Nagpur Election Results 2026: मुख्यमंत्र्यांनी गड राखला! नागपुरात भाजपला बहुमत; कोणत्या पक्षाला किती जागा? जाणून घ्या
Solapur Municipal Result : राज्यातील सर्वात धक्कादायक निकाल! भाजपची महिला उमेदवार तुरुंगातून विजयी
माहितीनुसार, सकाळी ११ वाजेपर्यंतच्या कलानुसार भाजपने सर्वाधिक ७४ जागांवर आघाडी घेतली आहे. त्यानंतर काँग्रेसने २५ जागांवर आघाडी मिळवली असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने खाते उघडत १ जागेवर आघाडी घेतली आहे. सध्या नागपूरमध्ये मतदानाची प्रक्रिया सुरू असून अंतिम निकालानंतर नागपूर महापालिकेवर कोणाची सत्ता येणार, हे स्पष्ट होणार आहे.
नागपूर महापालिका निवडणूक २०२६ अंतर्गत १५१ जागांसाठी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ५१ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक बहुमताचा आकडा कोण गाठणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपूर महापालिकेतील २४ लाख मतदार ९९३ उमेदवारांचे भवितव्य ठरवत आहेत. अशा परिस्थितीत भाजप सर्वाधिक जागांवर आघाडी घेत विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत असून, काँग्रेसही पाठोपाठ संथ गतीने आगेकूच करत आहे.
भाजप -74
शिवसेना-1
(लक्षात घ्या, भाजप-शिवसेना युती आहे)
काँग्रेस-25
राष्ट्रवादी–1
शिवसेना UBT-1
बसपा–01
राष्ट्रवादी SP-00
इतर–04






