फोटो सौजन्य -iStock
हल्ली सहसा प्रत्येकाच्या घरी वायफाय असतो. कारण मोबाईल, लॅपटॉप आणि स्मार्ट ट्विही सर्वांसाठी इंटरनेटची गरज असते आणि अनलिमिटेड इंटरनेटसाठी वायफाय बेस्ट ऑप्शन आहे. कारण एका वायफाय रिचार्जमध्ये तुम्ही मोबाईल, लॅपटॉप आणि स्मार्ट ट्विही या सर्व गोष्टींचा आनंद घेऊ शकता. पण काहीवेळा वायफाय कनेक्शनचे चार्जेस खूप जास्त असतात आणि त्यासोबतच राऊटर खरेदी करण्याचा खर्च देखील आलाच. त्यामुळे अनेक लोकं वायफाय खरेदी करणं टाळतात. तुम्ही सुध्दा कनेक्शन चार्जेस आणि राऊटरच्या खर्चामुळे वायफाय खरेदी करणं टाळत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. टेलिकॉम कंपनी Airtel त्यांच्या ग्राहकांसाठी फ्री वायफाय देत आहे, एवढंच नाही तर यासोबत तुम्हाला फ्री राऊटर देखील मिळणार आहे.
टेलिकॉम कंपन्यांच्या टॅरेफि प्लॅनच्या किंमतीत 3 जुलैपासून प्रचंड वाढ झाली आहे. रिचार्जमध्ये मिळणाऱ्या सुविधा जरी सारख्या असल्या तरी किंमती बदलल्या आहेत. त्यामुळे युजर्सनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता या नाराज असलेल्या युजर्ससाठी Airtel च्या फ्री वायफायची ऑफर अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. पण Airtel ने यासाठी एक अट ठेवली आहे. Airtel च्या फ्री वायफाय सुविधेचा लाभ घेण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला वायफायचा 499 चा रिचार्ज करावा लागणार आहे. हा रिचार्ज झाल्यानंतर तुम्हाला फ्री वायफाय कनेक्शन आणि राऊटर मिळणार आहे.
म्हणजेच केवळ 499 रुपयांमध्ये तुम्हाला फ्री वायफाय कनेक्शन आणि राऊटर मिळणार आहे. यामुळे तुम्ही तुमच्या स्मार्ट टिव्हीवर चित्रपट, सिरीज यासांरख्या गोष्टींचा आनंद घेऊ शकता. Airtel वायफाय तुमच्या सर्व इंटरनेट समस्या आणि फोन समस्यांवर उपाय आहे. याबाबत Airtel ने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर माहिती दिली आहे.Airtel च्या वायफाय प्लॅनमध्ये 499 सह इतर अनेक प्लॅन देखील उपलब्ध आहेत. Airtel वायफायच्या बेसिक प्लॅनची किंमत 499 रुपये प्रति महिना आहे आणि यामध्ये 40 Mbps पर्यंत इंटरनेट स्पीड आणि Airtel Thanks फायदे आहेत.
तसेच एंटरटेनमेंट प्लॅन 999 रुपये प्रति महिना मिळू शकतो आणि तो तुम्हाला 200 Mbps पर्यंतचा इंटरनेट स्पीड आणि Disney + Hotstar आणि Amazon Prime सारख्या OTT ॲप्सचे सबस्क्रिप्शन देतो. व्यावसायिक प्लॅनची किंमत 1498 रुपये प्रति महिना आहे जी तुम्हाला 300 Mbps पर्यंत इंटरनेट स्पीड आणि Netflix Basic, Disney + Hotstar आणि Amazon Prime सारख्या OTT ॲप्सचे सबस्क्रिप्शन देते. जर तुम्हाला 1 Gbps पर्यंतचा स्पीड आणि Netflix Premium, Disney + Hotstar आणि Amazon Prime सारख्या OTT ॲप्सचे सबस्क्रिप्शन पाहिजे असेल, तर तुम्ही Infinity Plan घेऊ शकता ज्याची किंमत 3999 रुपये प्रति महिना आहे.