हल्ली, कर्व्ड आणि फ्लॅट दोन्ही प्रकारचे डिस्प्ले असलेले स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहेत. परंतु कोणता डिस्प्ले फोन चांगला आहे, कर्व्ड किंवा फ्लॅट असा प्रश्न अनेकांना असतो आहे. स्मार्टफोनसाठी कर्व्ड किंवा फ्लॅट डिस्प्ले निवडणे हे तुमच्या वापराच्या पद्धती आणि प्राधान्यांवर अवलंबून असते. दोन्ही प्रकारच्या डिस्प्लेचे त्यांचे फायदे आणि तोटे आहेत. कर्व्ड डिस्प्ले असलेले फोन फ्लॅट डिस्प्लेपेक्षा अधिक नाजूक असतात. तर फ्लॅट डिस्प्ले फोन कर्व्ड डिस्प्लेपेक्षा थोडे कमी आकर्षक दिसतात.
कर्व्ड की फ्लॅट? कोणता डिस्प्ले तुमच्या स्मार्टफोनसाठी आहे योग्य? जाणून घ्या (फोटो सौजन्य - pinterest)
कर्व्ड डिस्प्ले असलेले स्मार्टफोन अतिशय प्रिमियम आणि आधुनिक दिसतात आणि ते फोनला स्टायलिश लुक देतात. कर्व्ड एज डिस्प्लेचा अनुभव अधिक चांगला बनवतात. काही कर्व्ड डिस्प्ले फोन जेश्चर नियंत्रणे देतात, जसे की एजवरून स्वाइप करताना विशेष शॉर्टकट वापरणे, इत्यादी.
कर्व्ड स्क्रीनवर, चुकून कडांना स्पर्श केल्याने अनेकदा एरर निर्माण होतो. ज्यामुळे वापरकर्त्यांची गैरसोय होते. कर्व्ड डिस्प्ले असलेले फोन फ्लॅट डिस्प्लेपेक्षा तुटण्यास अधिक नाजूक असतात, कारण त्यांच्या एज अधिक संवेदनशील असतात. कर्व्ड डिस्प्लेलाठी स्क्रीन प्रोटेक्टर शोधणे कठीण असू शकते आणि नेहमीपेक्षा जास्त महाग देखील असू शकतात.
फ्लॅट डिस्प्ले असलेल्या फोनवर अपघाती स्पर्श होण्याची शक्यता कमी असते, ज्यामुळे फोन वापरणे अधिक सोयीस्कर होते.फ्लॅट डिस्प्ले अधिक मजबूत असतात आणि तुटण्याची शक्यता कमी असते.
स्क्रीन प्रोटेक्टर आणि कव्हर्स फ्लॅट डिस्प्लेवर बसण्यास सोपे आहेत आणि ते फार महाग नाहीत. फ्लॅट स्क्रीन गेमिंगसाठी योग्य मानल्या जातात, कारण एजवर कोणत्याही स्पर्श समस्या नाहीत.
फ्लॅट डिस्प्ले फोन कर्व्ड डिस्प्लेपेक्षा थोडे कमी आकर्षक दिसू शकतात. फ्लॅट डिस्प्ले कर्व्ड डिस्प्ले सारखा इमर्सिव्ह अनुभव प्रदान करत नाही, कारण स्क्रीन एजपर्यंत पसरत नाही. पण तुम्हाला प्रीमियम डिझाइन आणि स्टायलिश लूक हवा असल्यास कर्व्ड डिस्प्ले तुमच्यासाठी चांगला पर्याय असू शकतो.
तुम्हाला कमी खर्चात, मजबूत आणि दैनंदिन वापरण्यास सोपा असा फोन हवा असल्यास, तुमच्यासाठी फ्लॅट डिस्प्ले अधिक चांगला असेल. खासकरून तुम्ही गेमिंग किंवा सामान्य दैनंदिन वापरावर अधिक लक्ष केंद्रित केल्यास फ्लॅट डिस्प्ले योग्य निवड आहे.