Meta च्या कंटेट मॉडरेशन पॉलिसीत मोठा बदल, Facebook आणि Instagram वर मिळणार आता X चं 'हे' फीचर
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इंस्टाग्रामची मूळ कंपनी असलेल्या मेटाने एक मोठा बदल केला आहे. सोशल मीडिया कंपनी मेटाने आपल्या कंटेंट मॉडरेशन पॉलिसीमध्ये एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने म्हटले आहे की ते अमेरिकेतील थर्ड-पार्टी फॅक्ट चेकिंग प्रोग्राम बंद करत आहे. याबद्दल मेटा संस्थापक आणि सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे.
मेटा संस्थापक आणि सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आम्ही फॅक्ट-चेकर्सपासून मुक्त होत आहोत आणि आता फॅक्ट-चेकिंग प्रोग्राम ‘कम्युनिटी नोट्स’ व्दारे बदलले जात आहे. आम्ही हा प्रोग्राम यूएसमध्ये सुरू करत आहोत.” (फोटो सौजन्य – pinterest)
कोणती बातमी खरी आणि कोणती चूक हे आधी ही कंपनी ठरवायची. यासाठी ती इतर लोकांना फोन करायची आणि थर्ड पार्टीची मदत घेत होती. पण आता मेटाने या पद्धतीमध्ये बदल केला आहे. आता कोणती बातमी बरोबर आहे आणि कोणती चूक हे वापरकर्त्यांनी स्वतः ठरवावे असे मेटाला वाटते. यासाठी मेटा ‘कम्युनिटी नोट्स’ सुरु करत आहे. यामध्ये यूजर्स स्वत: कोणत्याही बातमीबद्दल त्यांचे मत देऊ शकतात आणि त्यांना ही बातमी योग्य की अयोग्य वाटते हे सांगू शकतात.
आतापर्यंत फेसबुक थर्ड-पार्टी प्रोग्रामद्वारे फॅक्ट-चेकिंग करत होते. झुकरबर्गच्या या घोषणेनंतर हा प्रोग्राम बंद होईल आणि त्याच्या जागी कम्युनिटी नोट्स येतील. हे वैशिष्ट्य सध्या एक्सवर उपलब्ध आहे. यामध्ये, वापरकर्तेच कोणत्याही चुकीच्या माहितीची सत्यता तपासणार आहे. या बदलाचे कारण म्हणजे थर्ड-पार्टी फॅक्ट चेकिंग प्रोग्राममध्ये यापूर्वी अनेक चूका झाल्याचे मेटाने सांगितलं आहे. अनेकवेळा सत्य असणाऱ्या बातम्याही चुकीच्या ठरल्या. त्यामुळे आता मेटा वापरकर्त्यांनी स्वतःच काय बरोबर आणि काय अयोग्य हे ठरवावे असे कंपनीला वाटतं. याच कारणांमुळे आता थर्ड-पार्टी फॅक्ट चेकिंग प्रोग्राम बंद करण्यात आला आहे.
OnePlus 13 Series अखेर भारतात लाँच, 6000 mAh बॅटरी आणि पावरफुल प्रोसेसरने सुसज्ज! इतकी आहे किंमत
झुकेरबर्ग म्हणाले की फॅक्ट-चेकर्स खूप राजकीय पक्षपाती आहेत, विशेषत: यूएसमध्ये, विश्वास मिळवण्याऐवजी गमावला आहे. प्रोग्राम बंद करण्याची घोषणा करताना झुकेरबर्गने थर्ड-पार्टी फॅक्ट चेकिंग प्रोग्रामच्या अनेक तक्रारींबद्दल सांगितले, ज्याबद्दल रिपब्लिकन आणि एक्स मालक एलोन मस्क यांनी अनेकदा उघडपणे बोलले आहे.
मेटाने घेतलेल्या या निर्णयाकडे झुकेरबर्गचे ट्रम्प यांच्याशी सलोख्याचे प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. खरं तर, ट्रम्प हे बऱ्याच काळापासून मेटावर टीका करत आहेत. ट्रम्प यांनी मेटावर पक्षपाती असल्याचा आरोप केला आहे. हे पाहता झुकेरबर्गने नुकतेच ट्रम्प यांच्या उद्घाटन निधीसाठी देणगी दिली आहे. याशिवाय त्यांनी ट्रम्प यांच्या सहयोगींनाही कंपनीत स्थान दिले आहे. त्यामुळे आता झुकरबर्ग आणि ट्रम्प यांच्यामध्ये समेट होणार का, याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.