Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बनावट पेमेंट ॲप्सचा नवा ट्रेंड, व्यापाऱ्यांनी जागरूक राहणं गरजेचं! फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी वाचा टीप्स

काही फसवी ॲप्स पेमेंट मिळाल्याची खोटी नोटिफिकेशन सेंड करतात. ज्यामुळे व्यापाऱ्यांचा गैरसमज होतो. अशा फसव्या ॲप्सपासून व्यापाऱ्यांनी सावध राहणं गरेजंच आहे, अन्यथा त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 05, 2024 | 02:36 PM
बनावट पेमेंट ॲप्सचा नवा ट्रेंड, व्यापाऱ्यांनी जागरूक राहणं गरजेचं! फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी वाचा टीप्स

बनावट पेमेंट ॲप्सचा नवा ट्रेंड, व्यापाऱ्यांनी जागरूक राहणं गरजेचं! फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी वाचा टीप्स

Follow Us
Close
Follow Us:

बनावट पेमेंट ॲप्सचा समावेश असलेल्या फसवणुकीचा एक भयानक नवीन ट्रेंड सुरू झाला आहे, ज्याबद्दल व्यापाऱ्यांनी जागरूक असणं गरेजचं आहे. या ट्रेंडमध्ये कायदेशीर पेमेंट ॲप्लिकेशनची नक्कल करून बनावट पेमेंट ॲप्स तयार केले जात आहेत. हे बनावट पेमेंट ॲप्स UI, रंगांच्या स्कीम आणि एकूण स्वरूपाशी एकदम साधर्म्य ठेवतात. त्यामुळे खरे पेमेंट ॲप्स आणि बनावट पेमेंट ॲप्स यांच्यामध्ये फरक ओळखणं फार कठीण आहे.

हेदेखील वाचा- TRAI देतोय तीन महिने मोफत रिचार्ज? 200GB डेटासह अमर्यादित कॉलिंग देखील उपलब्ध! काय आहे सत्य, वाचा

पहिल्यांदा पाहता क्षणी दोन्ही ॲप्स अगदी एकसारखे वाटू लागतात. त्यामुळे कोणता ॲप खरा आहे आणि कोणता ॲप बनावट आहे, हे ओळखता येत नाही. यापैकी काही फसवी ॲप्स पेमेंट मिळाल्याची खोटी सूचना देण्यासाठी पेमेंट नोटिफिकेशनच्या आवाजाचेही अनुकरण करतात आणि लोकांना गोंधळात टाकतात. तसेच ते व्यवहार यशस्वी झाला आहे, हे दाखवण्यासाठी खात्रीशीर पेमेंटची माहिती देऊ शकतात. त्यामुळे हे ॲप्स बनावट आहेत, अशी लोकांना शंका येत नाही. (फोटो सौजन्य – pinterest)

पण या बनावट ॲप्समुळे लोकांचे मोठं नुकसान होतं, हे मात्र खरं आहे. बनावट पेमेंट ॲप्सचा हा ट्रेंड सध्या व्यापाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या बनावट ॲप्सपासून व्यापाऱ्यांनी स्वत:ला कशाप्रकारे सुरक्षित ठेवावं, यासाठी फोनपेच्या सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी काही टीप्स शेअर केल्या आहेत.

सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी शेअर केलेल्या या टीप्स व्यापाऱ्यांना बनावट पेमेंट ॲप्सपासून सुरक्षित राहण्यासाठी मदत करणार आहेत. बनावट पेमेंट ॲप घोटाळ्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी फोनपेच्या सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी व्यापाऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण टिप्स शेअर केल्या आहेत.

हेदेखील वाचा- BSNL लाँच करणार 200MP कॅमेरा असलेला 5G स्मार्टफोन? कंपनीने सोशल मिडीयावर केला खुलासा

  • व्यवसायांचे रक्षण करण्यासाठी व्यापाऱ्यांनी सावध राहावे आणि त्यांच्या पेमेंट ॲप किंवा बँक खात्याद्वारे व्यवहार डिटेल्सची काळजीपूर्वक तपासणी करावी.
  • या व्यवहारामध्ये काही तफावत आढळल्यास डिटेल्सची तपासणी करावी.
  • ग्राहकांनी गर्दीचा फायदा घेऊन वापरलेल्या युक्त्यांपासून सावध रहावे आणि अपरिचित पेमेंट ॲप्स वापरणे टाळावे.
  • व्यापाऱ्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना बनावट पेमेंट ॲप घोटाळ्यांबद्दल माहिती दिली पाहिजे आणि फसवे व्यवहार कसे शोधायचे हेही समजावून दिले पाहिजे.
  • व्यापारी वस्तू किंवा सेवा देण्यापूर्वी पेमेंटची पडताळणी करण्यासाठी एक स्टँडर्ड प्रक्रिया लागू करू शकतात.
  • यामध्ये व्यवहार आयडी तपासणे किंवा तुमच्या पेमेंट प्रोसेसरकडून कन्फर्मेशनची वाट पाहाणे यांचा समावेश असू शकतो.
  • जर तुम्हाला बनावट पेमेंट ॲपचा समावेश असलेल्या फसव्या ॲक्टिव्हिटींचा संशय आला, तर संबंधित अधिकाऱ्यांकडे आणि तुमच्या पेमेंट प्रोसेसरकडे त्वरित त्याची तक्रार करा.

फोनपे ॲपचा वापर करून तुमची फसवणूक झाल्यास, तुम्ही फोनपे ॲपवर किंवा कस्टमर केअर नंबर 080–68727374 / 022–68727374 वर किंवा फोनपेच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर कॉल करून अशा घोटाळ्यांची त्वरित तक्रार करू शकता. तसेच, तुम्ही जवळच्या सायबर क्राइम सेलमध्ये फसवणुकीच्या तक्रारी नोंदवू शकता किंवा https://www.cybercrime.gov.in/ वर ऑनलाइन तक्रार नोंदवू शकता किंवा सायबर क्राइम सेल हेल्पलाइन 1930 वर संपर्क साधू शकता.

Web Title: Trend of fake payment app is increasing day by day merchant must follow safety to avoid this kind of fraud

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2024 | 02:36 PM

Topics:  

  • cyber security experts

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.