What is carbon credit : हवामान बदल आणि वाढत्या प्रदूषणाच्या काळात 'कार्बन क्रेडिट' हा अब्जावधी डॉलर्सचा जागतिक व्यवसाय कसा बनला आहे? कार्बन ट्रेडिंग आणि भारताच्या कार्बन मार्केटबद्दल सविस्तर माहिती.
आपल्या जीवनशैलीतील अनेक कृती जसे की वाहनांचा वापर, विजेचा- पाण्याचा अपव्यय, प्लास्टिकचा वापर, अन्न आणि वस्तूंचा अपव्यय यांमुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कार्बन उत्सर्जन वाढते.
कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनाच्या सध्याच्या पातळीवर पृथ्वी केवळ तीन वर्षांत १.५ अंश सेल्सिअस तापमान मर्यादा ओलांडू शकते. ६० हून अधिक हवामान शास्त्रज्ञांनी असा इशारा दिला आहे.