धोक्याची उलटी गिनती सुरू! समुद्राची वाढती पातळी आणि अनियंत्रित तापमान, काय आहे कार्बन-उत्सर्जन (फोटो सौजन्य-X)
Carbon Emission in Marathi: सध्या संपूर्ण जगात हवामान बदलाबाबत सर्वात मोठी चिंता म्हणजे कार्बन उत्सर्जन कमी करणे. परंतु चिंतेचा विषय म्हणजे चीन आणि अमेरिकेनंतर, भारत देखील जगात सर्वात जास्त कार्बन उत्सर्जन करणाऱ्या तीन देशांमध्ये आहे. जगात ते कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत हे स्पष्ट आहे. २०१५ मध्ये एका ऐतिहासिक करारानुसार सुमारे २०० देशांनी १८०० च्या उत्तरार्धातील जागतिक तापमान वाढ १.५ अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्यास सहमती दर्शविली आहे. ज्याचा थेट उद्देश हवामान बदलामुळे होणारे नुकसान टाळणे हा होता. परंतु तरीही काही देशांनी विक्रमी प्रमाणात कोळसा आणि वायू जाळणे आणि मोठ्या प्रमाणात जंगले तोडणे सुरू ठेवले, त्याचा परिणाम काही भागात दिसून आला.
लीड्स विद्यापीठातील प्रिस्टली सेंटर फॉर क्लायमेट फ्युचर्सचे संचालक आणि प्रमुख लेखक प्रोफेसर पियर्स फोर्स्टर यांनी सांगितले की, काही गोष्टी या चुकीच्या दिशेने जात आहेत. आम्ही काही बदल पाहिले आहेत, ज्यामध्ये पृथ्वीचे तापमान आणि समुद्र पातळी देखील वेगाने वाढत आहे. दरम्यान नवीन अभ्यासानुसार २०२५ च्या सुरुवातीला कार्बन बजेट १३० अब्ज टनांपर्यंत कमी होईल.
जर जागतिक कार्बन उत्सर्जन सुमारे ४० अब्ज टन राहिले, तर १३० अब्ज टन कार्बन बजेट संपण्यासाठी सुमारे ३ वर्षे लागतील. यामुळे पॅरिस कराराने ठरवलेल्या उद्दिष्टापेक्षा जग पुढे जाईल. गेल्या वर्षी जगभरातील हवेचे तापमान १८०० च्या उत्तरार्धापेक्षा १.५ अंश सेल्सिअस जास्त गरम होते.एकंदरित धोक्याची पातळी वाढत असल्याचे शस्त्रांचे म्हणणे आहे.
सुमारे ९० टक्के अतिरिक्त उष्णता महासागरांद्वारे शोषली जाते. यामुळे सागरी जीवनात मोठे बदल होतील आणि वितळणाऱ्या हिमनद्यांमुळे महासागरांमध्ये अतिरिक्त पाणी जमा होत असल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होईल. १९९० च्या दशकापासून जागतिक समुद्र पातळी वाढीचा दर दुप्पट झाला आहे, ज्यामुळे जगभरातील किनारी भागात राहणाऱ्या लाखो लोकांसाठी पूर येण्याचा धोका वाढला आहे.
२०२३ च्या आकडेवारीनुसार आहे. तसेच, त्यांच्यासोबत दिलेला डेटा प्रति वर्ष दशलक्ष टन CO₂ (MtCO₂/वर्ष) मध्ये आहे. तो ग्लोबल कार्बन प्रोजेक्ट, IEA आणि EDGAR सारख्या स्त्रोतांकडून घेण्यात आला आहे.
भारतात ७% भारत कोळशावर देखील जास्त अवलंबून आहे, जे ते अक्षय ऊर्जेने दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. २०७० पर्यंत निव्वळ शून्यावर पोहोचण्याची त्याची योजना आहे. ३,४०० मेगावॅट कार्बन उत्सर्जन. कोळसा: ७०%. तेल: २५%.
कार्बन उत्सर्जन हे प्रामुख्याने CO₂ चे उत्सर्जन आहे, जे मानवी क्रियाकलापांमुळे वाढते (जसे की जीवाश्म इंधन जाळणे, जंगलतोड). ते हरितगृह वायूंचा सर्वात मोठा भाग आहे (GHG उत्सर्जनापैकी सुमारे ७५% CO₂ आहे).






