नागपूर महानगपालिकेचे निकाल येण्यास आता सुरुवात झाली. यात सर्वाधिक जागांवर भाजपच्या उमेदवारांची आघाडी पाहायला मिळत आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
नागपुरात नितीन गडकरी आणि मुंबईत भाजप नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला. सुंदर आणि विकसित शहरासाठी मतदारांनी मोठ्या संख्येने बाहेर पडण्याचे आवाहन नेत्यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉ. मोहन भागवत यांनी महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी नागपूरमध्ये मतदान केले. यावेळी मोहन भागवत यांनी नोटा बद्दलही प्रश्न उपस्थित केले आणि मतदानाचे आवाहन केले
प्रशासनाने विविध पातळ्यांवर संवेदनशील म्हणून मतदान केंद्र घोषित केली आहेत, त्याचप्रमाणे कायदा आणि सुव्यवस्था आणि आर्थिक घडामोडींच्या दृष्टीने १५० केंद्रांवर विशेष देखरेख ठेवली आहे.