YouTube चा नवा प्रयोग! शॉर्ट्समधील Dislike बटणाची जागा बदलण्याची शक्यता, कंपनी करतेय मोठं प्लॅनिंग
प्रत्येक स्मार्टफोन यूजर व्हिडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म YouTube चा वापर करतो. युट्युबवर आपण वेगवेगळ्या पद्धतींचे आणि आपल्या पसंतीनुसार व्हिडिओ पाहू शकतो. इंस्टाग्रामप्रमाणे युट्युब देखील अत्यंत लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे. ज्याप्रमाणे इंस्टाग्रामवर रिल्स शेअर केल्या जातात त्याचप्रमाणे युट्युबवर शॉर्ट्स शेअर केले जातात. इंस्टाग्रामवरील रिल्सप्रमाणेच युट्युबवरील शॉर्ट्स देखील अत्यंत लोकप्रिय आहेत. युजर्स रिल्सप्रमाणे शॉर्ट्स देखील स्क्रोल करू शकतात.
Tech Tips: फोनवरच अडकलंय आयुष्य? फक्त या 5 सवयी बदला… 72 तासांत तुम्हालाही दिसेल चकित करणारा फरक
युट्युबवरील लोकप्रिय शॉर्ट्ससाठी आता एक नवीन बदल केला जाणार आहे. कंपनी शॉर्ट्समधील डिसलाईक बटणावर काम करत आहे. शॉर्ट्समधील डिसलाईट बटन हटवण्याची किंवा त्याची जागा बदलण्याची तयारी सुरू झाली आहे. नक्की काय होणार याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट झाली नाही. मात्र असे सांगितले जात आहे की, युट्युब शॉर्ट्समधील डिसलाईक बटनाची जागा आता बदलली जाणार आहे. जर तुम्हाला युट्युब शॉर्ट्स पाहताना डिसलाईक एक बटन दिसत नसेल, तर काळजी करू नका. तुमचा फोन खराब झालेला नाही तर हे एक नवीन अपडेट आहे. सध्या कंपनी डिसलाईक बटनाची जागा बदलण्याची चाचणी करत आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टनुसार येत्या काही दिवसांत युट्युब शॉर्ट्स डिसलाईक करणे अत्यंत कठीण होण्याची शक्यता आहे. थंब डाऊन बटन सध्या शॉर्ट्समधील कोपऱ्यातील लाईक बटनाच्या खाली दिसते. मात्र आता लवकरच याची जागा बदलली जाणार आहे. असं सांगितलं जात आहे की, युट्युब डिसलाईक आणि नॉट इंटरेस्टेड बटन एकत्र करू शकते. काही युजर्सना डिसलाईक आणि नॉट इंटरेस्टेड बटनमध्ये कोणताही फरक दिसत नाही. त्यामुळे कंपनीने निर्णय घेतला असल्याची शक्यता आहे. येत्या काळात यूजर्स एकाच बटणावर क्लिक करून दोन्ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात. म्हणजे तुम्ही एकच बटन क्लिक करून डिसलाईक आणि नॉट इंटरेस्टेड असे दोन्ही ऑप्शन्स सिलेक्ट करू शकता. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या माहितीमुळे असा दावा केला जात आहे.
युट्युबवर डिसलाईक बटनाचे फंक्शन्स आणि जागा बदलणार आहे. त्यामुळे असं मानलं जात आहे की, काही युजर्सना त्यांच्या डिव्हाईसवर हे बटन डिसलाईक लेबलसह दाखवले जाऊ शकते तर काही युजरना हे बटन नॉट इंटरेस्टेड लेबलसह दाखवले जाऊ शकते. चाचणीच्या रिझल्टनुसार ओवर फ्लो मेनूच्या आतमध्ये थंब डाऊन बटन दाखवले जाऊ शकते. हे बटन शॉर्ट्सच्या वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात तीन डॉटच्यावर दिसू शकते. तुम्ही समजू शकता की, डिसलाईक बटणासाठी तुम्हाला अतिरिक्त पावले उचलावी लागतात, तर लाईक बटण पूर्वीसारखेच मुख्य प्लेबॅक स्क्रीनवर राहते. यावरून स्पष्ट होते की कंटेंट लाईक करणे खूप सोपे असेल परंतु ते नापसंत करण्यासाठी वापरकर्त्याकडून अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील.
Ans: 60 सेकंदांपर्यंतचे छोटे व्हिडिओ म्हणजे Shorts.
Ans: Ads revenue आणि Creator Fund द्वारे YouTube Shorts मोनेटायझेशन केले जाऊ शकते.
Ans: नाही, टप्प्याटप्प्याने रोलआउट होतात.






