मुंबई, मे १६, २०२४: मायक्रोसॉफ्ट आणि लिंक्डइनने आज भारतातील कामाच्या ठिकाणी एआयच्या स्थितीवरील २०२४ वर्क ट्रेण्ड इंडेक्सच्या निष्पत्तींना जारी केले. अहवाल ‘एआय अॅट वर्क इज हिअर. नाऊ कम्स द हार्ड पार्ट’ फक्त एका वर्षामध्ये एआयचा कर्मचाऱ्यांच्या काम, नेतृत्व व नियुक्ती करण्याच्या पद्धतीवर पडलेल्या प्रभावाला निदर्शनास आणतो. हा अहवाल कामाच्या ठिकाणी एआयचा समावेश करण्याप्रती कर्मचाऱ्यांच्या प्रबळ महत्त्वाकांक्षेला निदर्शानास आणतो, तसेच करिअर विकासासाठी निर्माण होणाऱ्या संधी आणि एआय वापरकर्त्यांना भावी कामकाज पद्धतींमध्ये देणाऱ्या पाठिंब्याला प्रकाशझोतात आणतो.
मायक्रोसॉफ्ट आणि लिंक्डइनने एआय कामाच्या पद्धतीला कशाप्रकारे आकार देत आहे याबाबत सर्वसमावेशक दृष्टीकोन प्रदान करण्यासाठी चौथ्या वर्क ट्रेण्ड इंडेक्सकरिता पहिल्यांदाच सहयोग केला. या निष्पत्ती ३१ देशांमधील ३१,००० व्यक्तींचे सर्वेक्षण, लिंक्डइनवरील लेबर व हायरिंग ट्रेण्ड्स, मायक्रोसॉफ्ट ३६५ चे ट्रिलियन्स उत्पादकता सिग्नल्स अणि फॉर्च्युन ५०० ग्राहकांसोबत संशोधनावर आधारित आहेत.
हा अहवालात प्रत्येक प्रमुख व व्यावसायिकांना भावी वर्षांमध्ये काम, टॅलेंट व हायरिंगवरील एआयच्या प्रभावाबाबत माहित असणे आवश्यक असलेले तीन इनसाइट्स दिले आहेत:
1. कर्मचाऱ्यांची कामाच्या ठिकाणी एआय असण्याची महत्त्वाकांक्षा आहे आणि कंपन्यांनी ती सुविधा उपलब्ध करून देण्याची अधिक वाट पाहू शकत नाही
भारतातील कर्मचारीवर्ग एआयबाबत अत्यंत आशावादी आहे. भारतातील ब्याण्णव टक्के हुशार कर्मचारी कामाच्या ठिकाणी एआयचा वापर करतात, तुलनेत हे प्रमाण जागतिक स्तरावर ७५ टक्के आहे, ज्यामधून वेळेची बचत करण्यासाठी, सर्जनशीलता व अवधान वाढवण्यासाठी एआयवरील कर्मचाऱ्यांचा विश्वास दिसून येतो. भारतातील एक्याण्णव टक्के प्रमुखांचा विश्वास आहे की, स्पर्धात्मक राहण्यासाठी त्यांच्या कंपन्यांनी एआयचा अवलंब करण्याची गरज आहे, पण ५४ टक्के कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंपनीमध्ये अंमलबजावणीसाठी प्लान व दृष्टीकोनाचा अभाव असल्याबाबत चिंता आहे.
प्रमुखांना वैयक्तिक उत्पादकता नफ्याला कंपनीच्या फायद्यासाठी कामी आणण्याचा दबाव वाटत असताना कर्मचारी लाभांचा फायदा घेण्यास अधिक वाट पाहू शकत नाहीत. ७२ टक्के भारतीय एआय वापरकर्ते कामाच्या ठिकाणी त्यांचे स्वत:चे एआय टूल्स आणत आहेत. या डेटामधून स्पष्टपणे निदर्शनास येते की, कर्मचारी कामाच्या ठिकाणी अधिक उत्पादनक्षम व सर्जनशील असण्यासाठी एआयचा वापर करत आहेत. प्रत्येक प्रमुखासाठी या गतीला आरओआयमध्ये बदलण्याची संधी आहे.
