Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vivo X200 सीरीजमध्ये लाँच होणार हे स्मार्टफोन्स, सोनी कॅमेरा आणि पावरफुल बॅटरीने सुसज्ज

Vivo X200 सिरीज अंतर्गत Vivo X200, Vivo X200 Pro आणि Vivo X200 Pro Mini स्मार्टफोन लाँच होत आहेत. Vivo X200 स्मार्टफोन 4 व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. Vivo X200 मध्ये 6.67 इंचाचा डिस्प्ले आहे, तर Pro व्हेरिअंटमध्ये 6.78 इंचाचा डिस्प्ले आहे. नवीन Vivo X200 Pro Mini मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह कॉम्पॅक्ट 6.3 इंच 1.5K OLED LTPO डिस्प्ले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 15, 2024 | 09:00 PM
Vivo X200 सीरीजमध्ये लाँच होणार हे स्मार्टफोन्स, सोनी कॅमेरा आणि पावरफुल बॅटरीने सुसज्ज

Vivo X200 सीरीजमध्ये लाँच होणार हे स्मार्टफोन्स, सोनी कॅमेरा आणि पावरफुल बॅटरीने सुसज्ज

Follow Us
Close
Follow Us:

Vivo X200 सिरीज चीनमध्ये लाँच करण्यात येत आहे. या सिरीजमध्ये Vivo X200 Pro Mini सह तीन नवीनतम स्मार्टफोनचा समावेश आहे. यात 4500 nits ब्राइटनेस आणि MediaTek Dimensity 9400 चिपसेटला सपोर्ट करणारा डिस्प्ले आहे. हा कंपनीचा नवीनतम चिपसेट आहे. यात 1TB पर्यंत स्टोरेज पर्या देखील देण्यात आले आहेत. तसेच, यात सोनी कॅमेरा देण्यात आला आहे.

हेदेखील वाचा- या दिवशी लाँच होणार Honor Magic 7 सिरीज! क्वालकॉमच्या नवीन चिपसेटसह मिळणार AI फीचर्स

MediaTek Dimensity 9400 chipset लाँच केल्यानंतर, Vivo ने चीनी बाजारात आपली फ्लॅगशिप X200 सीरीज लाँच केली आहे. नवीनतम सिरीजमध्ये Vivo X200 आणि Vivo X200 Pro यांचा समावेश आहे, जे Vivo X100 आणि Vivo X100 Pro चे उत्तराधिकारी म्हणून लाँच होत आहेत. यासह, Vivo X200 सिरीजमध्ये Dimensity 9400 SoC सह नवीन Vivo X200 Pro Mini देखील समाविष्ट आहे. (फोटो सौजन्य -Vivo)

किंमत आणि स्टोरेज

Vivo X200 स्मार्टफोन 4 व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. त्याच्या 12GB+256GB व्हेरिअंटची किंमत CNY 4,299 म्हणजेच अंदाजे 51,000 रुपये असू शकते. 12GB+512GB व्हेरिअंटची किंमत CNY 4,699 म्हणजेच अंदाजे 55,700 रुपये असू शकते. 16GB+512GB व्हेरिअंटची किंमत CNY 4,999 म्हणजेच अंदाजे 59,200 रुपये असू शकते. 16GB+1TB व्हेरिअंटची किंमत CNY 5,499 म्हणजेच अंदाजे 65,200 रुपये असू शकते.

Vivo X200 Pro व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत CNY 5,299 म्हणजेच अंदाजे 62,850 रुपये आहे. त्याचा टॉप व्हेरिएंट CNY 6,799 म्हणजेच अंदाजे 80,600 रुपयांमध्ये आला आहे. हा सॅटेलाइट एडिशन फोन आहे. नवीन Vivo X200 Pro Min च्या बेस 12GB + 256GB व्हेरिएंटची किंमत CNY 5,299 म्हणजेच अंदाजे 62,800 रुपये आहे. Vivo X200 आणि X200 Pro मध्ये Titanium, Sapphire Blue, Night Black आणि White Moonlight रंग उपलब्ध आहेत. तसेच, नवीन मिनी व्हेरियंटमध्ये टायटॅनियम ब्लू, मायक्रो पावडर (गुलाबी), स्ट्रेट फॉरवर्ड (पांढरा) आणि साधे काळे रंग आणले गेले आहेत.

हेदेखील वाचा- सोशल मिडीयावरील पोस्ट खरी की खोटी? अशा प्रकारे तपास करतात सायबर सुरक्षा एजन्सी, जाणून घ्या

Vivo X200 सिरीज फीचर्स

डिस्प्ले: Vivo X200 मध्ये 6.67 इंचाचा डिस्प्ले आहे, तर Pro व्हेरिअंटमध्ये 6.78 इंचाचा डिस्प्ले आहे. जे 1.5K OLED ला सपोर्ट करते. यामध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि 4500 nits पर्यंत पीक ब्राइटनेस आहे.

प्रोसेसर: दोन्ही व्हेरिअंटमध्ये MediaTek Dimensity 9400 चिपसेट देण्यात आली आहे.

रॅम, स्टोरेज: Vivo X200 आणि Vivo X200 Pro मध्ये 16GB पर्यंत RAM आणि 1TB अंतर्गत स्टोरेज आहे.

कॅमेरा: प्रो व्हेरियंटमध्ये OIS सह 50MP LYT-818 प्रायमरी कॅमेरा, 50MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि V3+ इमेजिंग चिपसह 200MP Zeiss APO टेलिफोटो सेन्सर आहे. दोन्ही फ्लॅगशिप फोन 32MP सेल्फी कॅमेराने सुसज्ज आहेत.

सॉफ्टवेअर: Vivo X200 आणि X200 Pro Origin OS 5 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतात.

बॅटरी: Vivo X200 मध्ये 5,800mAh बॅटरी आहे, तर Vivo X200 Pro मध्ये 90W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,000mAh बॅटरी आहे.

IP रेटिंग: Vivo X200 आणि X200 Pro मध्ये IP68+IP69 पाणी आणि धूळ प्रतिरोधक रेटिंग आहे.

Vivo X200 Pro Mini

डिस्प्ले: नवीन Vivo X200 Pro Mini मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह कॉम्पॅक्ट 6.3 इंच 1.5K OLED LTPO डिस्प्ले आहे.

प्रोसेसर: नुकताच लाँच केलेला डायमेन्सिटी 9400 चिपसेट मिनी व्हेरियंटमध्ये प्रदान करण्यात आला आहे.

रॅम, स्टोरेज: Vivo X200 Pro Mini 16GB पर्यंत RAM आणि 512GB अंतर्गत स्टोरेज ऑफर करते.

कॅमेरा: Vivo X200 Pro Mini मध्ये 50MP Sony LYT818 प्रायमरी कॅमेरा, 50MP अल्ट्रावाइड सेन्सर आणि 100x डिजिटल झूमसाठी 50MP पेरिस्कोप सेन्सर आहे. इतर फोन्सप्रमाणे, या कॉम्पॅक्ट स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 32MP सेन्सर देखील आहे.

बॅटरी: Vivo X200 Pro Mini मध्ये 5,700mAh बॅटरी आहे जी 90W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

IP रेटिंग: X200 Pro Mini IP68+IP69 वॉटर आणि डस्ट रेझिस्टन्स रेटिंगसह येते.

Web Title: Vivo is going to launch vivo x200 series with sony camera and powerful battery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2024 | 09:00 PM

Topics:  

  • smartphone update

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.