फ्लिपकार्टवर धमाकेदार ऑफर, सॅमसंगचा 60 हजार रुपयांचा प्रीमियम स्मार्टफोन अर्ध्या किमतीत उपलब्ध
ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर बिग शॉपिंग उत्सव 2024 सेल सुरु आहे. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काऊंट देण्यात आलं आहे. या सेल दरम्यान, फ्लिपकार्टवर सॅमसंगच्या स्वस्त प्रीमियम स्मार्टफोन Samsung Galaxy S23 FE वर एक उत्कृष्ट डील ऑफर केली जात आहे. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा फोन तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतो, जो प्रीमियम स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्ससह कमी किंमतीत येतो.
हेदेखील वाचा- Jio नाही तर रतन टाटांनी बदलली टेलिकॉम इंडस्ट्री, कॉलसह इंटरनेट केलं स्वस्त
Samsung Galaxy S23 FE स्मार्टफोन सध्या फ्लिपकार्टवर 29,249 रुपयांच्या किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो. सॅमसंगने गेल्या वर्षी भारतात हा फोन 59,999 रुपयांपाच्या किंंमतीत लाँच केला होता. आता कंपनीचा हा फोन ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर 30 हजार रुपयांच्या किंमतीत डिस्काउंटसह खरेदी करता येईल. (फोटो सौजन्य-Samsung )
यासह, फ्लिपकार्ट सेल दरम्यान, स्मार्टफोनच्या खरेदीवर फक्त 1 फ्लिपकार्ट सुपरकॉइनसह या 750 रुपयांचे डिस्काऊंट मिळणार आहे. फ्लिपकार्टवर उपलब्ध सर्व ऑफर्ससह, हा फोन 29,249 रुपयांच्या किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो. यासोबतच या फोनवर एक्स्चेंज बोनस डिस्काउंटचा अतिरिक्त लाभही मिळू शकतो.
Samsung Galaxy S23 FE हा फोन सिंगल स्टोरेज वेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Galaxy S21 FE ची जागा घेणार आहे, जो जानेवारी 2021 मध्ये Exynos 2100 प्रोसेसर, 25W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 4,500mAh बॅटरीसह लाँच झाला होता.
या सॅमसंग फोनमध्ये, तुम्हाला 6.4-इंचाचा डायनॅमिक फुल-HD+ AMOLED 2X डिस्प्ले मिळेल, ज्याचा रिफ्रेश दर 120Hz पर्यंत आहे.
प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर हा स्मार्टफोन ऑक्टा-कोअर प्रोसेसरसह लाँच करण्यात आला आहे. यात इन-हाउस Exynos 2200 चिपसेटसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे.
हेदेखील वाचा- Google Map: तुमच्या प्रत्येक प्रवासात फायदेशीर ठरतील गुगल मॅपचे ‘हे’ खास फीचर्स
फोनचा प्रायमरी कॅमेरा 50-मेगापिक्सेल आहे, जो ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनला सपोर्ट करतो. यासोबतच फोनमध्ये 12-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड सेन्सर आणि 8-मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 10-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
या फोनमध्ये 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,500mAh बॅटरी आहे. या फोनमध्ये वाय-फाय, जीपीएस, एनएफसी आणि ब्लूटूथ 5.3 सपोर्ट आहेत.
किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Samsung Galaxy S23 FE या डिवाइसच्या सिंगल 8GB + 256GB वेरिएंटची किंमत 59,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. पण सेलमध्ये तुम्ही हा फोन केवळ 29,249 रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकता. क्रीम, ग्रेफाइट, मिंट आणि पर्पल कलरमध्ये तुम्ही Samsung Galaxy S23 FE ची खरेदी करू शकता. हा हँडसेट केवळ सॅमसंगच्या अधिकृत साइटवर इंडिगो आणि टेंगेरिन कलरवेजमध्ये उपलब्ध असेल.