Tecno PoP 9 5G: 48MP Sony AI कॅमेरा असलेला Tecno फोन या दिवशी होणार लाँच
टेक कंपनी Tecno पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन बजेट स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत येत्या 2 दिवसांतच हा स्मार्टफोन लाँच केला जाणार आहे. पण स्मार्टफोनच्या लाँचिंगआधीच त्याचे काही डिटेल्स समोर आले आहेत. Tecno आपल्या ग्राहकांना POP सिरीज स्मार्टफोन्समध्ये परवडणारी डिव्हाइस ऑफर करते. या सीरिजमध्ये कंपनी एक नवीन फोन लाँच करणार आहे. यावेळी Tecno या सिरीजमध्ये 5G फोन लाँच करत आहे. या सिरीजचा मागील फोन POP 8 होता , ज्याची किंमत केवळ 5,849 रुपये आहे.
हेदेखील वाचा- Amazon-Flipkart Festive Sale: अॅमेझॉन-फ्लिपकार्टच्या सेलमधून खरेदी करताना काळजी घ्या, एक चुकीचं क्लिक आणि होईल लाखोंच नुकसान
आता या सिरीजअतर्गत कंपनी Tecno PoP 9 5G स्मार्टफोन लाँच करणार आहे. या टेक्नो फोनचे लँडिंग पेज ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Amazon वर लाइव्ह झाले आहे. यासोबतच लाँचपूर्वी कंपनीने फोनच्या काही स्पेसिफिकेशन्सचीही माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वीच कंपनीचा Tecno Pova 6 Neo चा 5G स्मार्टफोन बाजारात लाँच झाला आहे. यामध्ये AI फीचर्स देखील देण्यात आले आहेत. या फोनचा 4G प्रकार काही महिन्यांपूर्वी जागतिक स्तरावर लाँच करण्यात आला होता. आता त्याचा 5G वर्जन भारतात लाँच केला जाणार आहे. टेक्नो हा फोन पोवा सीरीज अंतर्गत आणत आहे. (फोटो सौजन्य – X)
Tecno Pova 6 Neo 5G स्मार्टफोननंतर आता कंपनी Tecno PoP 9 5G स्मार्टफोन लाँच करणार आहे. उत्कृष्ट फीचर्स आणि बजेट किंमतीत हा स्मार्टफोन लाँच केला जाणार आहे. कंपनीने या आगामी फोनच्या लाँच डेटबद्दल माहिती दिली आहे. टेक्नोचा हा फोन 24 सप्टेंबरला लाँच होणार आहे. याशिवाय कंपनीने फोनच्या किंमतीबाबत एक सूचनाही दिली आहे. या फोनची किंमत 4 अंकी क्रमांकांसह दर्शविली आहे. या फोनची किंमत Rs. याचा अर्थ असा की टेक्नोच्या नवीन फोनची किंमत 10,499 रुपयांपेक्षा कमी असणार आहे. हा फोन 9,499 रुपयांना लाँच केला जाऊ शकतो.
Tecno PoP 9 5G मध्ये 48MP Sony AI कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनी या सेगमेंटमध्ये पहिला 48MP Sony AI कॅमेरा असलेला फोन आणत आहे.
हेदेखील वाचा- Infinix Zero 40 VS Nothing Phone 2a Plus: Infinix की nothing कोणता फोन देणार पैसेवसुल फिचर्स
Tecno PoP 9 5G हा नवीन फोन MediaTek D6300 चिपसेट सह आणला जात आहे.
Tecno PoP 9 5G फोन दोन प्रकारात आणला जात आहे. फोन 4GB + 64GB आणि 4GB + 128GB व्हेरिएंटमध्ये खरेदी केला जाऊ शकतो.
Tecno PoP 9 5G मध्ये 120Hz रेट असलेला डिस्प्ले दिला जाऊ शकतो. टेक्नो फोनसोबत बॉक्समध्ये दोन मोफत स्क्रिन देण्यात येत आहेत.
टेक्नोचा आगामी फोन 5000mAh बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग फीचरसह आणला जात आहे.
या फोनची किंमत 4 अंकी क्रमांकांसह दर्शविली आहे. या फोनची किंमत Rs. याचा अर्थ असा की टेक्नोच्या नवीन फोनची किंमत 10,499 रुपयांपेक्षा कमी असणार आहे. हा फोन 9,499 रुपयांना लाँच केला जाऊ शकतो.