Year Ender 2025: या वर्षात लाँच झाले बेस्ट गेमिंग लॅपटॉप्स! दमदार परफॉर्मंस आणि किंमत तुम्हाला परवडणारी, वाचा फीचर्स
या लॅपटॉपची किंमत 36,990 रुपये आहे. जर तुम्ही एंट्री लेव्हल लॅपटॉपच्या शोधात असाल तर ASUS Vivobook Go 14 हा तुमच्यासाठी एक जबरदस्त पर्याय ठरणार आहे. यामध्ये 14-इंच FHD एंटी-ग्लेयर डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. लॅपटॉपमध्ये AMD RyzenTM 3 7320U प्रोसेसर आणि Radeon ग्राफिक्स देण्यात आले आहे. यामध्ये 42Wh बॅटरी आणि 45W एडेप्टरसह, लॅगशिवाय बेसिक गेमिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. विद्यार्थी, लाइट गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी हे मॉडेल अतिशय उपयोगी आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Lenovo चा IdeaPad 3 बजेट रेंजमध्ये मिळणारा एक परफेक्ट गेमिंग लॅपटॉप आहे. याची किंमत 32,905 रुपये आहे. हा लॅपटॉप Windows 11 वर चालतो आणि डिव्हाईस 10th Gen Intel Core i7 प्रोसेसरने सुसज्ज आहे. यामध्ये 14-इंच IPS FHD डिस्प्ले 200 nits ब्राइटनेस आहे. कंपनीने दावा केला आहे की, लॅपटॉप सुमारे 7.5 तासांची बॅटरी बॅकअप ऑफर करतो.
Acer Aspire Lite अशा यूजर्ससाठी डिझाईन करण्यात आला आहे, ज्यांना कमी किंमतीत चांगला परफॉर्मंस पाहिजे आहे. याची किंमत 48,990 रुपये आहे. यामध्ये AMD Ryzen 3 5300U प्रोसेसर आणि Radeon ग्राफिक्स आहे. यामध्ये 256GB स्टोरेज आहे, ज्याला 1TB पर्यंत वाढवले जाऊ शकते. यामध्ये असलेला 15.6-इंच Full HD डिस्प्ले गेमिंग आणि मल्टीमीडियासाठी बेस्ट आहे. गेमिंग आणि कंटेट क्रिएटर्ससाठी हे एक आदर्श पॅकेज आहे.
Meta चा मोठा डाव! 2026 मध्ये Mango आणि Avocado AI बदलणार गेम, गुगलला मिळणार मोठं आव्हान
MSI त्यांच्या गेमिंग हार्डवेयर साठी ओळखला जातो. MSI Modern 15 ची किंमत 49,990 रुपये आहे. हे डिव्हाईस 7th-Gen Ryzen 5 7530U प्रोसेसरसह येतो, ज्याची स्पीड 4.5GHz पर्यंत पोहोचू शकते. Windows 11 सह MSI Center आणि MS Office देखील प्री-इंस्टॉल्ड आहे. यामध्ये 15.6-इंच FHD डिस्प्ले आणि AMD Radeon ग्राफिक्स आहे.
HP 15 मॉडेलची किंमत 48,990 रुपये आहे आणि यामध्ये जबरदस्त फीचर्स देखील आहेत. यामध्ये Windows 11 Home, MS Office 2024 आणि Microsoft 365 एका वर्षाचे सब्सक्रिप्शन आहे. या लॅपटॉपमध्ये 15.6-इंच FHD एंटी-ग्लेयर डिस्प्ले 250 nits ब्राइटनेससह आहे.






