सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदावरुन झालेल्या राड्यावरुन सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी हे वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकले होते. त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई टळली असून ते कामावर रुजू झाले आहेत.
सातारा पोलिसांची गुन्हे डिटेक्शनचे प्रमाण 80 टक्के इतके आहे. मात्र, डिटेक्शन प्रकरणामध्ये मुद्देमालांची रिकव्हरी वाढवायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रतापसिंहनगरमधील दत्ता जाधवच्या दहशतीचा बीमोड प्रतापगड येथील अफजलखान कबरीलगतची अतिक्रमणे हे टप्पे त्यांच्या कारकिर्दीत विशेष उल्लेखनीय ठरले. पुसेसावळी दंगल प्रकरणही त्यांनी अत्यंत संवेदनशीलपणे हाताळले होते.