फोनमध्ये मिळणार मनीष मल्होत्राचे खास डिझाइन, Oppo Reno12 Pro 5G Manish Malhotra Limited Edition लवकरच लाँच होणार
तुम्हीही भारतातील प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हाला आता मनीष मल्होत्राचे डिझाईन असलेला खास फोन पाहायला मिळणार आहे. Oppo Reno12 Pro 5G Manish Malhotra Limited Edition लाँच करण्यात आला आहे. फोनचे डिझाईन आकर्षक आणि प्रिमियम आहे. फोनला पाहताच कोणीही त्याच्या प्रेमात पडेल. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर हा फोन लिस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा फोन प्रि ऑर्डर करू शकता.
हेदेखील वाचा- Xiaomi ने लाँच केला अप्रतिम फिटनेस बँड, 21 दिवसांची बॅटरी लाइफ आणि अनेक आरोग्य सुविधांनी सुसज्ज
फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या खास डिझाइन्स आता फोनमध्ये पाहायला मिळणार आहेत. Oppo ने आपल्या भारतीय ग्राहकांसाठी Reno12 Pro 5G Manish Malhotra Limited Edition आणले आहे. हा फोन AI फीचर्सने सुसज्ज आहे. एक खास गोष्ट म्हणजे Oppo Reno12 Pro 5G Manish Malhotra Limited Edition स्वतः मनीष मल्होत्रा यांनी डिझाइन केला आहे. तुम्ही आता Oppo Reno12 Pro 5G Manish Malhotra Limited Edition ची प्री-ऑर्डर करू शकता. (फोटो सौजन्य – Oppo)
Reno12 Pro 5G Manish Malhotra Limited Edition स्वतः फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाइन केला आहे. फोन AI इरेजर 2.0 सह GenAI सह लाँच करण्यात आला आहे. डिजिटल अवतार तयार करण्यासाठी फोन AI स्टुडिओसह येतो. फोन 5 तासांपर्यंत रेकॉर्ड करण्यासाठी AI Recording Summary सह येतो.
हेदेखील वाचा- Realme UI 6.0 Update: Realme युजर्ससाठी आनंदाची बातमी, स्मार्टफोन्सना मिळणार नवीन अपडेट
डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर Reno12 Pro 5G Manish Malhotra Limited Edition दिवाळी गोल्ड कलर सह लाँच करण्यात आला आहे. फोन मागील बाजूस फ्लोरल पॅटर्न आणि मॅट फिनिशसह येतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा फोन Oppo Reno12 Pro सारख्याच वैशिष्ट्यांसह आणला गेला आहे. Reno12 Pro 5G Manish Malhotra Limited Edition फोन फक्त डिझाइन आणि लूकमध्ये वेगळा असणार आहे.
Reno12 Pro 5G Manish Malhotra Limited Edition हा भारतीय संस्कृतीने प्रेरित असलेला फोन असणार आहे. तुम्ही आता Reno12 Pro 5G Manish Malhotra Limited Edition ची प्री-ऑर्डर करू शकता. चांगली गोष्ट अशी आहे की तुम्ही फ्लिपकार्टवरून ही Limited Edition स्वस्तात खरेदी करू शकता. तुम्ही बँक ऑफरसह फ्लिपकार्टवरून फोन खरेदी करू शकता.
Reno12 Pro 5G Manish Malhotra Limited Edition ची किंमत 33,300 रुपये ठेवण्यात आली आहे. सर्व बँक कार्ड्सवर हा फोन 10 टक्के म्हणजेच 3690 रुपयांच्या सवलतीत उपलब्ध असेल. हा फोन 3 ऑक्टोबरपासून रिटेल मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध केला जात आहे. त्यामुळे हा फोन येत्या 3 दिवसांतच तुमच्या खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. फोनचा लुक आणि स्टाईल त्याला खूप खास बनवत आहे. ज्यांना फॅशन आणि तंत्रज्ञान दोन्हींची आवड आहे त्यांच्यासाठी Reno12 Pro 5G Manish Malhotra Limited Edition खूप खास असणार आहे.