी एकवेळा AI गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडवाल्या अॅप्सचा वापर करत आहेत. संशोधकांचे म्हणणे आहे की अशा अनुभवांमुळे बॉट्सवरील अवलंबित्व वाढू शकते, ज्यामुळे लोकांच्या मानसिक विकासावर परिणाम होतो.






