OnePlus च्या या फोनमध्ये निर्माण झाली समस्या; फोनच्या किमतीपेक्षा दुरुस्तीचा खर्च जास्त (फोटो सौजन्य- pinterest)
OnePlus युजर्सना गेल्या काही दिवसांपासून OnePlus 9 आणि OnePlus 10 च्या मदरबोर्डमध्ये समस्येचा सामना करावा लागत आहेत. याच्या दुरुस्तीचा खर्च फोनच्या किंमतीपेक्षाही जास्त आहे. मदरबोर्डच्या समस्येमुळे युजर्सना फोन वापरण्यात अडचणी येत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून युजर्सना या समस्येचा सामना करावा लागत होता. मात्र आता अखेर कंपनीने युजर्सच्या या समेस्येवर उपाय आणला आहे. कंपनी युजर्सच्या या समस्येवरील उपाय म्हणून OnePlus 9 आणि OnePlus 10 युजर्सना मदरबोर्डच्या दुरुस्तीवर 30 टक्के डिस्काऊंट ऑफर करत आहे.
हेदेखील वाचा- देशातील पाचव्या सेमीकंडक्टर प्लांटला सरकारची मंजुरी; 2025 पर्यंत येणार पहिली चिप
भारतीय वापरकर्त्यांच्या मते, गेल्या अनेक दिवसांपासून OnePlus 9 आणि OnePlus 10 च्या मदरबोर्डमध्ये समस्यांचा सामना करावा लागत आहे. मदरबोर्डच्या समस्यांमुळे OnePlus 9 आणि OnePlus 10 युजर्सना त्यांचा फोन ऑपरेट करण्यात अडचण येत आहे. युजर्सच्या मते, स्मार्टफोनमधील सॉफ्टवेअर अपडेटनंतर ही समस्या निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यात काही वापरकर्त्यांनी त्यांच्या फोनने अचानक काम करणे बंद केल्याची तक्रार केली होती. त्यांनी त्यांचा फोन जेव्हा दुरुस्तीसाठी नेला, त्यावेळी त्यांना दुरुस्तीसाठी अफाट खर्च सांगण्यात आला, जो फोनच्या किंमतीपेक्षा जास्त होता.
OnePlus सेवा दुरुस्ती टीमने OnePlus फोनचा सदोष मदरबोर्ड बदलण्यासाठी 42 हजार रुपये खर्च केला आहे, जो नवीन OnePlus 10 Pro च्या सध्याच्या बाजार मूल्याच्या जवळपास आहे. म्हणजेच फोनच्या दुरुस्तीचा खर्च डिव्हाइसच्या सध्याच्या बाजारभावापेक्षा जास्त आहे. या सर्व प्रकरणांबाबत अनेक युजर्सनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट करत माहिती दिली आहे. युजर्सच्या या पोस्टनंतर समस्येचा गांभीर्याने विचार करत कंपनीने OnePlus 9 आणि OnePlus 10 स्मार्टफोन युजर्ससाठी एक ऑफर लाँच केली आहे. या ऑफरनुसार OnePlus 9 आणि OnePlus 10 स्मार्टफोन युजर्सना मदरबोर्डच्या दुरुस्तीवर 30 टक्के डिस्काऊंट ऑफर दिली जाणार आहे.
OnePlus is offering a 30% discount for motherboard issues on OnePlus 9 & OnePlus 10 series!
What do you think about this move? pic.twitter.com/QytXPkXIKm
— OnePlus Club (@OnePlusClub) August 30, 2024
हेदेखील वाचा- YouTube वर सबस्क्रायबर्सची कमाल! कोणत्या क्रिएटर्सना मिळतं सिल्व्हर, गोल्डन आणि डायमंड प्ले बटण?
मात्र कंपनीच्या ऑफरनंतर देखील अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. कंपनीच्या चुकीमुळे ही समस्या निर्माण झाली असून यासाठी युजर्सनी पैसे का खर्च करावे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. काही महिन्यांपूर्वी OnePlus युजर्सना ग्रीन लाईनचा सामना करावा लागत होता, त्यानंतर आता मदरबोर्डची समस्या निर्माण झाली आहे.
कंपनीने सांगितलं आहे की, आम्ही अलीकडील काही प्रकरणांबद्दल ऐकून दुःखी झालो आहोत जिथे वापरकर्त्यांना त्यांच्या OnePlus 9 आणि 10 Pro मध्ये डिव्हाइसच्या मदरबोर्डशी संबंधित काही समस्या येत आहेत. मात्र, यामागच्या कारणाचा शोध कंपनीकडून सुरू आहे. आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की आम्ही बाधित वापरकर्त्यांची ही समस्या लवकरात लवकर ठीक करण्याचा प्रयत्न करू. मदरबोर्ड दुरुस्ती महाग असू शकते हे आम्हाला माहीत आहे, परंतु आम्ही ते अधिक परवडणारे बनविण्यासाठी कठोर परिश्रम करत आहोत. आम्ही विनंती करतो की त्याच्या समस्येमुळे प्रभावित असलेल्या ग्राहकांनी ग्राहक सेवाशी संपर्क साधावा जेणेकरुन आम्ही परिस्थितीचे लवकरात लवकर निराकरण करण्यात मदत करू शकू.