Upcoming Smartphones in 2024: Redmi पासून Realme पर्यंत या कंपन्या लाँच करणार बजेट फ्रेंडली स्मार्टफोन
ऑक्टोबर ते डिसेंबर हा महिना मोबाईल युजर्ससाठी अत्यंत खास असणार आहे. कारण येत्या काही दिवसांत स्मार्टफोन कंपन्या त्यांचे नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहेत. टेक कंपन्या नवीन फीचर्ससह त्यांचे बजेट फ्रेंडली स्मार्टफोन लवकरच लाँच करणार आहेत. या महिन्यात, Vivo X200 सिरीज, Oppo Find X8 डिव्हाइस डिव्हाइस MediaTek च्या डायमेंशन 9400 प्रोसेसरसह लाँच केले जातील. तर Xiaomi 15 सिरीज स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेटसह लाँच केली जाऊ शकते. याशिवाय OnePlus 13, Honor Magic 7 सीरीज देखील या महिन्याच्या अखेरीस लाँच केली जाणार आहे.
हेदेखील वाचा- डिजीटल इंडिया 4 स्तंभांवर आधारित, आयएमसीमध्ये 6G च्या भविष्यावर पंतप्रधानांचं मोठं विधान
Honor Magic 7 सिरीज 30 ऑक्टोबरला चिनी बाजारात लाँच केली जाणार आहे. क्वालकॉमचा फ्लॅगशिप चिपसेट Snapdragon 8 Elite लाइनअपमध्ये Honor Magic 7 सिरीज लाँच होऊ शकते. Honor Magic 7 सिरीज स्मार्टफोनमध्ये अल्ट्रासोनिक इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. Honor Magic 7 मध्ये 5,600 mAh बॅटरी दिली जाणार आहे. Honor Magic 7 सिरीज 100W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 80W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह लाँच केली जाणार आहे. यात 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 180MP पेरिस्कोप टेलीफोटो सेन्सर दिला जाऊ शकतो. (फोटो सौजन्य – X)
Redmi आपली K80 Pro सीरीज तयार करण्यात व्यस्त आहे. Qualcomm चा नवीन Snapdragon 8 Elite प्रोसेसर Redmi K80 Pro मध्ये वापरला जाऊ शकतो, जो वापरकर्त्यांना उत्कृष्ट कामगिरी प्रदान करेल. त्याच्या मागील मॉडेल K70 Pro मध्ये Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर होता. तसेच, Redmi K80 Pro मध्ये 6000mAh सिलिकॉन बॅटरी असू शकते, जी K70 Pro च्या 5000mAh बॅटरीपासून एक मोठी अपग्रेड आहे. हा फोन 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकतो. रेडमी के-सीरीजमध्ये ही पहिलीच वेळ असेल जेव्हा फोनमध्ये केबलशिवाय चार्जिंगचा पर्याय असेल.
हेदेखील वाचा- कर्व्ड की फ्लॅट? कोणता डिस्प्ले तुमच्या स्मार्टफोनसाठी आहे योग्य? जाणून घ्या
Ace 5 आणि Ace 5 Pro स्मार्टफोन्स OnePlus च्या Ace सिरीजमधील अपकमिंग डिव्हाइसेस असू शकतात. OnePlus Ace 5 फोन 6.78 इंच 8T LTPO डिस्प्लेसह येऊ शकतो. याचे 1.5K रिझोल्यूशन असेल. फोन Snapdragon 8 Gen 3 चिपसेटने सुसज्ज असेल. यामध्ये 6,200mAh बॅटरी असू शकते. याशिवाय 100W फास्ट चार्जिंग देखील यामध्ये दिले जाऊ शकते. फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा असेल. OnePlus Ace 5 Pro मध्ये नवीनतम Snapdragon 8 Gen 4 चिपसेट दिला जाऊ शकतो. फोन OxygenOS 15 सह येऊ शकतात जे Android 15 वर आधारित असतील.
गेल्या वर्षी लाँच झालेल्या निओ 9 मालिकेच्या यशानंतर iQOO लवकरच iQOO निओ 10 सिरीज लाँच करू शकते. कंपनी iQOO Neo 10 मध्ये Snapdragon 8 Gen 3 चिपसेट वापरू शकते आणि MediaTek Dimensity 9400 चिपसेट त्याच्या Pro मॉडेलमध्ये वापरता येऊ शकते. कंपनी ही मालिका वर्षाच्या अखेरीस किंवा 2025 च्या सुरुवातीच्या महिन्यांत लॉन्च करू शकते. सीरीजच्या सर्व फोन्समध्ये मेटल मिडल फ्रेमचा वापर केला जाऊ शकतो. iQOO Neo 10 Pro मध्ये डायमेंशन 9400 प्रोसेसर दिला जाईल.
Realme GT Neo 7 मध्ये 1.5K रिझोल्यूशनचा फ्लॅट डिस्प्ले असेल, जो अधिक चांगल्या गेमिंग अनुभवासाठी डिझाइन केलेला आहे.वर्षाच्या अखेरीस हा फोन लाँच होण्याची शक्यता आहे. Realme GT Neo 7 स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 3 चिपसेटसह बाजारात लाँच केला जाऊ शकतो. हा फोन 100 वॉट चार्जिंगला सपोर्ट करेल असा कंपनीचा दावा आहे. या स्मार्टफोनमध्ये 6000 mAh ची बॅटरी मिळू शकते.