200MP कॅमेरासह 'या' दिवशी लाँच होणार Vivo X200 सिरीज, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स
टेक कंपनी Vivo ने चीनमध्ये आपली प्रमुख Vivo X200 सिरीज अलीकडेच लाँच केली आहे. चीनमधील या यशस्वी लाँचिंगनंतर आता कंपनीने ही नवीन सिरीज जागतिक बाजारात लाँच करण्याची तयारी केली आहे. Vivo X200 सिरीजची ग्लोबल लाँचिंग डेट जाहीर करण्यात आली आहे.
Vivo X200 सिरीजमधील दोन्ही फोन पुढच्या आठवड्यात ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केले जाणार आहेत. याची लाँचिंग तारीख 19 नोव्हेंबर असणार आहे. म्हणजेच येत्या दोन दिवसांतच Vivo X200 सिरीज जागतिक बाजारात लाँच होणार आहे. ही सिरीज मलेशियामध्ये लाँच केली जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. (फोटो सौजन्य – X)
Vivo X200 सिरीजमध्ये Vivo X200 आणि Vivo X200 Pro असे दोन स्मार्टफोन लाँच केले जाणार आहेत. Vivo ने X200 ला टाइटेनियम ग्रे आणि ऑरोरा ग्रीनमध्ये आणि X200 Pro ला टायटॅनियम ग्रे आणि मिडनाईट ब्लू रंगात सूचीबद्ध केले आहे. दोन्ही फोन फक्त एकाच प्रकारात येतील, जे 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज आहे. 19 नोव्हेंबर रोजी मलेशियामध्ये Vivo X200 मालिकेचे लाँचिंग दुपारी 4 वाजता (भारतीय वेळेनुसार 1:30 वाजता) सुरू होईल.
स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
ग्लोबल लाँच डेट जाहीर करण्यासोबतच कंपनीने सिरीजमधील स्मार्टफोन्सच्या स्पेसिफिकेशन्सचीही माहिती दिली आहे. दोन्ही फोनमध्ये Dimensity 9400 SoC, 50MP मुख्य कॅमेरा, 50MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि प्रो वर्जनमध्ये 200MP ZEISS APO टेलिफोटो कॅमेरा आहे, तर स्टॅण्डर्ड मॉडेलमध्ये 50MP टेलिफोटो कॅमेरा आहे.
प्रो मॉडेलमध्ये LTPO पॅनल, 3D अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट स्कॅनर, V3+ इमेजिंग चिप आणि 30W वायरलेस चार्जिंगसह मोठी 6000mAh बॅटरी आहे. दोन्ही फोन Android वर आधारित Funtouch OS 15 वर चालतात. त्यांना पाणी आणि धुळीपासून सुरक्षिततेसाठी IP68 आणि IP69 रेटिंग मिळाले असते.
डिस्प्ले: Vivo X200 मध्ये 6.67-इंचाचा डिस्प्ले आहे, तर Pro वर्जनमध्ये 6.78-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये 1.5K OLED ला सपोर्ट करते, 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि 4500 nits पर्यंत पीक ब्राइटनेस आहे.
प्रोसेसर: व्हॅनिला आणि प्रो दोन्ही प्रकारांमध्ये MediaTek Dimensity 9400 चिपसेट आहे.
रॅम, स्टोरेज: Vivo X200 आणि Vivo X200 Pro मध्ये 16GB पर्यंत RAM आणि 1TB अंतर्गत स्टोरेज देण्यात आलं आहे.
Vivo संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
मागील कॅमेरा: प्रो व्हेरियंटमध्ये OIS सह 50MP LYT-818 मुख्य कॅमेरा, 50MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि V3+ इमेजिंग चिपसह 200MP Zeiss APO टेलिफोटो सेन्सर आहे.
सेल्फी कॅमेरा: दोन्ही फ्लॅगशिप फोन 32MP सेल्फी कॅमेराने सुसज्ज आहेत.
बॅटरी, चार्जिंग: Vivo X200 मध्ये 5,800mAh बॅटरी आहे, तर Vivo X200 Pro 90W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,000mAh बॅटरी आहे.