2. कर्मचाऱ्यांसाठी एआय स्तर उंचावते आणि करिअरमधील अडथळयांना दूर करते:
लिंक्डइन जॉब पोस्ट्समध्ये एआयचा उल्लेख प्रतिसादामध्ये १७ टक्क्यांची वाढ करणाऱ्या विश्वामध्ये दोन मार्ग उपलब्ध आहेत: कर्मचाऱ्यांना एआय टूल्स व प्रशिक्षणासह सक्षम करणाऱ्या कंपन्यांकडे सर्वोत्तम टॅलेंटचे लक्ष वेधले जाईल आणि एआयमध्ये कुशल असलेल्या व्यावसायिकांना प्राधान्य दिले जाईल.
भारतातील प्रमुखांसाठी, हायरिंगसंदर्भात आता एआय स्किल्सना सर्वाधिक प्राधान्य दिले जाते, जेथे ७५ टक्के प्रमुख म्हणतात की ते एआय स्किल्स नसलेल्या कर्मचाऱ्याला नियुक्त करणार नाहीत. हे प्रमाण जागतिक सरासरी ६६ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. रोचक बाब म्हणजे अनुभवापेक्षा एआय स्किल्सना अधिक प्राधान्य दिले जाते, जेथे भारतातील ८० टक्के प्रमुख अनुभवी उमेदवाराऐवजी एआय स्किल्स असलेल्या कमी अनुभवी उमेदवाराला नियुक्त करण्यास प्राधान्य देतात.
गेल्या वर्षाच्या अखेरीस आपल्या प्रोफाइल्समध्ये कोपायलट व चॅटजीपीटी असे एआय स्किल्स असलेल्या जागतिक स्तरावरील लिंक्डइन सदस्यांमध्ये १४२ पट वाढ झाली आहे आणि एआय योग्यता निर्माण करण्यासाठी लिंक्डइन लर्निंग कोर्सेसचा वापर करणाऱ्या नॉन-टेक्निकल व्यावसायिकांमध्ये १६० टक्के वाढ झाली आहे.
3. एआय पॉवर युजर्समध्ये वाढ आणि त्यांनी भविष्याबाबत त्यांचे मत सांगितले:
संशोधनामधून चार प्रकारचे एआय वापरकर्ते निदर्शनास आले – एआयचा क्वचितच वापर करणारे शंका असलेले वापरकर्ते, एआयचा मोठ्या प्रमाणात वापर करणारे पॉवर युजर्स, अनुनभवी व एक्स्लोरर्स. शंका असलेल्या वापरकर्त्यांच्या तुलनेत एआय पॉवर युजर्सनी त्यांच्या कामकाज पद्धतीमध्ये सुधारणा केली आहे, जेथे ९० टक्के भारतीय एआय पॉवर युजर्स एआयसह दिवसाची सुरूवात करतात आणि ९१ टक्के दुसऱ्या दिवसासाठी सज्ज असण्याकरिता एआयवर अवलंबून आहेत. ३७ टक्क्यांहून अधिक पॉवर युजर्स उपयुक्त प्रॉम्प्ट्ससंदर्भात सह-कर्मचाऱ्यांकडून मार्गदर्शन घेण्याची शक्यता आहे अणि ४७ टक्क्यांहून अधिक पॉवर युजर्स एआयसह प्रयोग करण्याची शक्यता आहे.
तसेच, जवळपास २० टक्के एआय पॉवर युजर्सना इतर कर्मचाऱ्यांच्या तुलनेत विशेषत: प्रॉम्प्ट्स आणि भूमिके-संबंधित एआय वापराबाबत प्रशिक्षण मिळण्याची शक्यता आहे. ६५ टक्के पॉवर युजर्सना जनरेटिव्ह एआयबाबत सीईओकडून मार्गदर्शन मिळण्याची शक्यता देखील आहे, ३४ टक्के पॉवर युजर्सना फंक्शन किंवा डेव्हलपमेंट प्रमुखांकडून आणि ४४ टक्के पॉवर युजर्सना त्यांच्या व्यवस्थापकांकडून मार्गदर्शन मिळण्याची शक्यता आहे.
