Google करणार टाइम ट्रॅव्हल, युजर्सना 20 वर्ष जुने दृश्य पाहण्याची संधी मिळणार
Google Maps Time Machine Feature: सध्या तंत्रज्ञानाच्या जगात मोठ्या प्रमाणात प्रगती होत आहे. प्रत्येक कंपनी आणि अॅप्स आपल्या सुविधा अपडेट करत आहेत. याचा फायदा त्या कंपनीच्या आणि अॅपच्या युजर्सना होत आहे. असंच एक नवीन फीचर आता नेव्हिगेशन अॅप Google Map घेऊन येणार आहे. ह्या फीचरच्या मदतीने युजर्स 20 वर्षे आधीचा व्ह्यु पाहू शकणार आहेत. त्यामुळे हे नवीन फीचर फायदेशीर तर असणारच आहे, पण त्यासोबतच मजेशीर देखील असणार आहे.
हेदेखील वाचा- फोनमध्ये मिळणार मनीष मल्होत्राचे खास डिझाइन, Oppo Reno12 Pro 5G Manish Malhotra Limited Edition लवकरच लाँच होणार
तुम्ही कधी कार्टून बघितलं आहे का? तर कार्टूनमध्ये असं दाखवलं जात की एक टाईम मशीन असते ज्याच्या मदतीने आपण आपल्या भूतकाळात जाऊ शकतो, आणि आपलं शहर किंवा आपलं घर 20 वर्षांपूर्वी कसं होतं हे पाहू शकतं. असचं काहीसं फीचर आता Google Map घेऊन येणार आहे. त्यामुळे जुनी शहर किंवा आपलं जुनं घर पाहण्यासाठी तुम्हाला टाईम मशीनचा वापर करून 20 किंवा 30 वर्षे मागे जाण्याची गरज नाही. तुम्ही केवळ Google Map च्या या नवीन फीचरची मदत घेऊ शकता. (फोटो सौजन्य – pinterest)
गुगलने गुगल मॅप्स आणि गुगल अर्थसाठी असे एक फीचर जारी केले आहे, जे त्याच्या जुन्या स्थितीतील व्ह्यु दाखवते. याचा अर्थ असा की आता तुम्ही तुमच्या स्मार्टफोन किंवा कॉम्प्युटरवर 20 किंवा 30 वर्षांपूर्वी एखादे ठिकाण कसे दिसत होते ते सहजपणे पाहू शकता. गुगलने आपल्या मॅप सेवेत टाईम मशीनसारखे फीचर जोडले आहे. त्याच्या मदतीने, आपण भुतकाळात प्रवास करू शकतो आणि आपल्याला आवडत असलेल्या ठिकाणांचे जुने रूप पाहू शकता. या फीचरच्या मदतीने तुम्ही एखादी इमारत, रस्ता किंवा ती बांधली त्यावेळेची कोणतीही विशिष्ट जागा पाहू शकता. गुगलने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, बर्लिन, लंडन, पॅरिस सारख्या शहरांची खास ठिकाणे 1930 पासून आजपर्यंत पाहता येतात.
हेदेखील वाचा- तुम्हाला तुमच्या मोबाईलचे रेडिएशन माहित आहे का? अशा पद्धतीने चेक करा आणि जीवघेणे आजार टाळा
हे फीचर वापरण्यासाठी तुम्हाला गुगल मॅप्स किंवा गुगल अर्थवर जाऊन तुम्हाला पहायचे असलेले ठिकाण शोधावे लागेल. त्यानंतर तुम्हाला लेयर्स ऑप्शनवर जाऊन टाईमलॅप्स ऑप्शन चालू करावा लागेल. यानंतर तुम्ही 20 वर्षाआधी संबंधित ठिकाण कसं दिसतं होतं, ते पाहू शकता. आता तुम्ही केवळ वर्तमानातच प्रवास करू शकत नाही, तर काही वर्षांपूर्वी तुमच्या आजूबाजूच्या गोष्टी कशा दिसत होत्या हे पाहण्यासाठी ‘भूतकाळात परत जाऊ’ शकता. या नवीन वैशिष्ट्याला टाइम मशीन असे नाव देण्यात आले आहे, जे इतिहासाबद्दल उत्सुक असलेल्यांसाठी विशेषतः मनोरंजक ठरेल.
Google च्या मते, काही हवाई आणि उपग्रह फोटो 80 वर्षांपर्यंत जुने आहेत, ज्यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या आजूबाजूच्या परिसराचा भूतकाळ पाहता येतो. गुगलचे म्हणणे आहे की हे वैशिष्ट्य संशोधक आणि संस्थांसाठी विशेषतः प्रकल्पांसाठी हे नवीन फीचर उपयुक्त ठरेल. गुगल अर्थच्या माध्यमातून तुम्ही कोणत्याही शहराचा ऐतिहासिक परिसर जाणून घेऊ शकता. यासोबतच गुगलने आपल्या स्ट्रीट व्ह्यू फीचरमध्ये महत्त्वाचे अपडेट्सही केले आहेत. आता ही सुविधा जवळपास 80 देशांमध्ये उपलब्ध होणार आहे. यासोबतच गुगलने गुगल मॅप्स आणि गुगल अर्थमध्ये सॅटेलाइट इमेजरी देखील अपग्रेड केली आहे