अलीकडे VI ने काही निवडक भागात आपली नवीनतम 5G सर्व्हिस सुरू केली आहे. त्यातच आता सरकारी कंपनी बीएसएनएलन देखील आपली 5G सर्व्हिस सुरू करण्याची योजना आखत आहे. आजकाल कंपनीने 100,000 4G मोबाईल टॉवर्स बसवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. यासोबतच 5G इन्फ्रास्ट्रक्चर स्थापन करण्यावरही कंपनीचा फोकस असणार आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी बीएसएनएलची 5G सर्व्हिस सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. यासोबतच आता त्याच्या टाइमलाइनचीही माहिती समोर आली आहे.
केव्हा सुरु होईल 5G सर्व्हिस?
ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले, कंपनी पुढील वर्षी मे-जूनमध्ये 4G टॉवर्स बसवणार आहे. त्यानंतर लगेचच 5G इन्फ्रास्ट्रक्चर स्थापित करण्याचे काम सुरू केले जाईल. सध्या कंपनी निवडक भागात 5G सर्विसची चाचणी करत आहे.
कंपनीकडे आहेकोर 4G सिस्टीम
BSNL ची 4G सर्व्हिस सुधारण्यासाठी कारण्यासाठी एकतर परदेशी उपकरणे वापरली पाहिजेत किंवा स्थानिक पातळीवर काही उपाय शोधले पाहिजेत. भारतीय कंपन्यांच्या सहकार्याने स्वदेशी पर्याय स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय BSNL ने C-DoT च्या सहकार्याने कोर 4G सिस्टम बनवली आहे, अशी माहिती कम्युनिकेशन मिनिस्टर यांनी दिली. कंपनीने तेजस नेटवर्क्स RAN आणि QBTS सारख्या नवकल्पनांसह देखील जवळून काम केले आहे.
‘मेड इन इंडिया’ टेलीकॉम उपकरण
दरम्यान हे लक्षात घेण्यासारखे आहे की, BSNL च्या 4G आणि 5G टॉवर्समध्ये वापरलेली सर्व उपकरणे मेड इन इंडिया आहेत. बीएसएनएलचे नेटवर्क मजबूत करण्यासाठी सरकार दूरसंचार उपकरणांच्या देशांतर्गत उत्पादनावर भर देत आहे.
मॅन्युफॅक्चरिंग झोन स्थापन केले जाईल
काही दिवसांपूर्वी मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2024 मध्ये BSNL ने सर्व्हिसबद्दल काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या. कंपनीने आपल्या मेजर एडवांसमेंटद्वारे टेलिकॉम सेक्टरमध्ये आपले स्थान मजबूत केले आहे. ते म्हणाले की, आगामी काळात देशभरात मॅन्युफॅक्चरिंग झोन स्थापन केले जातील.
मेड इन इंडिया इनिशिएटिव्ह
केंद्र सरकार ‘मेड इन इंडिया’ उपक्रमाला वेगाने चालना देत आहे. यामुळेच गेल्या काही महिन्यांत भारतातून निर्यात होणाऱ्या स्मार्टफोनची संख्या वाढली आहे. विशेषतः आयफोनच्या निर्यातीत चांगली वाढ झाली आहे. कंपनी पुढील वर्षापासून भारतात एअरपॉड्स बनवण्याच्या तयारीत आहे. यासोबतच भारतातील मोठ्या शहरांमध्ये पुढील नवीन ॲपल स्टोअर्सही सुरू होतील.