सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणूक प्रकरणानंतर पोलीस अधीक्षक तुषार दोषी कामावर रुजू झाले (फोटो - सोशल मीडिया)
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीवेळी झालेल्या प्रकारावरुन विधीमंडळामध्ये देखील आक्रमक भूमिका घेण्यात आली. आमदार आणि मंत्र्यांना झालेली धक्काबुक्की हा निंदनीय प्रकार असून यावरुन पोलीस अधीक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. शिंदे गटाच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी निलंबनाचे आदेश दिले होते. ते. मात्र, अधिवेशनाच्या शेवटच्यादिवशी सभापती राम शिंदे यांनी उपसभापतींचा आदेश रद्द करत सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीचे चौकशीचे आदेश दिले आहेत.
हे देखील वाचा : झिरवळांना अडकवण्यासाठी कुणी सापळा रचला; वडेट्टीवारांचा विधानसभेत लेटरबॉम्ब
दरम्यान, निलंबनाचा आदेश रद्द करण्यात आल्यानंतर सातारा पोलीस अधीक्षक हे कार्यालयामध्ये कामावर रुजू झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराची चौकशी केली जाईल असे सांगितले. तसेच, सभापती, उपसभापती आणि तालिका अध्यक्षांच्या अधिकारासंदर्भातही त्यांनी कायदेशीर बाजू तपासण्याची गरज असल्याचे म्हटले होते. त्यातच, अधिवेशनाच्या शेवटच्यादिवशी सभापती राम शिंदे यांनी नीलम गोऱ्हेंनी दिलेले आदेश रद्द केले. या घटनेनंतर आता सातारा पोलिस अधीक्षक दोशी हे आज दोन दिवसांनंतर पोलिस मुख्यालयात हजर झाले आहेत. त्यामुळे, त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली किंवा त्यांचे निलंबन झालेच नाही, हे स्प्ट झालं आहे.
हे देखील वाचा : साताऱ्याच्या राड्यामुळे सरकार धोक्यात? शिंदे गटाच्या नेत्यांकडून राजीनाम्याचा इशारा
सातारा जि.प. अध्यक्षपद निवडणुकीबाबत सत्ताधाऱ्यांतच जोरदार आरोप-प्रत्यारोप झाल्याचे चित्र होते. सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाची शिंदे गटाची मागणी होती. तर, या निर्णयाला भाजप मंत्री जयकुमार गोरे यांनी कडाडून विरोध दर्शवला होता. या सर्व घडामोडींमुळे सत्ताधारी आघाडीतच अंतर्गत मतभेद उघड झाल्याचे स्पष्ट झाले. या मुद्द्यावरून सभागृहात सत्ताधाऱ्यांमध्येच वाद पेटला. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी घोषणाबाजी करत निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी केली. तर गोरे यांनी निलंबन मागे घेण्याचा आग्रह धरला होता.






