
Tech Tips: स्मार्टवॉच घालूनच झोपताय? 90 टक्के लोकं करतात ही मोठी चूक, सत्य वाचून तुम्हीही घाबराल
स्मार्टवॉचची विशेषत: म्हणजेच यामध्ये असे अनेक फीचर्स दिलेले असतात, ज्यामुळे आपण आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकतो. अलीकडेच, Apple ने त्यांच्या स्मार्टवॉचमध्ये एक नवीन हाइपरटेंशन नोटिफिकेशन फीचर देखील जोडले आहे. हे नवीन फीचर यूजर्सना हाय ब्लड प्रेशरबाबत अलर्ट देते. आपल्या चांगल्या आरोग्यासाठी स्मार्टवॉचचा वापर करणं योग्य आहे पण सततचा वापर आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतो. स्मार्टवॉचच्या अतिवापरामुळे आपलं आरोग्यावर वाईट परिणाम होण्याची देखील शक्यता असते. (फोटो सौजन्य – Pinterest)
असे अनेक लोकं आहेत, जे स्मार्टवॉचचा वापर करताना अधिक लोकं गोंधळलेले असतात. कारण अनेक कंपन्या असा दावा करताता की, स्मार्टवॉच स्लीप ट्रॅकिंग अधिक चांगली करते. तर काही लोकांचं असं म्हणणं आहे तकी, यामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पण याबाबीत तज्ज्ञांनी काय सांगितलं आहे? झोपताना स्मार्टवॉच घालणं योग्य आहे का? याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया. तज्ज्ञांनी सांगितलं आहे की, स्मार्टवॉच घालून झोपण्याचे फायदे आणि नुकसान दोन्ही आहेत. आता आम्ही तुम्हाला स्मार्टवॉच घालून झोपण्याचे फायदे आणि नुकसान दोन्हीेबद्दल सांगणार आहोत.
हेल्थ टेक्नोलॉजी एक्सपर्ट्सचं असं म्हणणं आहे की, स्मार्टवॉच तुमच्या झोपेबद्दल महत्त्वाची माहिती देते. जसे, हार्ट रेट आणि ऑक्सीजन लेवल, यामुळे झोपेचा पॅटर्न समजण्यासाठी मदत होते. हा डेटा अशा लोकांसाठी फायदेशीर ठरतो, ज्यांना झोप येत नाही, थकवा येतो किंवा अनियमित झोपेची समस्या आहे. असे लोकं स्मार्टवॉच घालून झोपत असतील तर त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. पण जर तुम्हाला स्किन एलर्जी, चिडचिड, जास्त घाम येणे किंवा झोपेत असताना अस्वस्थ वाटणे अशा समस्या येत असतील तर तुम्ही झोपताना स्मार्टवॉच घालू नका.
Free Fire MAX: कसा बनला जगभरातील गेमर्सचा आवडता बॅटलरॉयल गेम? रोमांचक इतिहास माहिती आहे का?
तज्ज्ञांनी दिलेल्या या सल्ल्याचा असा अर्थ नाही की तुम्ही 24 तास स्मार्टवॉच घालून ठेवावं. तज्ज्ञांनी असं म्हटलं आहे की, जर तुमचे स्मार्टवॉच जड आहे, स्ट्रॅप अत्यंत घट्ट आहे आणि त्वचेवर सतत घर्षण होत असेल, तर यामुळे जळजळ आणि स्किनच्या इतर समस्या निर्माण होऊ शकतात. याव्यतिरिक्त, जर तुमच्या त्वचेला पुरेशी विश्रांती मिळाली नाही तर पुरळ वाढू शकते. तथापि, तज्ज्ञांनी अद्याप हे सिद्ध केलेले नाही की स्मार्टवॉचमधून निघणारे रेडिएशन हानिकारक आहे.
Ans: स्मार्टवॉचमुळे तुमचे हेल्थ ट्रॅकिंग (हार्ट रेट, स्टेप्स, स्लीप, SpO₂) सोपे होते आणि तुमचा फिटनेस डेटा नेहमी तुमच्यासोबत राहतो.
Ans: बहुतेक आधुनिक स्मार्टवॉचेस लाईट, डीप आणि REM स्लीप ट्रॅक करून जवळपास 80–90% अचूक डेटा देतात.
Ans: फोन काढण्याची गरज नसते. स्मार्टवॉचवरून कॉल रिसीव्ह, मेसेज वाचणे, नोटिफिकेशन्स पाहणे शक्य होते.