Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mark Zuckerberg पासून ते Elon Musk पर्यंत, कसं आहे जगातील टॉप टेक लीडर्सचं मॉर्निंग रुटीन

मार्क जुकरबर्गच्या डेली रुटीनला सोशल मीडियावर Rawdog Routine नावाने ओळखलं जात आहे. एलन मस्क दिवसभरात प्रचंड कॉफीचे सेवन करतात आणि दिवसभर प्रचंड कामं करायचं असतं.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 04, 2025 | 02:12 PM
Mark Zuckerberg पासून ते Elon Musk पर्यंत, कसं आहे जगातील टॉप टेक लीडर्सचं मॉर्निंग रुटीन

Mark Zuckerberg पासून ते Elon Musk पर्यंत, कसं आहे जगातील टॉप टेक लीडर्सचं मॉर्निंग रुटीन

Follow Us
Close
Follow Us:

जगातील टॉप टेक लीडर्स नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. याचं कारण कधी एखादं नवीन अ‍ॅप असतं तर कधी त्यांच्या जुन्या अ‍ॅपचं नवीन फीचर. आता जगातील टेक लीडर्स पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यामध्ये फेसबुक आणि मेटाचे फाउंडर मार्क जुकरबर्ग, एक्सचे मालक एलन मस्क आणि ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांचा समावेश आहे. हे सर्व टेक लीडर्स कोणत्या अ‍ॅपमुळे नाही तर त्यांच्या मॉर्निंग रुटिनमुळे चर्चेत आहेत.

Red Magic गेमर्ससाठी घेऊन आलाय नवीन गॅझेट! 16GB रॅम आणि नऊ-लेयर ICE-X कूलिंग सिस्टमने सुसज्ज, इतकी आहे Smartphone ची किंमत

जगातील टॉप टेक लिडर्स ज्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत, जे प्रचंड काम करतात, अशा लोकांचा दिवस कसा असेल, ते त्यांच्या दिवसाची सुरुवात कशा प्रकारे करत असतील असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात येत असतात. आता आम्ही तुम्हाला अशाच काही प्रश्नांची उत्तर देणार आहोत. टॉप टेक लीडर्स त्यांच्या दिवसाची सुरुवात कशाप्रकारे करतात, हे जाणून घ्यायला सर्वांनाच आवडेल. (फोटो सौजन्य – Pinterest)

डेली रुटिनमुळे चर्चेत असणारा पहिला टेक लीडर म्हणजे मार्क जुकरबर्ग. फेसबुक आणि मेटाचे फाउंडर मार्क जुकरबर्ग त्यांच्या डेली रुटिनमुळे सध्या प्रचंड चर्चेत आहेत. मार्क जुकरबर्गच्या डेली रुटीनला सोशल मीडियावर Rawdog Routine नावाने ओळखलं जात आहे. मार्क जुकरबर्ग यांच्या रुटीनमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते त्यांच्या दिवसाची सुरुवात कोणत्याही कॉफी किंवा एनर्जी ड्रिंकने करत नाहीत. यामुळेच त्यांच्या या डेली रुटीनला सोशल मीडियावर Rawdog Routine नावाने ओळखलं जात आहे.

Rawdog Routine म्हणजे नक्की आहे तरी काय?

‘Rawdog Routine’ म्हणजे आपल्या दिवसाची सुरुवात कोणत्याही स्टिमुलेंट (जसे कॉफी, चाय, एनर्जी ड्रिंक) शिवाय करणं. जुकरबर्गचे म्हणणे आहे की, तुम्ही कोणत्याही ड्रिंकशिवाय बाहेरील अ‍ॅक्टिव्हिटीच्या मदतीने तुमच्या दिवसाची सुरुवात करत असाल तर दिवसभर तुमचं शरीर आणि डोकं फ्रेश राहतं. ज्यामुळे कामं व्यवस्थित आणि वेळेवर होतात. त्यांचं असं मत आहे की, सकाळी दिवसाची चांगली सुरुवात करण्यासाठी कोणत्याही कॉफीची गरज नसते. सुट्टीच्या दिवसांत ते एन्जॉय करण्यासाठी कधी कधी कॉफीचे सेवन करतात. पण रोज कामाच्यावेळी ते कॉफी पित नाही.

जुकरबर्गचं मत आहे की, सकाळी कोणत्याही कॅफीनशिवाय त्यांच्या दिवसाची सुरुवात करतात. यामुळे डोकं शांत राहतं आणि कामावर लक्ष क्रेंद्रित करता येतं. जुकरबर्ग रोज सकाळी सुमारे दोन तास ब्राजीलियन जिउ-जित्सु आणि MMA (मिश्रित मार्शल आर्ट्स) ची ट्रेनिंग घेतात.

OMG! स्मार्टफोन असाव तर असाच… Redmi च्या नव्या मॉडेलने सर्वांचेच वेधले लक्ष, बजेट किंमतीत ऑफर करते Premium Features

एलन मस्क दिवसभरात प्रचंड कॉफीचे सेवन करतात आणि दिवसभर प्रचंड कामं करायचं असतं. ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी त्यांच्या दिवसाची सुरुवात उपवास, मेडिटेशन आणि थंड पाण्याच्या स्थानाने करतात. अ‍ॅमझॉनचे संस्थापक जेफ बेजोस भरपूर झोप आणि फ्रेश माईंडने त्यांच्या दिवसाची सुरुवात करतात. तर अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक सकाळी लवकर उठतात आणि दिवसभर उत्साही राहण्यासाठी नियमित व्यायाम करतात.

Web Title: What is morning routine of world best tech leader include mark zuckerberg and elon musk tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2025 | 02:12 PM

Topics:  

  • amazon
  • elon musk
  • Mark Zuckerberg

संबंधित बातम्या

X Chat: एलन मस्कने लाँच केलं नवं मेसेजिंग प्लॅटॉफॉर्म! डेटा सेफ्टी आणि अ‍ॅडव्हांस फीचर्सने सुसज्ज, असं करा अ‍ॅक्सेस
1

X Chat: एलन मस्कने लाँच केलं नवं मेसेजिंग प्लॅटॉफॉर्म! डेटा सेफ्टी आणि अ‍ॅडव्हांस फीचर्सने सुसज्ज, असं करा अ‍ॅक्सेस

Amazon Leo: Starlink ला टक्कर देण्यासाठी Amazon झाला सज्ज! लवकरच सुरु करणार सॅटेलाईट इंटरनेट सर्विस, जाणून घ्या सविस्तर
2

Amazon Leo: Starlink ला टक्कर देण्यासाठी Amazon झाला सज्ज! लवकरच सुरु करणार सॅटेलाईट इंटरनेट सर्विस, जाणून घ्या सविस्तर

X Update: एलन मल्कच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आलं नवीन एन्क्रिप्टेड चॅट फीचर! DMs केले रिप्लेस, युजर्सना मिळणार या सुविधा
3

X Update: एलन मल्कच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आलं नवीन एन्क्रिप्टेड चॅट फीचर! DMs केले रिप्लेस, युजर्सना मिळणार या सुविधा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.