
Year Ender 2025: Ghibli पासून Nano Banana पर्यंत, या व्हायरल ट्रेंड्सनी सोशल मीडियावर घातला होता धुमाकूळ
मार्चनंतर सोशल मीडियावर सर्वत्र घिबली ईमेजचा पूर आला होता. प्रत्येकजण आपले, कुटूंबियांचे आणि मित्रांचे घिबली फोटो तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करत होते. चहाचे दुकान, पाळीव प्राणी, लग्नाचे फोटो आणि बालपणीचे फोटो घिबलीच्या मदतीने तयार करण्यात आले आणि सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले.
ChatGPT मध्ये GPT-4o जोडण्यात आल्यानंतर हा ट्रेंड आणखी वेगाने व्हायरल झाला. हे फोटो तयार करण्यासाठी यूजर्सना केवळ त्यांचा फोटो चॅटमध्ये अपलोड करून प्रॉम्प्ट लिहायचा होता. त्यानंतर काही क्षणातच त्यांचा फोटो तयार होतो. हा ट्रेंड इतका व्हायरल झाला होता की, चॅटजीपीटी देखील हैराण झाला होता. एवढंच नाही तर चॅटजीपीटीचे सिईओ सॅम अल्टमन यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत सांगितलं होतं की, चॅटजीपीटीमधील कर्मचाऱ्यांना आरामाची गरज आहे. त्यामुळे हा ट्रेंड थोडा आरामात फॉलो करा.
मार्चमध्ये व्हायरल झालेल्या घिबली ट्रेंडनंतर AI अॅक्शन फिगर ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा ट्रेंड बोल्ड आणि ड्रामेटिक स्वरुपात होता. सामान्य माणसं स्वत:ला बिजनेस लीडर्सप्रमाणे आणि इंफ्लुएंसर्स स्वत:ला खेळण्यांप्रमाणे पाहू लागली. एप्रिल महिन्यात हा ट्रेंड व्हायरल झाला होता. मिम तयार करण्यासाठी या फोटोचा वापर होऊ लागला होता.
सप्टेंबर महिन्यात सोशल मीडियावर व्हायरल झाला विंटेज साडी लुक. सप्टेंबर महिन्यात मुलींनी गुगल जेमिनीवर आपले विंटेज साडी लुक तयार करून सोशल मीडियावर शेअर केले. सॉफ्ट लाइटिंग, साइड पार्टेड केस आणि 60-70 दशकातील भावनांमुळे प्रत्येकजण असे फोटो तयार करत होता. Google Gemini 2.5 Flash Image मुळे हा ट्रेंड अधिक लोकप्रिय झाला. या मॉडेलला Nano Banana देखील म्हटले जाते. या AI टूलच्या मदतीने लोकं त्यांचा मॉडर्न सेल्फी विंटेज इंडियन पोर्ट्रेटमध्ये बदलू लागले. भारतात देखील हा ट्रेंड प्रचंड व्हायरल झाला होता.
YouTube चा नवा प्रयोग! शॉर्ट्समधील Dislike बटणाची जागा बदलण्याची शक्यता, कंपनी करतेय मोठं प्लॅनिंग
2025 मध्ये आणखी एक मजेदार ट्रेंड व्हायरल झाला. हा ट्रेंड म्हणजे 3D डिजिटल फिगर. सोशल मीडियावर लोकं त्यांचे छोटे-छोटे 3D फिगर आणि डिजिटल अवतार शेयर करू लागले, जे ऑफिस डेस्क, जिम आणि लग्नाच्या कपड्यांमध्ये पाहायाला मिळत होते. हे खेळणी AI डिजिटल फिगर होते.