पोलिस ट्रिपल रायडिंगच्या प्रकरणांवरही बारकाईने लक्ष ठेवून आहेत. वाहतूक तज्ज्ञांच्या मते, केवळ चलन जारी केल्याने बदल घडणार नाही. त्याऐवजी, मुंबईकरांनी स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेबाबत अधिक सतर्क राहिले पाहिजे.
नुकत्याच सुरू झालेल्या गोरेगाव येथील मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या अयोग्य पृष्ठभागामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागला. तर विक्रोळी रेल्वे उड्डाणपुलावर लोकार्पणानंतरही मध्यवर्ती पादचाऱ्यांसाठी जागाच नसल्याचे उघड झाले होते.
उड्डाणपूल थेट मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे उभारल्या जाणाऱ्या एलिव्हेटेड पूर्व द्रुतगती महामार्गाला जोडला जाणार असल्याने, दक्षिण मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना थेट आणि विनाअडथळा मार्ग उपलब्ध होणार आहे.
मानखुर्द - महाराष्ट्र नगर टी जंक्शन येथे नियमितपणे सकाळी आणि रात्रीच्या वेळी होणाऱ्या तीव्र वाहतूककोंडीमुळे स्थानिक रहिवाशांसह मुंबई-वाशी दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते.
महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे मुंबईकरांना आणि पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यालगत विस्तीर्ण खुल्या जागा, विरंगुळ्याची आधुनिक साधने आणि निसर्गरम्य हरित परिसर उपलब्ध होणार आहे. मुंबईचा हा कोस्टल रोड परिसर आगामी काळात शहरातील केवळ एक वाहतूक…
महापालिकेने सर्व सातही परिमंडळांसाठी वेगवेगळ्या प्रभागांनुसार सुट्या निविदा काढण्याऐवजी परिमंडळ स्तरावर एकत्रित प्रक्रिया राबवली आहे. यामुळे प्रशासकीय कामात मोठी सुसूत्रता येणार असून वेळेचीही बचत होणार आहे.
मुंबईतील रस्ते देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमध्ये नागरिकांना सकारात्मक बदल दिसेल, अशा पद्धतीने परिरक्षण विभागातील सहायक अभियंता, उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंत्यांनी उत्तरदायित्वाने काम करावे, असे त्यांनी सांगितले.
पावसाळ्यापूर्वीच या रस्त्यावरील डांबर उन्हाच्या झळांनी वितळू लागले आहे. या गंभीर प्रकरणावरून 'वॉचडॉग फाऊंडेशन' ने प्रशासनाला धारेवर धरले असून, कंत्राटदाराचे देयक तत्काळ रोखण्याची मागणी केली आहे.
मागील पाच वर्षांचा ऑडिट अहवाल जाहीर करावा, तृतीय-पक्ष गुणवत्ता तपासणी आणि दोषी ठेकेदारांवर कारवाई करावी आदी मागण्या मातेले यांनी केल्या असून कायदेशीर कारवाई जनआंदोलनाचा इशारा दिला आहे.
नोंदणीच्या आकडेवारीवरून स्पष्टपणे दिसून येते की, दुचाकी वाहने सर्वसामान्यांची पसंतीची पसंती राहिली आहेत. एकूण नवीन नोंदणींमध्ये मोटारसायकलींचा वाटा सर्वाधिक होता. त्यांची २२.९४ लाखांहून अधिक नोंदणी झाली.