Year Ender 2024: लिमिट वाढण्यापासून ते नवीन फीचर्सपर्यंत, यावर्षी किती बदलला UPI?
डिजिटल पेमेंटमध्ये भारत आघाडीवर आहे. 2023 मध्ये एकूण ऑनलाइन पेमेंटच्या बाबतीत भारत 40 टक्क्यांसह पहिल्या क्रमांकावर आहे. माहितीनुसार, 2023 मध्ये UPI वापरणाऱ्यांची संख्या 30 कोटी असेल आणि 5 कोटी मर्चेंट्स त्याचा वापर करत होते. गेल्या वर्षी 117.6 अब्ज ट्रांजॅक्शन्स झाले होते. भारतात ऑनलाइन पेमेंट ‘दिवस-रात्र’ दुपटीने वाढत आहे. 2024 मध्ये UPI मध्ये काही मोठे बदल घडून आले. नवीन लिमिट्सपासून ते नवीन फीचर्सपर्यंत, UPI मध्ये अनेक बदल झाले. सरत्या वर्षाचा निरोप घेताना आज आम्ही तुम्हाला या लेखात UPI मध्ये वर्षभरात झालेल्या बदलांचा आढावा देणार आहोत.
फिचर फोन युजर्सची लिमिट वाढली
फीचर फोन युजर्ससाठी यूपीआय (UPI) लिमिट 5000 रुपये होती, परंतु 2024 मध्ये ती 10,000 रुपये करण्यात आली. आता वापरकर्ते UPI123PAY सर्व्हिसद्वारे एका दिवसात 10,000 रुपये पाठवू शकतात. मिस्ड कॉल आणि आयव्हीआरद्वारे ऑनलाइन पेमेंट करता येते.
UPI Lite झाले अधिक चांगले
UPI123PAY सर्व्हिस अपडेटसह, UPI Lite ची मर्यादा देखील यावर्षी वाढवण्यात आली आहे. वापरकर्ते त्यांच्या UPI Lite मध्ये 5000 रुपये पर्यंत जमा करू शकतात. तर आधी ही लिमिट 2,000 रुपये होती. हे फिचर युजर्सना पिन न टाकता लहान ट्रांजॅक्शन्स करण्याची अनुमती देते.
BSNL 5G लाँचबाबत लेटेस्ट अपडेट, Jio-Airtel पेक्षा का स्वस्त असेल सर्व्हिस? जाणून घ्या
ऑटो टॉप-अप फीचर
NPCI ने यावर्षी ऑटो टॉप-अप फीचर देखील लाँच केले. युजर्सच्या वॉलेटमध्ये पैसे कमी असल्यास, पैसे आपोआप भरले जातात. यामध्ये कोणत्याही ऑथेंटिकेशनची गरज नाही. ही सुविधा वॉलेटशी जोडलेल्या अकाउंटमध्ये किती पैसे शिल्लक आहेत, यावर निर्भर करते.
UPI ट्रांजॅक्शन लिमिट
या वर्षी NPCI ने देखील व्यवहार लिमिटबाबत मोठा निर्णय घेतला. काही निवडक पेमेंटसाठी, मर्यादा 1 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात आली. युजर्स आता हॉस्पिटल, ट्यूशन पेमेंट, IPO आणि विमा यासारख्या गोष्टींसाठी 5 लाख रुपयांपर्यंत पेमेंट करू शकतात.
UPI Circle
यावर्षीची सर्वात खास गोष्ट म्हणजे UPI ने लाँच केलेलं यूपीआय सर्कल (UPI Circle) फीचर. यामध्ये युजर्स त्यांच्या कुटुंबातील सदस्य किंवा मित्रांना समाविष्ट करू शकतात. यामध्ये, सेकेंडरी यूजरला ठरवलेल्या मर्यादेपर्यंत पेमेंट करण्याची परवानगी मिळते. यामध्ये, सेकेंडरी यूजर पेमेंट करण्यासाठी प्रायमरी युजरच्या बँक अकाउंटचा वापर करू शकतो. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे प्रत्येक व्यवहारासाठी प्रायमरी युजरला सेकंडरी युजरकडून अप्रूव्हल घ्यावे लागेल.
या वर्षी UPI मध्ये करण्यात आलेले सर्व बदल हे युजर्सची अनुभव वाढवण्यासाठी करण्यात आले आहेत. NPCI चे उद्दिष्ट, डिजिटल पेमेंट सोपे आणि प्रत्येकासाठी सुलभ बनवणे आहे.