उन्हाळ्याच्या या गरम वातावरणात बाहेर जाणे तर सोडाच पण घरात राहणेही अशक्य होते. अशा वेळी AC हाच एक योग्य पर्याय वाटू लागतो. आजकाल सर्वचजण या उन्हाळयाच्या उष्णतेपासून स्वतःला वाचवण्यासाठी एसीचा वापर करत आहेत. मात्र बाहेरचे तापमान ४५ आणि ५० अंश असल्यास अशा कडक उष्णतेमुळे एसी कुलरही निकामी होऊ लागतात. अशा परिस्थितीत जेव्हाही कोणी बाहेरून घरात येतो तेव्हा तो एकच सांगतो, ‘एसीचं तापमान थोडं कमी कर…’ पण तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही एसीचे तापमान सेट करू शकत नाही. एअर कंडिशनर 16 अंशांपेक्षा कमी आणि 30 अंशांपेक्षा जास्त सेट करता येत नाही. हे फक्त तुमच्या एसीमध्येच होत नाही तर जगभरातील सर्वच एसींचे मिनिमम आणि मैक्झीमम तापमान हे निश्चितच आहे. पण नेमके याचे कारण काय तुम्हाला माहित आहे का? नाही. तर चला मग सविस्तर जाणून घेऊयात.
16 अंश सेल्सिअसपेक्षा खाली नाही जात घरातील एसीचे तापमान
तुम्ही अनेकदा पाहिले असेल की, एसीच्या रिमोटवरून एसीचे तापमान हे 16 अंश सेल्सिअसच्या खाली कधीही जात नाही. मात्र असे नक्की का होते, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? आज तुम्ही बाजारातून कोणत्याही ब्रँडचा एसी खरीदी करून घरात आणू शकता मात्र त्यात मिनिमम तापमान हे 16 अंशांपेक्षा कमी नाही होणार. आज अनेक ठिकाणी एसीचे मिनिमम तापमान 18 अंशांपर्यंत घसरले आहे. याची दोन मुख्य कारणे आहेत, पहिले एसी आरोग्यासाठी वाईट आहे आणि दुसरे म्हणजे, ते आपल्या आरोग्यासाठी देखील हानिकारक ठरू शकते.
[read_also content=”Xiaomi चा नवीन फोन लवकरच होणार लाँच! कमी किमतीत कडक फीचर्स https://www.navarashtra.com/technology/xiaomis-new-phone-will-be-launched-soon-low-price-but-strong-features-539818.html”]
… म्हणून एसीचे तापमान 16 अंश सेल्सिअसपेक्षा कमी होऊ शकत नाही
सर्व एसींमध्ये इवैपोरेटर लावलेला असतो. आपला एसी हा इवैपोरेटर कूलेंटच्याच मदतीने थंड होतो आणि हाच आपल्या खोलीला थंड करण्याचे काम करत असते. अशा परिस्थितीमध्ये आपल्य एसीचे तापमान 16 अंश सेल्सिअसपेक्षा कमी असले तर इवैपोरेटरमध्ये बर्फ जमा होण्यास सुरुवात होईल. असे केल्याने, तुम्हाला थंड करणारा एसी स्वतःच बर्फ बनून गोठून बसेल आणि अखेरीस खराब होईल. म्हणूनच आपल्या एसीचे तपमान हे 16 अंश सेल्सिअसपेक्षा कमी असू शकता नाही.
एसीचे तापमान 30 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त का होऊ शकत नाही?
आता जर आपण मैक्सझीमम तापमानाबद्दल म्हणजेच 30 अंश सेल्सिअसबद्दल बोलणे केले तर त्याचे कारण फार सोपे आहे. जेव्हा एसीचे तापमान 30 अंश सेल्सिअसवर असते तेव्हा त्याची हवा फार कमी थंड लागते. अशा वेळेस, जर तुम्ही याला 30 अंशवरुनहीजास्त करायला जाल तर यातून थंड हवा नाही तर गरम हवा येण्यास सुरुवात होईल. आपल्याला तर माहितीच आहे एसीचे काम रूमला थंड करण्याचे आहे, गरम करण्याचे नाही. म्हणूनच याचे तापमान 30 अंश सेल्सिअसहुन अधिक होऊ शकत नाही.