
फोटो सौजन्य - Vivo
चीनी स्मार्टफोन ब्रँड Vivo ने भारतात 10 वर्षांचा काळ पूर्ण केला आहे. Vivo गेल्या 10 वर्षांपासून भारतीय बाजारात आपले स्थान टिकवून आहे. गेल्या 10 वर्षांच्या काळात Vivo ने भारतीय बाजारपेठेत मोठं यश संपनाद केलं आहे. इतर टेक कंपन्यांप्रमाणे Vivo ची देखील भारतातील युजर्स संख्या फार मोठी आहे. युजर्सच्या कंपनीवरील विश्वासामुळेच आज Vivo भारतात टिकून आहे. 10 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने Vivo ने Vivo Tech Day 2024 चे आयोजन केले होते. या कार्यक्रमात कंपनीने त्यांच्या सर्व प्रोडक्ट्सबद्दल माहिती दिली. या 10 वर्षांच्या काळात Vivo ने 15 करोड मेड इन इंडिया उत्पादने तयार केली आहेत.
हेदेखील वाचा- WhatsApp वर लवकरच येतंय डबल टॅप रिअॅक्शन फीचर! आता मॅसेजला रिअॅक्शन देणं होईल अधिक सोपं
Vivo ने भारतात 3500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. Vivo ने भारतीय स्मार्टफोन बाजारात अनेक नवनवीन तंत्रज्ञान आणले आहे. कंपनीच्या या तंत्रज्ञानामुळे लोकांच्या गरजा कशा प्रकारे पूर्ण होत आहेत, याची माहिती देखील कंपनीने या कार्यक्रमात दिली. 30 जुलै ते 1 ऑगस्ट असा 3 दिवसांचा हा कार्यक्रम आहे. काल आणि आज दोन्ही दिवशी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली आहे.
हेदेखील वाचा-अनेक नवीन फीचर्ससह RRTS Connect App झाला अपडेट; आता प्रवास होणार अधिक सोयीस्कर
या क्षणाचे काही फोटो देखील कंपनीने त्यांच्या सोशल मिडीया अकाऊंटवर शेअर केले आहेत. या कार्यक्रमात कंपनीतील अनेक मोठ्या पदावरील मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमावेळी लोकांना Vivo चे अनेक प्रोडक्ट्स पाहण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमात कंपनीने गेल्या 10 वर्षांच्या कार्यकाळा बद्दल सांगितलं. टेक डे 2024 मध्ये, विवोच्या संशोधन आणि विकास तज्ञांनी त्याच्या विविध तंत्रज्ञानाबद्दल सांगितलं.
कॅमेरा गुणवत्ता सुधारण्यासाठी कंपनीने Zeiss सोबत भागीदारी केली. टी-कोटिंगच्या मदतीने कंपनीने कॅमेऱ्याची गुणवत्ता सुधारली आणि प्रकाशाचे रिफ्लेक्शन कमी करण्यात यश मिळवले. ZEISS APO टेलिफोटो लेन्सच्या मदतीने, कंपनी फोनवर 100X ZOOM चे फीचर प्रदान करण्यात सक्षम झाली आहे. याशिवाय कंपनीने मल्टीफोकस पोर्ट्रेट, प्रोफेशनल क्वालिटी पोर्ट्रेट सारखे फीचर्स देखील लोकांना दिले आहेत. ZEISS सोबतच्या भागीदारीमुळे स्मार्टफोन कॅमेरा फोटोग्राफीमध्ये मोठा फायदा होत आहे.
कंपनीने चांगल्या फोटोंसाठी वेगळी चिप आणली आहे. जिथे V1 चिप 12nm प्रक्रियेवर विकसित केली गेली. V3 चिप कंपनीने 6nm आर्किटेक्चरवर विकसित केली होती, ज्याच्या मदतीने AI व्हिडिओ अल्गोरिदम सपोर्ट सुधारला होता. कंपनीने Sony सह भागीदारीत 50MP LYT 900 सेन्सर विकसित केला.
कंपनीने SCHOTT सोबत भागीदारी केली आहे जेणेकरून ते आपल्या प्रीमियम स्मार्टफोन्समध्ये चांगले ग्लास कव्हर्स प्रदान करतील. SCHOTT ही 140 वर्षे जुनी जर्मन कंपनी आहे, जी तिच्या नाविन्यपूर्ण काचेच्या तंत्रज्ञानासाठी ओळखली जाते. या ग्लास पॅनेलचा वापर करून कंपनी आपले फोन अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. या सर्वांसोबतच कंपनीने AI तंत्रज्ञान आणि टेलिकम्युनिकेशनच्या प्रगतीबद्दलही सांगितलं. Vivo X Fold3 Pro मध्ये, कंपनीने AI टूल्सचा वापर करून फोनची उपयोगिता सुधारली आहे.