Google Map: तुमच्या प्रत्येक प्रवासात फायदेशीर ठरतील गुगल मॅपचे 'हे' खास फीचर्स
गुगल मॅप हे जगभरातील लोकप्रिय नेव्हिगेशन ॲप आहे. आपल्यााल कुठेही प्रवास करायचा असेल, आपल्या आजूबाजूच्या ठिकाणांची माहिती पाहिजे असेल किंवा एखादं चांगलं रेस्टॉरंट शोधायचे असेल. या सर्वासाठी गुगल मॅप तुम्हाला मदत करतो. गुगल मॅपचे लाखो युजर्स आहेत. शिवाय अनेक कंपन्या देखील त्यांच्या कामात गुगल मॅपचा वापर करतात. गुगल मॅपचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कंपनी देखील गुगल मॅपच्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत आहे. अशाच काही फीचर्सबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जे फीचर्स तुम्हाला तुमच्या रोजच्या प्रवासात फायदेशीर ठरतील.
हेदेखील वाचा- रस्ता शोधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गुगल मॅपचा इतिहास माहित आहे का? भारतात सुरु होताच झाला होता फ्लॉप
गुगलने Glanceable Directions नावाचे नवीन फीचर लाँच केले. या फीचरद्वारे यूजर्स त्यांचा फोन अनलॉक न करता दिशा पाहू शकतात. या फीचरच्या मदतीने, तुम्हाला स्टार्ट बटण न दाबता तुमच्या मार्गाचे संपूर्ण ओवरव्यू मिळेल. प्रथम तुमच्या फोनमध्ये गुगल मॅप ओपन करा आणि नंतर स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा. पुढे, सेटिंग्ज पर्याय निवडा आणि नंतर खाली स्क्रोल करा आणि ‘नेव्हिगेशन सेटिंग्ज’ वर टॅप करा. आता तुमच्या समोर दिसणाऱ्या स्क्रीनवर उपस्थित असलेल्या ‘ग्लान्सेबल डायरेक्शन्स’ पर्यायावर टॉगल करा. (फोटो सौजन्य – pinterest)
तुम्हाला कधी इमारतीचे प्रवेशद्वार शोधण्यात अडचण आली आहे का? यामध्ये गुगल मॅप्स तुमची मदत करू शकतात. कंपनीने एक वैशिष्ट्य जारी केले आहे ज्याद्वारे युजर्स जेव्हा एखाद्या इमारतीजवळ येतो तेव्हा मॅप ऑटोमॅटीकली प्रवेशद्वाराला हायलाइट करते आणि जवळपासच्या पार्किंग स्लॉटची माहिती देखील देते. तुम्ही रात्रीच्या वेळी कोणत्याही ठिकाणी किंवा मोठ्या इमारतीत जात असाल तर हे फीचर तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल.
हेदेखील वाचा- कितीही पाऊस असू द्या पण तुमची कार आणि बाईक डुबणार नाही, Google Map ने आणले 2 नवीन फीचर्स
तुम्ही देखील अशा लोकांपैकी एक आहात जे त्यांच्या कार किंवा बाइकचे पार्किंग स्थान विसरतात? Google Maps तुम्हाला तुमच्या पार्क केलेल्या वाहनाचे लोकेशन सेव्ह करण्यात मदत करते. पार्किंगची जागा जतन करण्यासाठी, पार्किंग केल्यानंतर, गुगल मॅपच्या मुख्य स्क्रीनवर दिसणाऱ्या निळ्या डॉटवर टॅप करा. यानंतर तुम्हाला ‘सेव्ह पार्किंग’ पर्याय दिसेल आणि तुम्ही ते मॅन्युअली डिलीट करेपर्यंत हे लोकेशन सेव्ह राहील.
गुगल मॅपमध्ये एक नवीन फीचर लाँच करण्यात आलं आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या जवळील EV चार्जिंग स्टेशन्स सहज शोधू शकता. यासाठी, तुम्ही तुमचे वाहन चार्ज करण्यासाठी वापरत असलेल्या चार्जरचा प्रकार सेट करावा आणि नंतर जवळचे चार्जिंग स्टेशन शोधण्यासाठी electric vehicle charging stations near me असे लिहून सर्च करा.
तुम्हाला हे माहीत आहे का की तुम्ही गुगल मॅपमध्ये जवळपासची ठिकाणे शोधण्यासाठी गुगल लेन्स वापरू शकता? या फीचरच्या माध्यमातून तुम्ही जवळपासची रेस्टॉरंट्स, कॅफे, उघडण्याचे तास, रेटिंग, रिव्ह्यू आणि त्या ठिकाणचे फोटो तुमच्या कॅमेऱ्याद्वारे मिळवू शकता.