ओमराजे निंबाळकर आणि नागेश पाटील आष्टीकर यांनी स्वतंत्रपणे भूमिका जाहीर केल्याने ठाकरे गटातील बंडखोर खासदारांच्या सदस्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ऑपरेशन टायगरला यामुळे मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेतील ६ बंडखोर खासदारांपैकी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी पहिल्यांदाच फेसबुक लाईव्ह करत भूमिका स्पष्ट केली आहे. "मी शिवसेनेतून शिवसेनेतच गेलोय, विकासकामांच्या निधीसाठी सत्तेत जाणे गरजेचे होते," असे…