फोटो सौजन्य - pinterest
लोकप्रिय मेसेजिंग ॲप WhatsApp पुन्हा एकदा त्यांच्या युझर्स साठी एक नविन अपडेट घेऊन येत आहे. आता युझर्स Instagram प्रमाणे WhatsApp वर देखिल स्टेटस शेअर करू शकणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून WhatsApp त्याच्या युजर्स साठी नवनवीन अपडेट्स घेऊन येत आहे. या नविन अपडेट्समुळे WhatsApp युजर्सचा अनुभव अधिक उत्तम होत आहे. काही दिवसांपूर्वीच WhatsApp ने एक अपडेट लाँच केलं होत, या अपडेटमुळे युझर्स इंटरनेट शिवाय देखील मोठ्या फाईल त्यांच्या WhatsApp मधून शेअर करू शकतात. यानंतर WhatsApp आता पुन्हा एकदा त्यांच्या युझर्ससाठी नवीन अपडेट घेऊन येणार आहे. स्टेटस रिशेअर असं या नविन अपडेटचं नाव आहे.
हेदेखील वाचा – TRAI अधिकाऱ्याच्या नावाने केली ऑनलाईन फसवणूक; व्यवसायिकाला 90 लाखांचा गंडा
आता पर्यंत सोशल मीडिया युजर्स केवळ Instagram वर स्टोरी रिशेअर करू शकत होते. मात्र आता हे अपडेट WhatsApp वर देखील येणार आहे. आता WhatsApp युजर्स देखिल स्टेटस शेअर करू शकतात. WhatsApp च्या या नविन अपडेट बद्दल WABetaInfo ने माहिती दिली आहे. WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, WhatsApp स्टेटस अपडेट्स रिशेअर करण्यासाठी एका फिचरवर काम करत आहे. WhatsApp च्या अँड्रॉइड बीटा व्हर्जन 2.24.1.6.4 मध्ये हे फिचर दिसणार आहे. सध्या हे फिचर विकासाच्या टप्प्यात आहे. या फीचरमध्ये युजर्सना स्टेटस रिशेअर करण्यासाठी क्विक शॉर्टकट बटण मिळणार आहे. यामध्ये यूजर्सना इमोजी आणि पोस्ट अपडेट करण्याचा पर्यायही मिळू शकतो. आत्तापर्यंत तुम्हाला हे फीचर इंस्टाग्रामवर मिळायचे पण ते रोलआउट केल्यानंतर ते तुमच्या WhatsApp वरही दिसेल. या फीचरमध्ये यूजर्स स्टेटस पुन्हा शेअर करू शकतात.
हेदेखील वाचा – अनेक नवीन फीचर्ससह RRTS Connect App झाला अपडेट; आता प्रवास होणार अधिक सोयीस्कर
याशिवाय WhatsApp फाईल शेअरिंग फीचरवर देखील काम करत आहे. या फिचरमध्ये यूजर्स इंटरनेटशिवाय जवळच्या लोकांसोबत मोठ्या फाइल्स शेअर करू शकतील. म्हणजेच आता यूजर्सना इंटरनेटवर अवलंबून राहावे लागणार नाही. याबद्दल देखील, WABetaInfo ने एक स्क्रीनशॉट शेअर केला होता, ज्यामध्ये हे स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते की iOS मेकॅनिझममध्ये फाइल शेअरिंगसाठी, QR कोड स्कॅन करणे आवश्यक आहे.
आपल्याला WhatsApp वर कोणतीही फाईल शेअर करायची असेल तर इंटरनेटची गरज असते. इंटरनेट शिवाय आपण WhatsApp वर कोणतीहि फाईल शेअर कर शकत नाही. आपण एखाद्या ठिकाणी फिरायला गेलो आणि त्या इंटरनेट काम करत नसेल, तर अशावेळी आपण WhatsApp वर कोणतीही फाईल शेअर करू शकत नाही. त्यामुळे आपली अनेक कामं रखडतात. पण आता फाईल शेअर करण्यासाठी इंटरनेटची गरज नाही. युजर्स इंटरनेट शिवाय देखील मोठ्या फाईल शेअर करू शकणार आहेत. WhatsApp चं हे फिचर लवकरच लाँच केलं जाणार आहे. या फिचरसोबतच WhatsApp आता अजून एका नवीन फिचरवर काम करत आहे. या नव्या फीचरमध्ये युजर्सना Instagram स्टोरी प्रमाणे WhatsApp स्टेटस रिशेअर करण्याचं ऑप्शन मिळणार आहे.