Mark Zuckerberg चा निर्णय Meta ला पडणार भारी! Facebook-Instagram अकाऊंट डिलीट करतायत युजर्स, काय आहे संपूर्ण प्रकरण?
काही दिवसांपूर्वीच मेटा सीईओ मार्क झुकरबर्गने एक घोषणा केली होती, त्याने सांगितलं होतं की कंपनी आता मेटा फॅक्ट-चेकिंग प्रोग्राम बंद करणार आहे. मात्र आता मार्क झुकरबर्गने घेतलेल्या या निर्णयाला तीव्र विरोध केला जात आहे. कंपनीने घेतलेल्या या निर्णयावर युजर्सनी नाराजी व्यक्त केली असून अनेकजण त्यांचे इंस्टाग्राम आणि फेसबूक अकाऊंट डिलीट करत आहेत. झुकरबर्गच्या या घोषणेनंतर युजर्स फेसबुक-इंस्टाग्रामवरून फोटो आणि अकाऊंट वगैरे डिलीट करण्याचे मार्ग शोधत आहेत.
Mahakumbh 2025: कुंभमेळ्यात हरवेलल्या लोकांना शोधणं आता होईल सोपं! AI ची ही सुविधा करणार मदत
अलीकडेच मेटाच्या कंटेट मॉडरेशन पॉलिसीत मोठा बदल करण्यात आला आहे. कंपनीने अमेरिकेतील थर्ड-पार्टी फॅक्ट चेकिंग प्रोग्राम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय जाहीर करताना झुकेरबर्गने म्हटले होते की फॅक्ट-चेकिंग करणारे राजकीयदृष्ट्या पक्षपाती आहेत आणि त्यांनी जिंकण्याऐवजी विश्वास गमावला आहे. मेटा फॅक्ट-चेकिंग प्रोग्रामच्या जागी कंपनी X सारख्या कम्युनिटी नोट्स सादर करण्याच्या तयारीत आहे. त्याची सुरुवात अमेरिकेपासून होईल. झुकेरबर्ग म्हणाला की, भाषण स्वातंत्र्य बहाल करण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
मेटाच्या या निर्णयानंतर युजर्समध्ये प्लॅटफॉर्मची विश्वासार्हता आणि सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. यापैकी काही वापरकर्त्यांनी मेटा प्लॅटफॉर्मचा पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे तर काही त्यांचे फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाऊंट डिलीट करत आहेत. त्यांची भीती अशी आहे की फॅक्ट-चेकिंग प्रोग्राम बंद केल्याने मेटा प्लॅटफॉर्मवर खोट्या आणि दिशाभूल करणारी माहिती वाढेल. ज्यामुळे युजर्सची फसवणूक केली जाऊ शकते.
झुकरबर्गच्या या घोषणेनंतर गुगलवरील लोकांनी फेसबुक आणि इंस्टाग्राम डिलीट करण्याचे मार्ग शोधण्यास सुरुवात केली आहे. आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामसाठी इतर सोशल मीडिया पर्याय शोधण्यासाठी देखील सुरुवात केली आहे. गुगल ट्रेंड्सवर ‘फेसबुक कायमस्वरूपी कसे हटवायचे’ या सर्च टर्मचा स्कोअर 100 पर्यंत पोहोचला होता.
याशिवाय, मोठ्या संख्येने लोक फेसबुकवरून सर्व फोटो हटवण्याचे मार्ग, फेसबुकला पर्याय, फेसबुक सोडणे, थ्रेड्स अकाऊंट डिलीट करणं आणि लॉग इन न करता इंस्टाग्राम अकाऊंट डिलीट करणं यासाठी अनेक मार्ग शोधत आहेत. अलीकडच्या काही दिवसांत, या शोधांमध्ये 5,000 टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली आहे. मार्क झुकरबर्गने घेतलेल्या या निर्णयामुळे फेसबूक आणि इंस्टाग्रामच्या युजर्स संख्येत मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे कंपनीला मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं.
Meta च्या कंटेट मॉडरेशन पॉलिसीत मोठा बदल, Facebook आणि Instagram वर मिळणार आता X चं ‘हे’ फीचर
अमेरिकेतील थर्ड-पार्टी फॅक्ट चेकिंग प्रोग्राम बंद करण्याचा निर्णय मेटाने घेतला आहे. आता या अॅप्सवरील युजर्सचं फॅक्ट चेक करणार आहे. म्हणजे अॅपवर व्हायरल होणारी कोणती बातमी खरी आहे आणि कोणती बातमी खोटी आहे, हे आता युजर्स ठरवणार आहे. कंपनीने आता फॅक्ट चेकिंग प्रोग्रामऐवजी ‘कम्युनिटी नोट्स’ सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.