Amazon Great Indian Festival 2024: 1000 रुपयांच्या किंमतीत खरेदी करा ब्रँडेड स्मार्टवॉच
Amazon Great Indian Festival 2024 26 सप्टेंबरच्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून प्राईम मेंबर्ससाठी सुरु झाला आहे. हा सेल आज 27 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून सर्वच ग्राहकांसाठी लाईव्ह असणार आहे. या सेलमध्ये आकर्षक डिल्स आणि बंपर डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी उपलब्ध आहे. Amazon Great Indian Festival 2024 मधून खरेदी करताना तुम्ही स्मार्टफोन्स, टिव्ही, फ्रीज, स्मार्टवॉचवर बंपर डिस्काऊंट मिळवू शकता.
हेदेखील वाचा- Flipkart Big Billion Days Sale 2024: फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेलमध्ये लॅपटॉपवर मिळणार भरगोस डिस्काऊंट
Amazon Great Indian Festival 2024 या मेगा सेलमध्ये तुम्हाला स्मार्टवॉचवर बंपर सूट मिळणार आहे. बदलत्या काळात स्मार्टवॉच जीवनाचा एक भाग बनली आहेत, अत्यावश्यक फीचर्स आणि मजेदार डिझाइनपर्यंत सर्वच गोष्टी तुम्हाला या स्मार्टवॉचमध्ये मिळतील. स्मार्टवॉचची डिमांड प्रचंड वाढली आहे. तुम्हाला सुध्दा तुमच्या आवडत्या ब्रँडचे स्मार्टवॉच खरेदी करायचे असेल तर Amazon Great Indian Festival 2024 एक उत्तम संधी आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
Amazon Great Indian Festival सेलमध्ये Galaxy Watch4 Classic LTE वर 80% ची सूट देण्यात आली आहे. नावाप्रमाणेच स्मार्टवॉचचे डिझाईन देखील क्लासिक आहे. अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमसोबत यामध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. जसे की, 16 जीबी मेमरी स्टोरेज, स्लीप मॉनिटर, अॅक्टिव्हिटी ट्रॅकर आणि हार्ट रेट मॉनिटर सिस्टम देखील आहे.तर तुम्ही कशाची वाट पाहत आहात, फोन उचला आणि आत्ताच Galaxy Watch4 Classic LTE ऑर्डर करा.
Amazon Great Indian Festival मध्ये तुम्हाला आश्चर्यचकित करण्यासाठी, Amazfit ने 65% च्या सवलतीसह एक स्मार्टवॉच आणले आहे, जे तुमच्या प्रत्येक गरजेची पूर्ण काळजी घेईल. Amazfit Active मध्ये 42mm AMOLED स्मार्ट वॉच डिस्प्ले आहे. या स्मार्टवॉचमध्ये जीपीएस आहे, 14 दिवसांच्या बॅटरी बॅकअपशिवाय, त्याची खासियत म्हणजे ते अँड्रॉइड आणि आयओएस दोन्हीशी सुसंगत आहे.
फायर-बोल्ट फिनिक्स अल्ट्रा लक्झरी स्मार्टवॉचवर तब्बल 88% डिस्काऊंट देण्यात आलं आहे. तुम्हाला 12499 रुपयांचे स्मार्टवॉच फक्त 1499 रुपयांमध्ये मिळत आहे. ब्लूटूथ कॉलिंग व्यतिरिक्त, या स्टेनलेस स्टीलच्या स्मार्टवॉचमध्ये AI व्हॉइस असिस्टंट आणि 120 हून अधिक स्पोर्ट्स मोड देखील आहेत. तुम्हाला हार्ट रेट मॉनिटरसह 128MB मेमरी स्टोरेज देखील मिळेल. म्युझिक प्लेअरपासून ते अलार्म क्लॉकपर्यंत सर्व उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह, हे स्मार्टवॉच प्रत्येकाचे स्वप्न बनत आहे.
Amazon Great Indian Festival मध्ये 5999 रुपयांचे स्मार्टवॉच केवळ 999 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी तुम्हाला मिळत आहे. म्हणजेच स्टायलिश स्मार्टवॉचवर तुम्हाला 83 टक्क्यांचं डिस्काऊंट मिळणार आहे. 1.85 इंच मोठ्या डिस्प्लेसह स्टायलिश स्मार्टवॉच लाँच करण्यात आलं आहे. यामध्ये 10 दिवसांची बॅटरी लाइफ आहे. ज्यामुळे स्मार्टवॉच पुन्हा पुन्हा चार्ज करावी लागत नाही. हे स्मार्टवॉच पाणी प्रतिरोधक देखील आहे, त्यामुळे त्यावर पाणी सांडल्यास काळजी करण्याची गरज नाही. यामध्ये स्मार्ट नोटिफिकेशन्स, म्युझिक कंट्रोल, कॅमेरा कंट्रोल आणि अलार्म सारख्या इतर अनेक फीचर्सचाही समावेश आहे.