मायक्रोसॉफ्ट इंडिया व साऊथ एशियाच्या व्यवस्थापकीय संचालक इरिना घोष म्हणाल्या, ”वर्क ट्रेण्ड इंडेक्समधील डेटामधून निदर्शनास येते की एआाय आता कामाच्या ठिकाणी वास्तविकता बनले आहे, जेथे भारतातील हुशार कर्मचाऱ्यांमध्ये एआयचा अवलंब करण्याचे प्रमाण ९२ टक्क्यांसह सर्वाधिक आहे. बीएफएसआय, आरोग्यसेवा, आयटीईएस आणि सार्वजनिक क्षेत्र अशा क्षेत्रांमध्ये दिसण्यात येणारा वाढता दर अत्यंत प्रेरणादायी आहे. या एआय आशावादामधून कंपन्यांना योग्य टूल्स व प्रशिक्षणामध्ये गुंतवणूक करण्याची मोठी संधी मिळते, ज्यामुळे त्यांना कर्मचाऱ्यांसाठी कार्यक्षमता अनलॉक करता येतील आणि दीर्घकाळापर्यंत व्यवसायावर अनुकूल परिणाम होईल.”
लिंक्डइन येथील टॅलेंट अँड लर्निंग सोल्यूशन्सच्या प्रमुख रूची आनंद म्हणाल्या, ”एआय काम करण्याच्या पद्धतीमध्ये परिवर्तन घडवून आणत आहे, टॅलेंट लँडस्केपला नवीन आकार देत आहे आणि व्यक्ती व कंपन्यांना परिवर्तनाचा अवलंब करण्यास प्रेरित करत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत एआय कौशल्यासाठी मागणीमध्ये १७ टक्क्यांची वाढ दिसण्यात आली, जे लिंक्डइन प्लॅटफॉर्म इनसाइट्स आणि वर्क ट्रेण्ड इंडेक्सच्या निष्पत्तींमधून दिसून येते. आम्ही भारतातील व्यावसायिकांना नवीन कौशल्ये शिकण्यासोबत त्यांच्या व्यावसायिक स्तरासाठी एआय कौशल्यांचे ज्ञान मिळवताना पाहिले आहे. कर्मचारीवर्ग एआयचे फायदे घेत असताना प्रमुखांनी तंत्रज्ञान व टॅलेंटमध्ये विचारशील गुंतवणूक करत त्यांच्या कंपनीच्या एआय क्षमतांना गती देणे महत्त्वाचे आहे.”
गेल्या सहा महिन्यांमध्ये जागतिक स्तरावर कामाच्या ठिकाणी जनरेटिव्ह एआयचा वापर जवळपास दुप्पट झाला आहे. लिंक्डइनला आपल्या प्रोफाइल्समध्ये एआय कौशल्यांची भर करणाऱ्या व्यावसायिकांच्या आकडेवारीत मोठी वाढ होताना दिसण्यात येत आहे. पण, भारतातील प्रत्येक दुसऱ्या प्रमुखाला चिंता होती की त्यांच्या कंपनीमध्ये एआय दृष्टीकोनाचा अभाव आहे आणि कर्मचारी कामाच्या ठिकाणी त्यांचे स्वत:चे एआय टूल्स आणत आहेत, प्रमुखांनी प्रयोग करण्यापासून व्यावसायिक परिणामापर्यंत तंत्रज्ञानामधील अडथळ्यांचा सामना केला आहे.
[read_also content=”फोनची बॅटरी लवकर संपत आहे? मग सेटिंगमध्ये करा बदल, वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/technology/phone-battery-draining-quickly-then-change-the-settings-read-in-detail-534467.html”]
या अहवालाच्या आधारावर मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना एआयसह सुरूवात करण्यास मदत करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट ३६५ करिता कोपायलटमधील नवीन क्षमतांची घोषणा केली आणि लिंक्डइनने ५० हून अधिक लर्निंग कोर्सेसची घोषणा केली, जे एआय योग्यता प्रगत करण्यासाठी सर्व स्तरांवरील व्यावसायिकांना सक्षम करण्याकरिता मोफत देण्यात आले आहेत.
८ जुलैपासून मोफत उपलब्ध असणाऱ्या ५० नवीन एआय लर्निंग कोर्सेसव्यतिरिक्त लिंक्डइन पुढील सेवा देते:
अधिक माहितीसाठी Official Microsoft Blog व 2024 Work Trend Index Report ला भेट द्या आणि कंपनीचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ करिन किमब्रो यांचे मत जाणून घेण्यासाठी LinkedIn येथे भेट द्या.