Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्मार्टफोनला स्क्रीनगार्ड लावण्याआधी ‘या’ गोष्टी ध्यानात असूद्यात, नुकसान होणार नाही

फोनच्या सुरक्षिततेसाठी स्क्रीन गार्ड खरेदी केला जातो. मात्र असा तसा स्क्रीन गार्ड तुमच्या फोनसाठी धोकादायक ठरू शकतो. कोणत्या प्रकारचे स्क्रीन गार्ड फोनसाठी सुरक्षित असतात, जाणून घ्या. (फोटो सौजन्य: istock)

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 25, 2024 | 10:46 AM
स्मार्टफोनला स्क्रीनगार्ड लावण्याआधी 'या' गोष्टी ध्यानात असूद्यात

स्मार्टफोनला स्क्रीनगार्ड लावण्याआधी 'या' गोष्टी ध्यानात असूद्यात

Follow Us
Follow Us:

आजच्या काळात स्मार्टफोन ही प्रत्येक व्यक्तीची प्रमुख गरज बनली आहे. स्मार्टफोनशिवाय कोणत्याही कामाची कल्पनाही करता येत नाही. ऑनलाइन पेमेंट करण्यापासून फोन कॉल करणे आणि व्हिडिओ पाहणे या सर्व गोष्टींसाठी हा फोन उपयुक्त आहे. आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित हे उपकरण पुन्हा पुन्हा खरेदी करता येत नाही. तुम्ही एकदा फोन विकत घेतला की तुम्हाला तो 2 ते 3 वर्षे वापरावा लागेल. अशा परिस्थितीत फोनची सुरक्षा फार महत्त्वाची असते.

डिस्प्ले हा फोनमधील सर्वात नाजूक भाग आहे. तुटलेल्या डिस्प्लेमुळे फोन निरुपयोगी होतो. आपल्या फोनचा डिस्प्ले सुरक्षित ठेवण्यासाठी, योग्य स्क्रीन गार्ड निवडणे महत्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला स्क्रीन गार्ड खरेदी करताना कोणत्या प्रमुख गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबबाबत सविस्तर सांगत आहोत.

फोनच्या स्क्रिन गार्ड या गोष्टी ध्यानात असूद्यात

अँटी स्क्रॅच गार्ड

तुम्ही तुमच्या फोनसाठी स्क्रीन गार्ड निवडत असल्यास, त्याची अँटी-स्क्रॅच गुणधर्म लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. गार्डसह फोनला कात्री, चावी, ब्लेड किंवा अशा कोणत्याही धारदार वस्तूने इजा होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी लागेल. अनेक वेळा फोन खिशात ठेवला जातो, अशा स्थितीत फोनजवळ चावी ठेवल्याने फोनची स्क्रीन खराब होऊ शकते.

स्मूद टच फिलिंग

एक चांगल्या स्क्रीनगार्ड निवडण्यासोबतच, तुम्ही त्याच्या स्मूथ टचची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. जितक्यांदा तुम्ही तुमच्या फोन स्क्रीनवर आपली बोटे चालवाल तितक्यांदा तुम्हाला एक स्मूद फिलिंग मिळणे आवश्यक आहे. फोनचा स्क्रीन गार्ड असा असावा की, त्याला स्पर्श केल्यावर तो मूळ स्क्रीनसारखा वाटेल. खराब दर्जाचे स्क्रॅच गार्ड खडबडीत काचेच्या फर्म्समधून बनवले जातात, जो स्मूद टच नाही देऊ शकत.

हेदेखील वाचा – भारतात सुरु झाली UPI ची नवीन सर्व्हिस, कशाप्रकारे वापर करावा? जाणून घ्या

परफेक्ट साइझ

स्क्रीनगार्ड फोनच्या स्क्रीनच्या अगदी वर ठेवला आहे. अशा परीस्थितीत फोन योग्य प्रकारे वापरता यावा यासाठी स्क्रीनगार्ड योग्य आकाराचा असणे फार महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवा की, स्क्रीनगार्डने फोन स्क्रीनचे संपूर्ण कव्हरेज दिले पाहिजे. तसेच, स्क्रीन गार्ड फोनवर अशा प्रकारे बसवावा की त्यावर हवेचा बबल दिसणार नाही.

एंटी फिंगरप्रिंट आणि ऑइल

फोनची गरज प्रत्येक वेळी असते. अशा परिस्थितीत अनेकजण हात न धुता फोन वापरतात. अनेकजण पाणी, तेल आणि धूळ असलेले हातही फोनला स्पर्श करतात. अशा स्थितीत फोनचा स्क्रीन गार्ड असा निवडावा जो अँटी फिंगरप्रिंट आणि अँटी ऑइल असेल. फोनवर फिंगरप्रिंट्स तयार झाल्यास फोनच्या डिस्प्लेची क्लॅरिटी खराब होऊ शकते.

 

Web Title: Things to consider before buying a screen protector for smartphones

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2024 | 09:09 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.